आयसीसचा दहशतवादी शाहनवाजचा मोठा गौप्यस्फोट, गोधरानंतरच्या दंगलीचा बदला घेण्यासाठी गुजरात दहशतवाद्यांचं लक्ष्य
ISIS Terrorist : आयसीसचा दहशतवादी शाहनवाज यानं मोठा गौप्यस्फोट केलाय. गोधरानंतरच्या दंगलीचा (2002 Gujarat riots) बदला घेण्यासाठी गुजरात दहशतवाद्यांचं लक्ष्य होतं.
ISIS Terrorist : आयसीसचा दहशतवादी शाहनवाज यानं मोठा गौप्यस्फोट केलाय. गोधरानंतरच्या दंगलीचा (2002 Gujarat riots) बदला घेण्यासाठी गुजरात दहशतवाद्यांचं लक्ष्य होतं. गुजरातमध्ये सीरियल बॉम्बस्फोटाची योजना आखली होती, असे शाहनवाज याने चौकशीदरम्यान सांगितलं. दहशतवादी शाहनवाजला 2 ऑक्टोबर 2023 रोजी दिल्लीतून अटक करण्यात आली होती. गुजरातमधील अनेक शहरांमध्ये बॉम्बस्फोट मालिकेची तयारी असल्याचे त्यानं चौकशीदरम्यान सांगितलं.
आयसीसचा दहशतवादी शाहनवाज सध्या दिल्ली पोलिसांच्या ताब्यात आहे. त्याला गेल्यावर्षी 2 ऑक्टोबर रोजी बेड्या ठोकल्या होत्या. मागील तीन महिन्यापांसून त्याची कसून चौकशी होत आहे. चौकशीवेळी शाहनवाज याने अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. आयएसआयएस गुजरातमध्ये मोठा हल्ला करण्याच्या तयारीत होतं. गुजरातमध्ये सिरियल ब्लॉस्ट करण्याचा प्लॅन आयएसआयएसनं आखला होता. गुजरातमधील अनेक मोठी शहरं आयएसआयएसच्या निशाण्यावर होती.
शाहनवाज याने दिल्ली पोलिसांना सांगितलं की, " हँडलर अबू सुलेमान याच्या सांगण्यावरुन दोन दहशतवाद्याने अहमदाबाद, वडोदरा आणि सूरत या शहराच्या कानाकोपऱ्याची माहिती काढण्यास सुरुवात केली होती. गुजरात हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं गृह राज्य असल्याचं आयसीसला माहित आहे. त्यामुळे गुजरात राज्यात मोठा हल्ला करण्याची तयारी होती." चौकशीत शाहनवाज याने सांगितलं की, 'गोधरा दंगलीचा बदला घेण्यासाठी गुजरातमध्ये दहशतवादी हल्ला केला जाणार होता.' दहशतवादी शहनवाज याला दिल्ली पोलिसांनी गतवर्षी ऑक्टोबर रोजी बेड्या ठोकल्या होत्या. शहनवाज याच्यावर पाच लाख रुपयांचं बक्षीस होतं.
दहशतवाद्याने हल्ल्यासाठी कोणता परिसर निवडला होता ?
दिल्ली पोलिसांनी आयसीसचा दहशतवादी शहनवाज याची कसून चौकशी केली. चौकशीवेळी शहनवाज याने आपलं तोंडं उघडलं अन् धक्कादायक गौप्यस्फोट केले. शहनवाज म्हणाला की, आयसीसचे दहशतवादी ट्रेनने अहमदाबाद येथे पोचले. तिथे त्यांनी दोन दिवस रेकी केली. पहिल्या दिवशी रेल्वे स्टेशन, सिनेमा हॉल, विद्यापीठ, व्हीआयपी रस्ते, नेत्यांचे मार्ग (पण त्यांना निर्णायक मार्ग मिळाला नाही) , अटल प्रवासी पूल याच्यासोबत गर्दीच्या ठिकाणांचं निरीक्षण केले. मस्जिद, दरगाह, मजार, साबरमती आश्रम यासारख्या गर्दीची ठिकाणं दहशतवाद्यांच्या निशाण्यावर होती.
दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी ते दहशतवादी गांधीनगर येथे गेले होते. तिथे त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कार्यालय, विश्व हिंदू परिषद (विहिप) कार्यालय, हायकोर्ट, जिल्हा कोर्ट, सत्र न्यायालय, भाजप कार्यालयाचा दौरा केला. दहशतवाद्यांनी या सर्व ठिकाणीचे फोटो आणि व्हिडीओ काढण्यात आले. या सर्वांसाठी त्यांनी तेथे रेंटवर दुचाकी घेतली होती, त्यावरुन ते संपूर्ण शहरात फिरले, अन् आपले टार्गेट्सची निवड केली.
आणखी वाचा :