एक्स्प्लोर
आता नोकरीच्या एका वर्षानंतरही कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युएटी मिळणार?
सरकार ग्रॅच्युएटीसाठीचा निर्धारित कालावधी कमी करण्याचा विचार करत आहे. यासंदर्भातील प्रस्तावास मंजुरी मिळाल्यास एक वर्षानंतर नोकरी सोडणार्यास किंवा नोकरीवरुन काढून टाकला जाणार्या व्यक्तीलाही ग्रॅच्युएटी मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
नवी दिल्ली : सरकार ग्रॅच्युएटीसाठीचा निर्धारित कालावधी कमी करण्याचा विचार करत आहे. यासंदर्भातील प्रस्तावास मंजुरी मिळाल्यास एक वर्षानंतर नोकरी सोडणार्यास किंवा नोकरीवरुन काढून टाकला जाणार्या व्यक्तीलाही ग्रॅच्युएटी मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
सद्यस्थितीत नोकरीत पाच वर्षे पूर्ण झाल्यानंतरच संबंधित कर्मचारी ग्रॅच्युएटी मिळण्यास पात्र ठरतो. मात्र, नव्या सुधारणांचा प्रस्ताव दुसर्या मंत्रालयांना पाठवण्यात आल्याची माहिती कामगार मंत्रालयाच्या सूत्रांनी दिली.
सर्व मंत्रालयांची ग्रॅच्युएटीसंदर्भातील प्रस्तावाला लवकरच मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. त्यासाठी पेमेंट ऑफ ग्रॅच्युएटी अॅक्टमध्येही लवकरच सुधारणा केली जाईल.
खासगी क्षेत्रात काम करणार्यांनाही केंद्र सरकारच्या कर्मचार्यांप्रमाणे जास्तीत जास्त 20 लाख रुपयांपर्यंत ग्रॅच्युएटी मिळण्याची शिफारस यापूर्वीच्या सरकारने केली होती. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर यासंदर्भातील विधेयक संसदेत सादर केले जाणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement