एक्स्प्लोर
भारताला पुढची 10 वर्षे स्थिर आणि निर्णायक सरकारची गरज : अजित डोभाल
भारताला सक्षम बनण्यासाठी पुढे जायचं असेल तर स्थिर सरकारची गरज असल्याचं मत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांनी व्यक्त केलंय. आघाड्यांचं सरकार हे निर्णय घेण्यासाठी सक्षम नसतं. त्यामुळे भारताला किमान 10 वर्ष तरी स्थिर सरकारची गरज असल्याचं ते म्हणाले.
नवी दिल्ली : देशात राजकीय, आर्थिक आणि सामाजिक उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी पुढची दहा वर्ष एक मजबूत, स्थिर आणि निर्णायक सरकारची गरज असल्याचं मत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी व्यक्त केलं. कमकुवत आघाडी सरकार हे देशासाठी वाईट असल्याचंही ते यावेळी म्हणाले. गेल्या चार वर्षात देशाची राष्ट्रीय इच्छाशक्ती जागृत झाल्याचं त्यांनी सांगितलं.
ऑल इंडिया रेडिओकडून आयोजित सरदार पटेल स्मृती व्याख्यानात बोलताना अजित डोभाल यांनी हे मत मांडलं. लोकशाही ही भारताची ताकद असून ती सुरक्षित ठेवण्याची गरज आहे. कमकुवत लोकशाहीमध्ये देशाला कमकुवत बनवणाऱ्या प्रवृत्ती असतात. या दृष्टीने भारताला पुढची काही वर्षे कमकुवत राहणं परवडणारं नाही. त्यामुळे कठोर निर्णय घ्यावे लागतील, असं ते म्हणाले.
अजित दोभाल देशातील सर्वात शक्तिशाली नोकरशाह बनले!
''भारताची ताकद कमी झाली तर आपल्याला तडजोड करावी लागेल. तडजोड करावी लागत असेल तर तुमचं राजकीय अस्तित्व देशहितापेक्षा मोठं बनतं. अस्थिर राजकारण भारताला इच्छाशक्तीच्या दृष्टीने वाटचाल करणं कठीण करेन, कारण कमकुवत सरकार निर्णय घेण्यासाठी असमर्थ असतं,'' असं मत अजित डोभाल यांनी व्यक्त केलं.स्पेशल रिपोर्टः अजित डोभाल... भारताचा चाणक्य
''भारताला पुढे घेऊन जाण्यासाठी कठोर निर्णय घेणं गरजेचं आहे. असे निर्णय हे लोकप्रियतेसाठीच असावेत हे देखील गरजेचं नाही. यासाठीच भारताला आपली राजकीय, आर्थिक आणि सामाजिक उद्दिष्ट साध्य करण्यासाठी किमान पुढची दहा वर्ष मजबूत, स्थिर आणि निर्णायक सरकारची गरज आहे,'' असं अजित डोभाल म्हणाले. ''आघाड्यांचं सरकार हे देशासाठी चांगलं नाही. अस्थिर सरकार कोसळण्याची किंवा भ्रष्टाचार वाढण्याची भीती अधिक असते आणि स्थानिक राजकारणाचं हितच देशापेक्षा मोठं बनतं,'' अशी चिंताही अजित डोभाल यांनी व्यक्त केली.उरी हल्ला : अमेरिकेच्या सुरक्षा सल्लागारांचा अजित डोभाल यांना कॉल
या भाषणात अजित डोभाल यांनी ब्राझीलचंही उदाहरण दिलं, जो देश जागतिक स्तरावर चांगली कामगिरी करत आहे, पण राजकीय अस्थिरतेमुळे ब्राझीलसमोर अनेक संकटं आहेत. 2030 पर्यंत भारताला निर्णायक सरकार आणि निर्णायक नेतृत्त्वाची गरज आहे, असं म्हणत धार्मित प्रतिबद्धतेसोबतच कायद्याचं सरकार ठेवण्यावरही त्यांनी भर दिला. संबंधित बातम्या :एसपीजीच्या परवानगीविना मंत्री, खासदारांनाही मोदींच्या जवळ जाता येणार नाही
पीडीपीचा पाठिंबा काढण्याआधी अजित डोभाल, अमित शाहांची चर्चा
तणावादरम्यान अजित डोभाल चीन दौऱ्यावर जाणार!
दहशतवाद्यांच्या खात्म्यासाठी ‘डोभाल प्लॅन’
पाकिस्तानच्या सुरक्षा सल्लागारांचा अजित डोभाल यांना कॉल
देशविरोधी घोषणांवर समाजाचं मौन देशासाठी घातक : अजित डोबाल
भारत-पाक चर्चा रद्द झाल्याच्या वृत्ताचं अजित डोभालांकडून खंडन
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement