एक्स्प्लोर

देशाचा परकीय चलनाचा साठा दोन वर्षांच्या नीचांकी पातळीवर, राखीव साठा 524.52 अब्ज डॉलर

Foreign Exchange : अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण रोखण्यासाठी आरबीआयने परकीय चलन साठ्याचा वापर केला. 

नवी दिल्ली: भारताच्या परकीय चलनाचा साठा गेल्या दोन वर्षांतील नीचांकी पातळीवर पोहोचला आहे. भारताची मध्यवर्ती बँक अर्थात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नुकतीच याबाबत आकडेवारी जारी केली आहे. याच आकडेवारीनुसार 21 ऑक्टोबर रोजी संपलेल्या आठवड्यात देशाचा परकीय चलन साठा 3.85 अब्ज डॉलरने घसरून 524.52 अब्ज डॉलर झाला आहे. 

जुलै 2020 नंतरची ही नीचांकी पातळी आहे. यामुळे परकीय चलनाचा साठा मागील आठवड्यात 4.50 अब्ज घसरल्यानंतर 528.37 अब्ज झाला. गेल्या अनेक महिन्यांपासून परकीय चलनाच्या साठ्यात सातत्याने घट झाली आहे.

एफसीए आणि सोन्याचा साठाही घसरतो

आरबीआयने जारी केलेल्या आकडेवारीनुसार 21 ऑक्टोबर रोजी संपलेल्या आठवड्यात परकीय चलन मालमत्ता (FCA), चलन साठ्याचा एक महत्त्वाचा घटक मानला जाणारा 3.593 अब्ज डॉलरने घसरून 465.075 अब्ज डॉलर झाला आहे. यासह देशाचा सोन्याचा साठा 247 दशलक्ष डॉलरने घटून 37,206 अब्ज डॉलरवर आला आहे. मध्यवर्ती बँकेच्या मते स्पेशल ड्रॉइंग राइट्स (SDRs) 7 दशलक्षने वाढून 17.44 अब्ज डॉलर झाला आहे.

रुपयाची घसरण रोखण्याचे प्रयत्न 

परकीय चलनाचा साठा कमी होण्याचे मुख्य कारण म्हणजे अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण रोखण्यासाठी आरबीआय चलन साठ्याची मदत घेत आहे. ऑक्टोबर 2021 मध्ये, देशाचा परकीय चलन साठा 645 अब्ज डॉलरसह सर्वोच्च पातळीवर होता. देशांतर्गत चलनाचे मूल्य घसरण्यापासून वाचवण्यासाठी गेल्या एका वर्षात आतापर्यंत   रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 115 बिलियनची विक्री केली आहे.  

तसेच आयात केलेल्या वस्तूंच्या वाढत्या किमतींमुळे व्यापार सेटलमेंटसाठी राखीव अधिक गरजेची आवश्यकता होती. प्रमुख जागतिक चलनांच्या तुलनेत अमेरिकन डॉलर मजबूत झाल्यामुळे भारतीय रुपया गेल्या काही आठवड्यांपासून कमकुवत होत आहे.

गेल्या आठवड्यात रुपयाने इतिहासात प्रथमच 83 चा अंक ओलांडला होता. या वर्षी आतापर्यंत रुपयाचे अवमूल्यन सुमारे 10-12 टक्क्यांनी झाले आहे. सामान्यतः, रुपयाचे प्रचंड अवमूल्यन रोखण्याच्या उद्देशाने, डॉलरच्या विक्रीसह, तरलता व्यवस्थापनाद्वारे आरबीआय बाजारात हस्तक्षेप करते. रशियाने फेब्रुवारीच्या उत्तरार्धात युक्रेनवर आक्रमण केल्यापासून भारताच्या परकीय चलन साठ्यात सुमारे USD 100 अब्जची घट झाली आहे जेव्हा जागतिक स्तरावर ऊर्जा आणि इतर वस्तूंची आयात महाग झाली होती. गेल्या 12 महिन्यांत, संचयी आधारावर सुमारे USD 115 बिलियनने घट झाली आहे.  

परकीय चलनाच्या साठ्यात घट झाल्याचा परिणाम

कोणताही देश गरज पडेल तेव्हा आपल्या देशाच्या चलनाची तीव्र घसरण थांबवण्यासाठी परकीय चलनाच्या साठ्याची मदत घेतो. परंतू त्याचे नकारात्मक तोटे देखील आहेत. चलन साठा खूप कमी झाला तर चलनात अनियंत्रित घसरण होऊ शकते. आयातीवर अवलंबून असलेल्या देशांवर याचा वाईट परिणाम होतो, कारण चलन घसरल्याने आयातीचा खर्च वाढतो.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

लोकसभेत हातावर लिहिले 3 'वाजे'ला मतदान करा, माझ्या पाठीत खंजीर खुपसला, हेमंत गोडसेंचा भुजबळांवर गंभीर आरोप
लोकसभेत हातावर लिहिले 3 'वाजे'ला मतदान करा, माझ्या पाठीत खंजीर खुपसला, हेमंत गोडसेंचा भुजबळांवर गंभीर आरोप
Numerology : अतिशय घाबरट असतात 'या' जन्मतारखेचे लोक; मनतील भावनाही धड करत नाहीत व्यक्त, लोक काय बोलतील याचा करतात अति विचार
अतिशय घाबरट असतात 'या' जन्मतारखेचे लोक; लोक काय बोलतील याचा करतात अति विचार, मनतील भावना व्यक्त करायलाही घाबरतात
नालासोपाऱ्यात हिंदी भाषिक टीसीची दादागिरी, दाम्पत्याकडून लिहून घेतलं
नालासोपाऱ्यात हिंदी भाषिक टीसीची दादागिरी, दाम्पत्याकडून लिहून घेतलं "मराठी बोलणार नाही"
मोठी बातमी! उत्तर प्रदेशच्या मदरसा कायद्याला सर्वोच्च न्यालयाची मान्यता, मदरशांना मोठा दिलासा 
मोठी बातमी! उत्तर प्रदेशच्या मदरसा कायद्याला सर्वोच्च न्यालयाची मान्यता, मदरशांना मोठा दिलासा 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

नालासोपाऱ्यात दादागिरी करणाऱ्या टीसीचं निलंबन, 'माझा'च्या बातमीचा इम्पॅक्टABP Majha Marathi News Headlines 1PM TOP Headlines 1 PM 05 November 2024Uddhav Thackeray Kolhapur : उद्धव ठाकरे कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनालाSharad pawar On Yugendra Pawar : ..म्हणून मी युगेंद्र पवारांची निवड केली, शरद पवारांनी कारण सांगितलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
लोकसभेत हातावर लिहिले 3 'वाजे'ला मतदान करा, माझ्या पाठीत खंजीर खुपसला, हेमंत गोडसेंचा भुजबळांवर गंभीर आरोप
लोकसभेत हातावर लिहिले 3 'वाजे'ला मतदान करा, माझ्या पाठीत खंजीर खुपसला, हेमंत गोडसेंचा भुजबळांवर गंभीर आरोप
Numerology : अतिशय घाबरट असतात 'या' जन्मतारखेचे लोक; मनतील भावनाही धड करत नाहीत व्यक्त, लोक काय बोलतील याचा करतात अति विचार
अतिशय घाबरट असतात 'या' जन्मतारखेचे लोक; लोक काय बोलतील याचा करतात अति विचार, मनतील भावना व्यक्त करायलाही घाबरतात
नालासोपाऱ्यात हिंदी भाषिक टीसीची दादागिरी, दाम्पत्याकडून लिहून घेतलं
नालासोपाऱ्यात हिंदी भाषिक टीसीची दादागिरी, दाम्पत्याकडून लिहून घेतलं "मराठी बोलणार नाही"
मोठी बातमी! उत्तर प्रदेशच्या मदरसा कायद्याला सर्वोच्च न्यालयाची मान्यता, मदरशांना मोठा दिलासा 
मोठी बातमी! उत्तर प्रदेशच्या मदरसा कायद्याला सर्वोच्च न्यालयाची मान्यता, मदरशांना मोठा दिलासा 
Uddhav Thackeray Kolhapur : उद्धव ठाकरे कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनाला
Uddhav Thackeray Kolhapur : उद्धव ठाकरे कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनाला
कॉमेडी किंग अजितदादांचा प्रचार करणार, सयाजी शिंदेंनंतर भाऊ कदमांची राष्ट्रवादीच्या घड्याळाला साथ
कॉमेडी किंग अजितदादांचा प्रचार करणार, सयाजी शिंदेंनंतर भाऊ कदमांची राष्ट्रवादीच्या घड्याळाला साथ
Sharad Pawar: संसदीय राजकारणातून निवृत्ती घेण्याचे शरद पवारांचे संकेत; बारामतीत बोलताना केलं मोठं वक्तव्य, नेमकं काय म्हणालेत?
संसदीय राजकारणातून निवृत्ती घेण्याचे शरद पवारांचे संकेत; बारामतीत बोलताना केलं मोठं वक्तव्य, नेमकं काय म्हणालेत?
Balasaheb Thorat : 'आम्ही इकडे आलो म्हणून चांगले वागतात, नाहीतर तुमचा कार्यक्रमच होता'; बाळासाहेब थोरातांचा विखे पिता-पुत्रांवर जोरदार हल्लाबोल
'आम्ही इकडे आलो म्हणून चांगले वागतात, नाहीतर तुमचा कार्यक्रमच होता'; बाळासाहेब थोरातांचा विखे पिता-पुत्रांवर जोरदार हल्लाबोल
Embed widget