एक्स्प्लोर
गोव्यातील राजकीय समीकरणं काय? काँग्रेसचा सत्तास्थापनेचा दावा कशामुळे?
विधानसभा निवडणुकीत सर्वात जास्त जागा जिंकणाऱ्या काँग्रेसने आता राज्यात सत्ता स्थापन करण्याचा दावा केला आहे. या राजकीय अस्थिरतेकडे देशाचं लक्ष लागलं आहे.

पणजी : गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकरांवर सध्या दिल्लीत उपचार सुरु आहेत. त्यांच्या अनुपस्थितीत गोव्यात राजकीय अस्थितरता निर्माण झाली आहे. विधानसभा निवडणुकीत सर्वात जास्त जागा जिंकणाऱ्या काँग्रेसने आता राज्यात सत्ता स्थापन करण्याचा दावा केला आहे.
काँग्रेसच्या शिष्टमंडळाने आज गोव्याच्या राज्यपाल मृदुला सिन्हा यांची भेट घेऊन सत्ता स्थापन करण्यासाठी संधी द्यावी, अशी विनंती केली. सभागृहात बहुमत सिद्ध करण्याची संधी दिल्यास ते आम्ही सिद्ध करु, आम्हाला पाच अपक्षांचा पाठिंबा आहे, असं काँग्रेस नेते चंद्रकांत कवळेकर यांनी सांगितलं.
मित्रपक्षाकडूनही मुख्यमंत्री बदलण्याची मागणी
पर्रिकरांच्या अनुपस्थितीत सरकारमधील सहयोगी पक्षांनीही मुख्यमंत्री बदलाची मागणी केली आहे. महाराष्ट्र गोमांतक पक्षाने मुख्यमंत्री बदलण्याची मागणी केली. मात्र दिल्लीला गेलेले भाजप नेते राम लाल यांनी मुख्यमंत्री बदलाची शक्यता फेटाळून लावली.
भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी रविवारी पक्षातील तीन वरिष्ठ नेते बी एल संतोष, राम लाल आणि विनय पुराणिक यांना पक्षातील नेते आणि सहयोगी पक्षांशी चर्चा करण्यासाठी गोव्यात पाठवलं होतं.
काय आहे गोवा विधानसभेचं समीकरण?
गोव्यात भाजपने सध्या मित्रपक्षांच्या मदतीने सत्ता स्थापन केलेली आहे. 40 सदस्य संख्या असलेल्या गोवा विधानसभेत भाजपकडे 14 आमदार आहेत. तर जीएफपी (गोवा फॉरवर्ड पक्ष) आणि एमजीपी (महाराष्ट्र गोमांतक पक्ष) कडे तीन-तीन आमदार आहेत. भाजपला तीन अपक्ष आणि इतर एका आमदाराचं समर्थन मिळालेलं आहे. तर काँग्रेसकडे 16 आमदार आहेत.
या परिस्थितीमध्ये 16 आमदार असणाऱ्या काँग्रेसला एमजीपीचे तीन आणि तीन अपक्ष आमदारांचं समर्थन मिळाल्यास बहुमताचा आकडा गाठणं शक्य होईल.
2017 मध्ये झालेल्या गोवा विधानसभा निवडणुकीत कोणत्याही पक्षाला पूर्ण बहुमत मिळालं नव्हतं. काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष ठरला होता. मात्र त्यांना सत्ता स्थापन करता आली नव्हती.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
करमणूक
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
