एक्स्प्लोर

गोव्याचा 17 हजार कोटींचा अर्थसंकल्प सादर

लोकांनी प्रकृती सुधारणेसाठी केलेल्या प्रार्थनेबाबत व दाखविलेल्या प्रेमाबाबत मुख्यमंत्री पर्रिकर यांनी आभार मानले. गोवा व गोमंतकीय हे माझे विस्तारित कुटुंब आहे, अशा भावनाही पर्रिकरांनी व्यक्त केल्या.

पणजी (गोवा) : राज्याचा 2018-19 सालासाठीचा एकूण 17 हजार 123 कोटी रुपये खर्चाची तरतूद असलेला अर्थसंकल्प मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी काल (22 फेब्रुवारी) विधानसभेत सादर केला. त्यानंतर लगेच पाच महिन्यांसाठी एकूण 7 हजार 134 कोटींचे लेखानुदान मांडून मंजूर करण्यात आले. मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी फक्त सहा मिनिटांचे अर्थसंकल्पीय भाषण केले. हे वर्ष रोजगार निर्मितीचे वर्ष असेल असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. रोजगारनिर्मितीसह शिक्षण क्षेत्रावर भर प्रत्येक खात्यासाठी व क्षेत्रसाठी अर्थसंकल्पीय तरतूद वाढविण्यात आली आहे. 2018-19 या वर्षासाठी एकूण 144.65 कोटींची महसुली वाढ अपेक्षित धरण्यात आली आहे. स्थानिक स्तरावर रोजगार संधी वाढविण्यावर सरकारने भर दिला आहे व त्यासाठी उद्योग, मजूर आणि रोजगार व माहिती तंत्रज्ञान या क्षेत्रंसाठी 548.89 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. वैद्यकीय शिक्षणासह एकूण शिक्षण क्षेत्रसाठी 2 हजार 445 कोटींची तरतूद करण्यात आली आहे, असे पर्रिकर यांनी नमूद केले. अर्थसंकल्पात कोणतेही नवे कर प्रस्ताव किंवा योजना नाहीत, पण हा रोजगाराभिमुख अर्थसंकल्प असून त्यातून मजूर, रोजगारनिर्मिती व शिक्षण या क्षेत्रांवर जास्त भर दिला गेला आहे. गेल्यावर्षी अर्थसंकल्पाचा आकार एकूण 16 हजार 027.01 कोटी रुपये होता. यंदा हे प्रमाण 6.84 टक्क्यांनी वाढले व अर्थसंकल्प 17 हजार 123 कोटी रुपये खर्चाचा झाला. राज्याचा स्वत:चा कर महसूल हा 8 हजार 257 कोटी रुपयांचा आहे. यात केंद्रीय करातील गोव्याच्या वाट्याचाही समावेश आहे. 2019 साली वीज विक्रीसह अन्य स्रोतांद्वारे 13 हजार 664.95 कोटी रुपयांची प्राप्ती होईल, असे सरकारने अपेक्षित धरले आहे. 2017-18 साली हे प्रमाण 12 हजार 576.88 कोटी रुपये एवढे होते. यावेळी 8.65 टक्के वाढ अपेक्षित आहे. 2018-19 साली केंद्रीय करांमध्ये गोव्याचा वाटा 2 हजार 979 कोटी रुपये आहे. गेल्यावर्षी हे प्रमाण 2 हजार 544 कोटी रुपये होते. एकूण 17 टक्के वाढ झाली आहे. करविरहित महसुलाचे प्रमाण 2 हजार 869.33 कोटींनी वाढणार आहे. मुख्यमंत्र्यांचे भाषण संपल्यानंतर पुढील पाच महिन्यांसाठी एकूण 7 हजार 134 कोटी रुपयांचे लेखानुदान मांडून मंजूर करून घेण्यात आले. त्यानंतर लगेच विधानसभा अधिवेशनाचा समारोप करण्यात आला. एकूण चार दिवस कामकाज चालले. अर्थसंकल्पासाठी पर्रिकर गोव्यात मुख्यमंत्री लीलावती इस्पितळातून दुपारी सव्वा साडे अकरा वाजता गोव्यात दाखल झाले व त्यांच्या दोनापावल येथील निवासस्थानी गेले. दुपारी अडीचच्या सुमारास ते पर्वरी येथील विधानसभा प्रकल्पात आले व त्यांनी मंत्रिमंडळाची बैठक घेतली. बैठकीत अर्थसंकल्प मंजूर करण्याचा सोपस्कार पार पाडला गेला. गोवा व गोमंतकीय माझे विस्तारित कुटुंब : पर्रिकर दरम्यान, लोकांनी केलेल्या प्रार्थनेबाबत व दाखविलेल्या प्रेमाबाबत मुख्यमंत्री पर्रिकर यांनी आभार मानले. गोवा व गोमंतकीय हे माझे विस्तारित कुटुंब आहे. गोवा व देशाची सेवा करण्याचे काम मी सुरुच ठेवेन, असे पर्रिकर यांनी जाहीर केले आहे. काही दिवस संवाद मर्यादित राहील, पण माझे काम पार पाडेन : पर्रिकर “लोकांच्या प्रार्थनेमुळेच मला आजारातून लवकर बरे होऊन गोव्यात येता आले. पूर्ण बरे होण्यासाठी मला डॉक्टरांनी तूर्त काही उपाय घेण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे तूर्त माझा लोकांशी संवाद मर्यादित राहील. मात्र मी मुख्यमंत्री म्हणून रोजचे माझे काम व कर्तव्ये पार पाडीन.”, असे मुख्यमंत्र्यांनी पत्रकात नमूद केले आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vinod Tawde EXCLUSIVE : पुढचा मुख्यमंत्री कोण होणार? विनोद तावडेंची स्फोटक मुलाखतDilip Walse Patil : शरद पवार म्हणाले गद्दार, सुट्टी नाही! दिलीप वळसे-पाटलांची पहिली प्रतिक्रियाMahesh Sawant : नरेंद्र मोदींचा इफेक्ट संपला;त्यांची सभा आमच्यासाठी शुभ शकुनPrakash Mahajan on Amit Thackeray : भाजपचा अमित ठाकरेंना पाठिंबा , मोदींच्या सभेचा मनसेला फायदा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Rohit Pawar on Devendra Fadnavis : गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
Donald Trump : तर संविधान बदलावं लागेल! डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा निवडून येताच थेट देशाच्या संविधानालाच हात घातला
तर संविधान बदलावं लागेल! डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा निवडून येताच थेट देशाच्या संविधानालाच हात घातला
Purva Walse Patil : शरद पवारांनी आंबेगावच्या सभेत दिलीप वळसे पाटील यांना गद्दार म्हटलं, पूर्वा वळसे पाटील पाण्याचा मुद्दा काढत म्हणाल्या.. होय...
शरद पवार यांच्याकडून दिलीप वळसे पाटील यांच्यावर आंबेगावत गद्दारीचा शिक्का मारला, पूर्वा वळसे पाटील म्हणाल्या...
Embed widget