एक्स्प्लोर

Hyderabad Police | व्हीसी सज्जनार.. तेलंगणाचा सिंघम!

दिशाला न्याय देणाऱ्या व्ही.सी. सज्जनार यांचा अख्खा इतिहासच इन्स्टंट जस्टिसचा राहिला आहे. त्यामुळेच तेलंगणात त्यांची ओळख सिंघम अशी आहे. भले-भले गुन्हेगार सज्जनार यांच्या नावानेच कापतात.

मुंबई : "एक बार मैंने कमिटमेंट कर दी तो मैं अपने आप की भी नहीं सुनता." व्ही.सी.सज्जनार यांना हा डायलॉग चपखल बसतो. वर्दीशी आणि लोकांच्या सुरक्षेशी असलेली त्यांची कमिटमेंट अख्ख्या आंध्र-तेलंगणाला माहित आहे. सज्जनार सध्या सायबराबादचे पोलीस आयुक्त आहेत आणि अवघ्या 10 दिवसात दिशाच्या आरोपींना यमसदनी धाडल्याने देशभर सज्जनार यांचं कौतुक सुरु आहे. दिशाला न्याय देणाऱ्या व्ही.सी. सज्जनार यांचा अख्खा इतिहासच इन्स्टंट जस्टिसचा राहिला आहे. त्यामुळेच तेलंगणात त्यांची ओळख सिंघम अशी आहे. भले-भले गुन्हेगार सज्जनार यांच्या नावानेच कापतात. घटना 1 1. 2008 साली वायएसआर राजशेखर रेड्डी यांचं सरकार असताना व्ही.सी.सज्जनार वारंगलचे पोलीस अधीक्षक होते. 2. वारंगलमध्ये काकतिया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी इंजिनियरिंग कॉलेज आहे. 3. डिसेंबर 2008 ला स्वप्निका आणि प्रणिता या दोन मुली स्कूटीवर कॉलेजला निघाल्या होत्या. 4. या दोघींना मध्येच अडवून तीन तरुणांनी त्यांच्यावर असिड हल्ला केला. 5. श्रीनिवास, पी.हरिकृष्ण आणि बी.संजय अशी या तिघांची नावं होती 6. या हल्ल्यात स्वप्निका जागीच मरण पावली तर प्रणिता बऱ्याच महिन्यांच्या उपचारानंतर बरी झाली 7. श्रीनिवास याचं स्वप्निकावर एकतर्फी प्रेम होतं. त्यातून हा हल्ला झाला होता. 8. श्रीनिवास, हरिकृष्ण आणि संजय या तिघांनीही आपला गुन्हा कबूल केला. 9. 12 डिसेंबर 2008 ला पोलिसांनी त्यांना नेमकी घटना कशी झाली याचं रिकन्स्ट्रक्शन करण्यासाठी घटनास्थळी नेलं. 10. तिथे पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना पोलिसांची आरोपींशी चकमक झाली आणि तीनही युवक मारले गेले 11. दिशाच्या प्रकरणासारखाच रोष आणि संताप त्यावेळी अख्ख्या आंध्र प्रदेशात होता. 12. तिघांचं एन्काऊंटर झाल्यानंतर सज्जनार यांचं राज्यभर कौतुक झालं. घटना 2 1. याआधी सज्जनार गुप्तचर विभागात विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून काम करत होते 2. गुप्तचर यंत्रणा त्यावेळी नक्षल्यांच्या कारवायांवर बारीक नजर ठेऊन होती 3. कारण बऱ्याच उद्योगपतींकडून आणि बड्या आसामींकडून खंडणी गोळा करण्याचं काम सुरु होतं 4. नईम हा त्यातला मुख्य आरोपी आणि म्होरक्या होता. 5. अख्खं तेलंगणा नईमच्या दहशतीमुळे वैतागलं होतं. सज्जनार यांनी ऑपरेशन नईमुद्दीन हातात घेतलं. 6. हैदराबादच्या आऊटस्कर्टसला व्ही.सी.सज्जनार यांनी नईमलाही गोळ्या घातल्या होत्या, त्यानंतर उद्योग वर्तुळाने सुटकेचा श्वास सोडला. सज्जनार पुन्हा हिरो झाले. कोण आहेत सज्जनार? 1. व्ही.सी.सज्जनार मूळचे कर्नाटकातील हुबळीचे आहेत. 2. तिथल्या लायन्स स्कूलमधून त्यांनी प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण पूर्ण केलं 3. सज्जनार यांचे वडील सी बी सज्जनार टॅक्स कन्सल्टंट आणि समाजसेवक होते. त्यांना वडिलांकडून समाजसेवेची प्रेरणा मिळाली. जनतेच्या सेवेसाठी ते पोलिस खात्यात भरती झाले. 4. व्ही सी सज्जनार यांचे बंधू मल्लिकाअर्जुन डॉक्टर आहेत. 5. 1996 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी म्हणून ते आंध्रात रुजू झाले 6. अतिरिक्त पोलीस अधीक्षक जनगाव म्हणून पहिलं पोस्टिंग होतं 7. त्यानंतर अत्यंत महत्त्वाच्या जबाबदाऱ्यांवर काम केलं. 8. सज्जनार महिला आणि बाल सुरक्षेवर विशेष लक्ष देतात. सोबकच कम्युनिटी पोलिसिंग, सायबर क्राईम आणि मानव तस्करीवर विशेष काम करतात. 9. वारंगल जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक, गुप्तचर विभागाचे  विशेष आयजी, आंध्र एसआयबीचे प्रमुख म्हणून काम पाहिलं 10. मार्च 2018 पासून ते सायबराबादचे पोलीस आयुक्त म्हणून काम करत आहेत. 11. सज्जनार इन्टेलिजन्स विंगआधी  OCTOPUS आणि आर्थिक गुन्हे शाखेत पोलिस अधीक्षक म्हणून कार्यरत होते. 12. सायबराबाद पोलिसांचं ब्रीद वाक्य आहे  "Your Safety Our Concern" पोलिस कायम टीकेचे धनी असतात.  चांगल्या कामाचं श्रेयसुद्धा बहुतेकवेळा नेत्यांकडे जातं. पण सज्जनार यांच्या कमिटमेंट आणि कर्तृत्वामुळे आज देशभर खाकीचं कौतुक होत आहे. दिशाला न्याय मिळाला याचं देशाला समाधान आहे. आता सज्जनार यांच्या न्यायाची पद्धत ही प्रश्नचिन्हांकित आहे. संबंधित बातम्या Hyderabad Police | 'एन्काऊंटर मॅन' व्ही सी सज्जनार Hyderabad Rape Case : पोलिसांकडून चारही आरोपींचा एन्काऊंटर BLOG | Hyderabad Rapist Encounter | हैदराबाद एन्काऊंटनंतर निर्माण झालेले काही प्रश्न!

Hyderabad Police | कुठे फुलांचा वर्षाव, कुठे राखी बांधून कृतज्ञता; हैदराबाद पोलिसांचं कौतुक

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
राहुल गांधीं जबाबदारीपासून का पळत आहेत?
राहुल गांधीं जबाबदारीपासून का पळत आहेत?
Lok Sabha Result 2024: रवींद्र वायकरांच्या मेहुण्याकडील मोबाईल फोन EVM मशीनला कनेक्ट, धक्कादायक दाव्याने एकच खळबळ
रवींद्र वायकरांच्या मेहुण्याकडील मोबाईल फोन EVM मशीनला कनेक्ट, धक्कादायक दाव्याने एकच खळबळ
गुगल मॅपचा भरोसा नाय काय, संभाजीनगरमध्ये UPSC परीक्षेपासून 50 विद्यार्थी वंचित; मुलींच्या डोळ्यात अश्रू
गुगल मॅपचा भरोसा नाय काय, संभाजीनगरमध्ये UPSC परीक्षेपासून 50 विद्यार्थी वंचित; मुलींच्या डोळ्यात अश्रू
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Top 50 : टॉप 50 बातम्यांचं अर्धशतक राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा :16 June 2024 : ABP MajhaIce Cream Human Finger Malad : Ice Cream मध्ये सापडला माणसाच्या बोटाचा तुकडा!Kolhapur  Accident CCTV : यू टर्न घेणाऱ्या रिक्षाला दुचाकीची धडक, जीवितहानी नाही मात्र दोघे जखमीTop 50 : टॉप 50 बातम्यांचं अर्धशतक राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा : 16 June 2024: ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
राहुल गांधीं जबाबदारीपासून का पळत आहेत?
राहुल गांधीं जबाबदारीपासून का पळत आहेत?
Lok Sabha Result 2024: रवींद्र वायकरांच्या मेहुण्याकडील मोबाईल फोन EVM मशीनला कनेक्ट, धक्कादायक दाव्याने एकच खळबळ
रवींद्र वायकरांच्या मेहुण्याकडील मोबाईल फोन EVM मशीनला कनेक्ट, धक्कादायक दाव्याने एकच खळबळ
गुगल मॅपचा भरोसा नाय काय, संभाजीनगरमध्ये UPSC परीक्षेपासून 50 विद्यार्थी वंचित; मुलींच्या डोळ्यात अश्रू
गुगल मॅपचा भरोसा नाय काय, संभाजीनगरमध्ये UPSC परीक्षेपासून 50 विद्यार्थी वंचित; मुलींच्या डोळ्यात अश्रू
Sangli News : कन्नड शाळेत मराठी माध्यमाच्या शिक्षकांची नियुक्ती; सांगली जिल्हा परिषदेचा अजब कारभार
कन्नड शाळेत मराठी माध्यमाच्या शिक्षकांची नियुक्ती; सांगली जिल्हा परिषदेचा अजब कारभार
प्रकाश शेंडगे म्हणाले, त्यांचे आमदार 'चुन चुन के गिरायेंगे'; मनोज जरांगे म्हणतात, त्यांना विरोधक मानेल तेव्हा...
प्रकाश शेंडगे म्हणाले, त्यांचे आमदार 'चुन चुन के गिरायेंगे'; मनोज जरांगे म्हणतात, त्यांना विरोधक मानेल तेव्हा...
Rishabh Pant : '...माझी सर्व कमाई दान करणार', ऋषभ पंतची विश्वचषकादरम्यान मोठी घोषणा! 
Rishabh Pant : '...माझी सर्व कमाई दान करणार', ऋषभ पंतची विश्वचषकादरम्यान मोठी घोषणा! 
Kolhapur Viral Video : कोल्हापुरात रस्त्यावर यू टर्न घेणाऱ्या रिक्षाचा विचित्र अपघात, संपूर्ण थरार सीसीटीव्हीत कैद
Video : कोल्हापुरात रस्त्यावर यू टर्न घेणाऱ्या रिक्षाचा विचित्र अपघात, संपूर्ण थरार सीसीटीव्हीत कैद
Embed widget