एक्स्प्लोर
गुजरातमध्ये खासदार राजीव सातव यांना अटक आणि सुटका
निदर्शनं करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. यामध्ये खासदार राजीव सातव यांचाही समावेश आहे.
राजकोट : गुजरात विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि भाजप यांच्यातला संघर्ष आता विकोपाला गेला आहे. काँग्रेस उमेदवाराच्या भावाला मारहाण केल्याच्या निषेधार्थ मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्या घराबाहेर काँग्रेसने निदर्शनं केली. निदर्शनं करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. यामध्ये खासदार राजीव सातव यांचाही समावेश आहे.
राजीव सातव यांच्यासह काही कार्यकर्त्यांनाही अटक करण्यात आली. सर्वांची जामिनावर सुटका करण्यात आली. राजकोट येथील रेया रोडवरील काँग्रेसचे उमेदवार इंद्रनील राजगुरु यांचे भाऊ दीप राजगुरु यांच्यावर भाजपचं पोस्टर काढण्याच्या वादातून हल्ला झाला होता.
त्यानंतर मुख्यमंत्री विजय रुपाणींच्या घराबाहेरचे पोस्टर फाढण्यासाठी काँग्रेसचे कार्यकर्ते आले. मात्र यावेळी काँग्रेस आणि भाजपच्या नेत्यांमध्ये हाणामारी झाली. दीप राजगुरु यांच्यावर झालेल्या हल्ल्यामागे भाजपचा हात असल्याचा काँग्रेसचा आरोप आहे.
दरम्यान जमाव पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. यामध्ये काही कार्यकर्ते जखमीही झाले आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement