एक्स्प्लोर
माजी आमदार पुत्राची गोळ्या झाडून हत्या, बेळगावात खळबळ
गोळीबाराची घटना समजल्यावर काही ग्रामस्थांनी ही घटना नंदीहळ्ळी यांच्या पत्नीला कळवली. लगेच अरुण यांना उपचारासाठी येळ्ळूर के एल ई हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र तिथे डॉक्टरांनी त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले.
बेळगाव : विश्वभारत शिक्षण सेवा संस्थेचे संचालक अरुण परशुराम नंदीहळ्ळी (54) यांची मंगळवारी अज्ञात व्यक्तींनी गोळ्या झाडून हत्या केली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. अरुण नंदीहळ्ळी हे माजी आमदार परशुराम नंदीहळ्ळी यांचे पुत्र आहेत. ते धामणे येथून रात्री साडे अकरा वाजता आपल्या सासुरवाडीत जेवण करून परतत असताना रस्त्यात त्यांची स्विफ्ट कार अडवून गोळ्या झाडून अज्ञात व्यक्तींनी हत्या करून पलायन केले.
गोळीबाराची घटना समजल्यावर काही ग्रामस्थांनी ही घटना नंदीहळ्ळी यांच्या पत्नीला कळवली. लगेच अरुण यांना उपचारासाठी येळ्ळूर के एल ई हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र तिथे डॉक्टरांनी त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. या घटनेची ग्रामीण पोलिसात नोंद झाली आहे.
अरुण यांच्या पत्नीने भाऊबंदकी हेच हत्येमागे कारण असल्याचा संशय व्यक्त केला आहे. पोलीस आयुक्तासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी रात्री लगेच भेट देऊन पाहणी केली. पोलिसांनी हत्येच्या तपासाला प्रारंभ केला असून हत्येमागे भाऊबंदकी आहे की अन्य काही कारण आहे याचा तपास करत आहेत. अरुण नंदीहळ्ळी यांचे दोन विवाह झालेले आहेत. त्यांच्या शिक्षण संस्थेत देखील वाद सुरु आहेत. एक पत्नी धामणे येथे तर दुसरी अनगोळ येथे असते.
अरुण नंदीहळ्ळी यांनी विश्वभारत संस्थेत नोकरी लावतो म्हणून अनेकांकडून पैसे घेतले होते. नोकरी न लागल्यामुळे पैसे दिलेल्यांनी पैसे परत करण्यासाठी तगादा लावला होता. काही दिवसांपासून त्यांना धमकीचे फोनही येत होते. या संबंधी त्यांनी आपल्या कुटुंबीयांना देखील सांगितले होते. काही जण आपल्या मागावर असल्याचे देखील अरुण यांनी आपल्या घरच्यांना सांगितले होते, अशी माहिती मिळाली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement