एक्स्प्लोर
Advertisement
स्वतंत्र रेल्वे बजेट पुढील वर्षापासून बंद होणार
नवी दिल्ली : रेल्वे बजेट हे अर्थसंकल्पाचाच भाग बनवण्याची शिफारस केंद्रीय अर्थमंत्रालयाने स्वीकारली आहे. त्यामुळे गेल्या ९२ वर्षांपासूनच्या परंपरेला आता पूर्णविराम मिळणार आहे.
रेल्वे बजेट हा अर्थसंकल्पाचाच भाग बनवण्याची शिफारस केंद्रीय रेल्वे मंत्रायाकडून अर्थ मंत्रालयाला करण्यात आली होती. ती शिफारस अर्थमंत्रालयानं स्वीकारली आहे. त्यामुळं अर्थ बजेटमध्येच रेल्वेच्या बजेटचा समावेश असणार आहे.
आता रेल्वे अर्थ संकल्पाचा समावेश सर्वसाधारण बजेटमध्ये अंतर्भाव कसा करावा, यासाठी एक पाच जणांची समिती स्थापन करण्यात आली असून त्यांना ३१ ऑगस्टपर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
त्यामुळे आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनापासून रेल्वेचे स्वतंत्र बजेट मांडलं जाणार नाही. आजपर्यंत रेल्वे विभाग स्वतंत्र बजेट मांडत असल्यानं या बजेटला ९२ वर्षांची परंपरा होती. पण आताही परंपरा संपुष्टात येणार असून, सुरेश प्रभू हे रेल्वेचं शेवटचं स्वतंत्र बजेट सादर करणारे रेल्वेमंत्री ठरलेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
व्यापार-उद्योग
मुंबई
क्राईम
Advertisement