Sri Lanka Crisis: भारताचा श्रीलंकेला मदतीचा हात, 3.8 अब्ज डॉलर्सची करणार मदत
Sri Lanka Crisis: मोठ्या आर्थिक आणि राजकीय संकटाला तोंड देत असलेल्या श्रीलंकेला भारताने मोठी मदत जाहीर केली आहे.
Sri Lanka Crisis: मोठ्या आर्थिक आणि राजकीय संकटाला तोंड देत असलेल्या श्रीलंकेला भारताने मोठी मदत जाहीर केली आहे. श्रीलंकेची आर्थिक परिस्थिती स्थिर व्हावी म्हणून भारताने श्रीलंकेला 3.8 अब्ज अमेरिकन डॉलर्सची मदत जाहीर केली आहे. भारतीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने (MEA) याबाबत एक निवेदन जारी केले आहे. त्यात म्हटले आहेत की, श्रीलंका आणि तेथील लोक ज्या आव्हानांना तोंड देत आहेत, याची आम्हाला जाणीव आहे. या कठीण काळात मात करण्याच्या प्रयत्नात आम्ही श्रीलंकेच्या लोकांच्या पाठीशी उभे आहोत, असे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने म्हटले आहे. श्रीलंकेतील भीषण आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी भारताने यावर्षी 3.8 अब्ज अमेरिकन डॉलर्सपेक्षा जास्त मदत दिली आहे. भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने सांगितले की, आम्ही शेजारील राष्ट्र श्रीलंकेच्या वाईट काळात त्यांच्यासोबत उभे आहोत.
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहेत की, अशा संकटाच्या परिस्थितीत भारत श्रीलंकेच्या लोकांच्या पाठीशी उभा आहे. लोकशाही मार्ग आणि मूल्ये, प्रस्थापित संस्था आणि घटनात्मक चौकटीच्या माध्यमातून त्यांना त्यांच्या समृद्धीच्या आणि प्रगतीच्या आकांक्षा पूर्ण करायच्या आहेत. श्रीलंकेतील भीषण आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी भारताने यावर्षी 3.8 अब्ज अमेरिकन डॉलरहून अधिक मदत दिली आहे. श्रीलंकेतील अलीकडच्या घडामोडींवर आम्ही बारकाईने लक्ष ठेवून आहोत.
India has extended this year itself an unprecedented support of over US$ 3.8 billion for ameliorating the serious economic situation in Sri Lanka. We continue to follow closely the recent developments in Sri Lanka: MEA#SriLankaEconomicCrisis pic.twitter.com/boTjbJ2VHq
— ANI (@ANI) July 10, 2022
श्रीलंकेतील परिस्थितीवर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची म्हणाले की, "भारत श्रीलंकेचा सर्वात जवळचा शेजारी आहे आणि दोन्ही देश सभ्यतेच्या बंधनांनी बांधलेले आहेत. बागची म्हणाले, "श्रीलंका आणि तेथील लोक ज्या अनेक आव्हानांना तोंड देत आहेत त्याबद्दल आम्हाला माहिती आहे. आम्ही श्रीलंकेच्या लोकांच्या पाठीशी उभे आहोत, कारण ते या कठीण काळातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करतात." बागची म्हणाले, भारताने या वर्षी श्रीलंकेतील भीषण आर्थिक परिस्थिती दूर करण्यासाठी 3.8 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त मदत दिली आहे. दरम्यान, याआधी भारताने श्रीलंकेला डिझेल-पेट्रोल (इंधन) देऊन देखील मदत केली आहे. श्रीलंकेत तेलाच्या तुटवड्यामुळे इंधनाच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली होती. तेल फक्त अत्यावश्यक कारणांसाठी वापरण्याची परवानगी होती. त्यामुळे श्रीलंकेतील सर्वसामान्य जनतेला पेट्रोलियम पदार्थांच्या तीव्र टंचाईचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत भारताने श्रीलंकेला अनेकवेळा मोठ्या प्रमाणात पेट्रोल आणि डिझेल पाठवून मदत केली होती.