(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Haryana Govt : शेतकऱ्यांसाठी हरियाणा सरकारचा मोठा निर्णय, नैसर्गिक शेती करणाऱ्यांना मिळणार अनुदान
शेतकऱ्यांना नैसर्गिक शेती (Natural Farming) करण्याचं आवाहन हरियाणा सरकारनं (Haryana govt) केलं आहे. नैसर्गिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी हरियाणा सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे.
Animal Husbandry : सध्या हवामानात सातत्यानं बदल होत आहेत. या बदलाचा शेती क्षेत्रावर मोठा परिणाम होताना दिसत आहे. तसेच शेतकऱ्यांचा (Farmers) उत्पादन खर्च देखील वाढला आहे. सातत्यानं खतांच्या बियाणांच्या किंमती वाढत आहेत. उत्पादन खर्चाच्या मानाने शेतीतून नफा मिळत नसल्यानं शेतकरी चिंतेत आहेत. त्यामुळं शेतकऱ्यांना नैसर्गिक शेती (Natural Farming) करण्याचं आवाहन हरियाणा सरकारनं (Haryana govt) केलं आहे. नैसर्गिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी हरियाणा सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. नैसर्गिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना देशी गायींच्या खरेदीवर 25 हजार रुपयांचं अनुदान दिलं जाणार असल्याची माहिती कृषीमंत्री जे पी दलाल (Jai Parkash Dalal) यांनी दिली.
शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेती करावी, मंत्री दलाल यांचं आवाहन
काल (23 डिसेंबर) राष्ट्रीय शेतकरी दिन साजरा करण्यात आला. या कृषी दिनाच्या पार्श्वभूमीवर हरियाणाचे कृषीमंत्री जे पी दलाल यांनी शेतकऱ्यांना गायीच्या खरेदीसाठी 25 हजार रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. किमान आपल्या उपजीविकेसाठी तरी शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेती, सेंद्रिय शेतीचा अवलंब करावा असं आवाहन मंत्री दलाल यांनी केलं आहे.
पशुपाल व्यवसायाला प्रोत्साहन देण्याचा हरियाणा सरकारचा प्रयत्न
शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीबाबत जागरूक करण्यासाठी कृषी विद्यापीठ आणि कृषी विभाग तांत्रिक ज्ञान आणि प्रशिक्षण यांच्याकडून विविध सत्रांचेही आयोजन करण्यात येत आहे. मार्गदर्शनाबरोबरच आर्थिक मदतही केली जाणार असल्याचे दलाल म्हणाले. चौधरी चरणसिंग हरियाणा कृषी विद्यापीठ, हिस्सार इथे शेतकरी दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाला संबोधित करताना हरियाणाचे कृषी मंत्री जेपी दलाल म्हणाले की, मत्स्यपालन व्यवसायातून 10 हजार शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे. काही काळापासून हिरव्या चाऱ्याचा देखील तुटवडा आहे. त्यासाठी सायलेजचा व्यवसाय करण्यासाठी 50 लाखांपर्यंतच्या आर्थिक मदतीचीही तरतूद करण्यात आल्याची माहिती जे पी दलाल यांनी दिली आहे.
रब्बी पिकांचा विमा काढण्यासाठी 31 डिसेंबरची अंतिम मुदत
हरियाणामध्ये रब्बी पिकांचा विमा काढण्यासाठी 31 डिसेंबरची अंतिम मुदत ठेवण्यात आली आहे. याआधी शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांची नोंदणी करून खात्री करता येणार आहे. हरियाणा हे एकमेव राज्य आहे की जिथे शेतकऱ्यांना पीक विम्याचा हप्ता भरल्यानंतर 500 कोटी रुपयांचा परतवा दिला असल्याचा दावा मंत्री दलाल यांनी केला आहे. बहुतांश शेतकरी आपली पिके किमान आधारभूत किंमतीवर विकतात. कृषी विभागही शेतकऱ्यांच्या विकासासाठी आणि शेतीच्या विस्तारासाठी सातत्याने संवेदनशीलतेने काम करत असल्याचे दलाल म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या: