एक्स्प्लोर

गोव्यात पोटनिवडणुकीच्या मतदानाला सुरुवात, पर्रिकरांनी हक्क बजावला!

पणजी आणि वाळपई मतदारसंघात एकूण सात उमेदवार आपलं नशीब आजमावणार आहेत. पणजी पोटनिवडणुकीत भाजपतर्फे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर, काँग्रेसतर्फे गिरीश चोडणकर, गोवा सुरक्षा मंचतर्फे आनंद शिरोडकर आणि अपक्ष उमेदवार केनेथ सिल्वेरा असे चार उमेदवार रिंगणात आहेत.

पणजी (गोवा) : गोव्यातील पणजी आणि वाळपई मतदारसंघात आज पोटनिवडणूक होत आहे. मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर आणि आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांच्या बरोबरच सरकारचं भवितव्य पणाला लागलं आहे. सकाळी 8 वाजता मतदानाला सुरुवात झाली आहे. ज्येष्ठांसह तरुणांनी मतदानासाठी केंद्रांवर हजेरी लावली आहे. संध्याकाळी 5 पर्यंत मतदान होणार असून 28 ऑगस्टला सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात होईल. मुख्यमंत्री पर्रिकर, आरएसएस नेते सुभाष वेलिंगकर यांनीही सकाळी मतदानाचा हक्क बजावला. पर्रिकरांसह राणेंची प्रतिष्ठा पणाला पणजी आणि वाळपई मतदारसंघात एकूण सात उमेदवार आपलं नशीब आजमावणार आहेत. पणजी पोटनिवडणुकीत भाजपतर्फे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर, काँग्रेसतर्फे गिरीश चोडणकर, गोवा सुरक्षा मंचतर्फे आनंद शिरोडकर आणि अपक्ष उमेदवार केनेथ सिल्वेरा असे चार उमेदवार रिंगणात आहेत. परंतु खरी लढत मनोहर पर्रीकर आणि गिरीश चोडणकर यांच्यात होणार आहे. तर वाळपई मतदारसंघात भाजपतर्फे आरोग्यमंत्री विश्वजित राणे, काँग्रेसतर्फे रॉय नाईक आणि अपक्ष उमेदवार रोहिदास गावकर असे तीन उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. 3 उमेदवार असले तरी विश्वजित राणे आणि रॉय नाईक यांच्यात सामना रंगणार आहे. गोव्यात उद्या पोटनिवडणूक, पर्रिकरांसोबत राणेंचीही प्रतिष्ठा पणाला कुठल्या मतदारसंघात किती मतदार? पणजी मतदारसंघासाठी एकूण 30 मतदान केंद्रांची स्थापना करण्यात आली असून वाळपईसाठी 46 मतदान केंद्र आहेत. पणजीत एकूण 22 हजार 196 मतदार असून त्यात पुरुष 10 हजार 640 तर 11 हजार 556 महिला मतदारांचा समावेश आहे. वाळपईत एकूण 28868 मतदार असून त्यात पुरुष 14 हजार 340 तर महिला 14 हजार 528 यांचा समावेश आहे. दोन्ही मतदारसंघात महिला मतदारांची संख्या पुरुषापेक्षा जास्त असून पणजीत हे प्रमाण 900 च्या आसपास आहे. वाळपईत 150 महिला मतदार अधिक आहेत. गोव्यात पोटनिवडणुकीच्या मतदानाला सुरुवात, पर्रिकरांनी हक्क बजावला! मतदानासाठी सार्वजनिक सुट्टी निवडणुकीनिमित्ताने सोमवारी संध्याकाळपासून ड्राय डे सुरु झाले असून मतदान होईपर्यंत ते चालू राहणार आहेत. पणजी आणि वाळपई पोटनिवडणुकीसाठी बुधवार 23 ऑगस्ट रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. पणजी शहरातील अनेक मतदार चतुर्थीसाठी मंगळवारी 22 रोजीच आपल्या मूळ घरी जाणार असल्याने त्याचा परिणाम मतदानाच्या टक्केवारीवर होण्याची शक्यता आहे. कारण पणजीतील अनेक मतदार चतुर्थीची तयारी करण्यासाठी मूळ घरी जातात. वाळपईमध्ये मात्र तशी शक्यता दिसून येत नाही. निवडणूक यंत्रण सज्ज अनेक ठिकाणी मतदानकेंदाची तयारी पूर्ण करण्यात येत असून काही ठिकाणी केंद्राबाहेर मंडप घालण्याचे काम पूर्ण झालं आहे. मंगळवारी दुपारी निवडणूक अधिकारी मतदानयंत्र आणि इतर सामुग्री घेऊन मतदान केंद्राकडे रवाना झाले आहेत. मतदान केंद्राबरोबर मतदारांसाठी बसण्याची, पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली असून मतदानाठी मतदान यादीत नाव असणं आणि ओळखपत्र सादर करणं आवश्यक आहे. त्यासाठी निवडणूक ओळखपत्र, वोटरस्लिप किंवा इतर ओळखीचा पुरावा द्यावा लागणार आहे. मतदान केंद्रावर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. दोन्ही मतदारसंघासाठी मिळून एकूण 800 सरकारी कर्मचारी-अधिकारी तैनात करण्यात आले असून त्याशिवाय सुमारे 200 पोलिस मतदान केंद्रावरील बंदोबस्तासाठी ठेवण्यात आले आहेत.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

शिवतीर्थ बंगल्याबाहेर गुलाल, विजयी उमेदवारास राज ठाकरेंचा फ्लाईंग किस; उद्धव ठाकरेंची 'मन की बात'
शिवतीर्थ बंगल्याबाहेर गुलाल, विजयी उमेदवारास राज ठाकरेंचा फ्लाईंग किस; उद्धव ठाकरेंची 'मन की बात'
राज्यात MIM ची जोरदार मुसंडी, तब्बल 125 उमेदवार विजयी, छ. संभाजीनगरमध्ये 33 उमेदवार जिंकले
राज्यात MIM ची जोरदार मुसंडी, तब्बल 125 उमेदवार विजयी, छ. संभाजीनगरमध्ये 33 उमेदवार जिंकले
BMC Election : ठाकरेंची 25 वर्षांची सत्ता उलथवणारे भाजपचे शिलेदार; पाहा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
ठाकरेंची 25 वर्षांची सत्ता उलथवणारे भाजपचे शिलेदार; पाहा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
Dhule Municipal Corporation Winners List : धुळे महानगरपालिका निवडणूक निकाल विजयी उमेदवार यादी, भाजपची पुन्हा सत्ता
धुळे महानगरपालिका निवडणूक निकाल विजयी उमेदवार यादी

व्हिडीओ

Ganesh Naik Special Report : गणेश नाईकांचा विजय, विरोधकांचा टांगा पलटी घोडा फरार
Sambhajinagar Municipal Election Result : संभाजीनगरमध्ये ठाकरे नाही तर शिंदेंनाच भाजपचा मोठा धक्का
Ganesh Naik On Navi Mumbai : हा नवी मुंबईच्या जनतेचा विजय, गणेश नाईकांची पहिली प्रतिक्रिया
Eknath Shinde On BMC : मुंबई महापालिकेची सत्ता युतीलाच मिळणार, एकनाथ शिंदेंचा शब्द
Thackeray Brothers : ठाकरेंची पिछाडी का? लोकांपर्यंत पोहोचायला ठाकरे कुठे कमी पडले

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शिवतीर्थ बंगल्याबाहेर गुलाल, विजयी उमेदवारास राज ठाकरेंचा फ्लाईंग किस; उद्धव ठाकरेंची 'मन की बात'
शिवतीर्थ बंगल्याबाहेर गुलाल, विजयी उमेदवारास राज ठाकरेंचा फ्लाईंग किस; उद्धव ठाकरेंची 'मन की बात'
राज्यात MIM ची जोरदार मुसंडी, तब्बल 125 उमेदवार विजयी, छ. संभाजीनगरमध्ये 33 उमेदवार जिंकले
राज्यात MIM ची जोरदार मुसंडी, तब्बल 125 उमेदवार विजयी, छ. संभाजीनगरमध्ये 33 उमेदवार जिंकले
BMC Election : ठाकरेंची 25 वर्षांची सत्ता उलथवणारे भाजपचे शिलेदार; पाहा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
ठाकरेंची 25 वर्षांची सत्ता उलथवणारे भाजपचे शिलेदार; पाहा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
Dhule Municipal Corporation Winners List : धुळे महानगरपालिका निवडणूक निकाल विजयी उमेदवार यादी, भाजपची पुन्हा सत्ता
धुळे महानगरपालिका निवडणूक निकाल विजयी उमेदवार यादी
Navi Mumbai Mahanagarpalika election results 2026 all winner candidate list: नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी वाचा एका क्लिकवर
नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी वाचा एका क्लिकवर
राज ठाकरे रसमलाई म्हणाले, मुंबईतील भाजपच्या विजयानंतर के. अण्णामलाईंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
राज ठाकरे रसमलाई म्हणाले, मुंबईतील भाजपच्या विजयानंतर के. अण्णामलाईंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
MNS Winning candidates BMC Election results 2026: मुंबईतील मनसेच्या विजयी उमेदवारांची यादी, कोण-कोण जिंकलं?
MNS Winning candidates: मुंबईतील मनसेच्या विजयी उमेदवारांची यादी, कोण-कोण जिंकलं?
Mira Bhayandar Mahanagarpalika election results 2026 all winner candidate list: मीरा भाईंदर महानगरपालिका निवडणुकीतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी, कुणाचा झेंडा फडकला?
मीरा भाईंदर महानगरपालिका निवडणुकीतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी, कुणाचा झेंडा फडकला?
Embed widget