एक्स्प्लोर
घुसखोरी करणाऱ्या 4 दहशतवाद्यांना कंठस्नान, 1 दहशतवादी जिवंत पकडला
जम्मू-काश्मिर: कारगिल विजय दिनानिमित्त एकीकडे शहीदांना श्रद्धांजली अर्पण करीत असताना दुसरीकडे सीमरेषा ओलांडून घुसखोरीच्या प्रयत्नात असणाऱ्या चार दहशवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं आहे. जम्मू-काश्मिरमधील कुपवाड येथे घुसखोरी करणाऱ्या चार दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. तर एका दहशतवाद्याला जिवंत पकडण्यात आल्याचं समजतं आहे.
हे पाचही दहशतवादी भारतात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करीत होते. त्याचवेळी गस्त घालणाऱ्या जवानांची त्यांच्यावर नजर पडली. त्यानंतर त्यांच्यात चकमक सुरु झाली. यामध्ये चौघांना ठार करण्यात आलं. तर एकाला जिवंत पकडण्यात आलं.
पकडलेला दहशतवादी लाहोरमधील:
लष्करी सुत्रांच्या माहितीनुसार, पकडण्यात आलेला दहशतवादी हा लाहोरमधील रहिवासी आहे. त्यानं आपलं नाव बहादूर अली असं सांगितलं आहे. दरम्यान, त्याची कसून चौकशी सुरु आहे. तसेच हे पाचही दहशतवादी हे लश्कर-ए-तोयबाचे सदस्य असल्याचीही माहिती समजते आहे. काल रात्रीच त्यांनी घुसखोरी केली होती.
मोठ्या घातापाताचा कट होता:
एखादा मोठा घातपात घडविण्यासाठी या दहशतवाद्यांनी घुसखोरीचा प्रयत्न केला होता. याआधी देखील अनेकदा दहशतवाद्यांनी घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला होता.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
महाराष्ट्र
Advertisement