एक्स्प्लोर
लालूंच्या गालावर रामदेव बाबांची 'गोल्ड क्रीम'
नवी दिल्ली : योगगुरु रामदेव बाबा यांनी थेट राजदचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांच्यासमोर पतंजलीच्या उत्पादनांचं मार्केटिंग केलं. महत्वाचं म्हणजे अनेक उत्पादनांचा उपयोग, परिणामांचं प्रात्यक्षिकही रामदेव बाबांनी करुन दाखवलं.
रामदेव बाबांनी लालूवर त्यांची उत्पादनं लावली. याशिवाय रामदेव बाबांनी लालूंच्या कपाळ आणि गालावर गोल्ड क्रीमही लावली. लालूंनीही बाबांचं आणि पतंजलीच्या उत्पादनांचं कौतुक करण्यात कसर ठेवली नाही.
शिवाय येणाऱ्या योग दिनाला लालू प्रसाद यादव यांनी सहभागी व्हावं, अशी विनंती रामदेव बाबांनी केली.
लालू यादव आणि रामदेव बाबा यांचे संबंध पूर्वी फारसे चांगले नव्हते. पण आज दोघेही मतभेद विसरुन एकत्र आल्याचं दिसले. रामदेव बाबा भरकटले होते, असं लालू यावेळी म्हणाले. तसंच रामदेव बाबांच्या पतंजलीची उत्पादनं देशासाठी आहेत. मीदेखील घरी हीच उत्पादन वापरत असल्याचं त्यांनी सांगितलं.
यावेळी रामदेव बाबा आणि लालू यादव अगदी धम्माल करताना दिसले. यावेळी दोघांनी आपापल्या खास शैलीत उपस्थितांमध्ये हास्याचे फवारेही उडवले.
पाहा व्हिडीओ
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement