एक्स्प्लोर
प्रेयसीसोबत व्हिडीओ कॉलवर बोलताना तरुणाचा गळफास
या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मृत तरुण त्याच्या बहिणीसोबत राहत होता, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
हैदराबाद : हैदराबादमध्ये आत्महत्येची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेयसीसोबत व्हिडीओ कॉलवर बोलत असताना, तरुणाने गळफास लावून घेतला. यानंतर त्याचा मृत्यू झाला.
सायबराबाद परिसरातील ही घटना आहे. 20 वर्षीय आयटीआयचा विद्यार्थी अजमीरा सागर आपल्या प्रेयसीसोबत व्हिडीओ कॉलवर बोलत होता. त्याचवेळी त्याने व्हिडीओ कॉलवर असलेल्या प्रेयसीसमोर गळफास घेतला.
या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मृत तरुण त्याच्या बहिणीसोबत राहत होता, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
घटनेच्या वेळी तरुण घरात एकटाच होता. यानंतर कुटुंबीय आणि घरमालकाने त्याचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत पाहिला. गळफास लावण्यासाठी त्याने बहिणीच्या साडीचा वापर केला होता, असंही पोलिसांनी सांगितलं.
पोलिसांनी घटनास्थळी जाऊन तरुणाचा मृतदेह ताब्यात घेतला असून तो पोस्टमॉर्टेमसाठी पाठवला आहे. तपासादरम्यान त्याच्या मोबाईलमध्ये आत्महत्येचा व्हिडीओही पोलिसांना सापडला आहे. पोलिसांनी या प्रकरणी कलम 174 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
तुझ्यासमोर मरायला मला आनंद होईल, असा मेसेज तरुणाने बुधवारी सकाळी प्रेयसीला केला होता. त्यानंतर त्याने व्हॉट्सअॅपवरुन व्हिडीओ कॉल केला आणि चॅटिंग सुरु असतानाच त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.
2 मिनिटं 4 सेकंदाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये दोन मुली तरुणाशी बोलताना दिसत आहेत. तो खुर्चीवर उभं राहून गळफास घेताना दोघीही त्याला पाहत होत्या. सुरुवातीला हा प्रँक असल्याचं दोघींनाही वाटलं. पण नंतर एकीला ओरडण्याचा आवाज आला.
तरुणाच्या आत्महत्येचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. या घटनेचा तपास सुरु आहे. पोलिस या प्रकरणात तरुणाच्या प्रेयसीचीही चौकशी करु शकतात.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
नाशिक
महाराष्ट्र
पर्सनल फायनान्स
Advertisement