एक्स्प्लोर

माजी निवडणूक आयुक्तांचे धक्कादायक वक्तव्य, लव जिहादमुळे मुस्लिमांचे नुकसान, शिकलेल्या हिंदू मुली...

S. Y. Qureshi On Love Jihad : माजी निवडणूक आयुक्त एस. वाय. कुरैशी यांनी लव जिहादवर केलेल्या वक्तव्यामुळे आता नवीन वाद सुरू होण्याची शक्यता आहे.

S. Y. Qureshi On Love Jihad : माजी निवडणूक आयुक्त एस. वाय. कुरैशी सध्या चर्चेत आले आहेत. लव जिहादच्या मुद्यावरून त्यांनी केलेल्या एका वक्तव्याची जोरदार चर्चा सुरू आहे. भारतात हिंदू मुली शिकलेल्या मुस्लिम मुलांसोबत विवाह करतात. त्यामुळे लव जिहादचा मोठा फटका मुस्लिम मुलींना बसत असल्याचे त्यांनी सांगितले. कुरैशी यांच्या वक्तव्यावरून आता आणखी एक नवा वाद सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

लव जिहादच्या मुद्यावर दावे-प्रतिदावे, आरोप-प्रत्यारोप सुरू असताना आता कुरैशी यांच्या वक्तव्याची जोरदार चर्चा सुरू झाली. माजी निवडणूक आयुक्त एस. वाय. कुरैशी यांनी सांगितले की, लव जिहाद हा एक प्रपोगंडा आहे. यामध्ये मुस्लिम मुलींचे अधिक नुकसान आहे. या मुस्लिम मुलींच्या नजरेतून पाहिल्यास म्हणता येईल की, शिकलेल्या हिंदू मुली मुस्लिम मुलांसोबत विवाह करतात. त्यामुळे मुस्लिम मुलींना लग्नासाठी योग्य मुलं सापडत नाहीत. लव जिहादमुळे मुस्लिमांना मोठा फटका बसत असल्याचे त्यांनी म्हटले. 

हिजाब वादावर काय म्हणाले?

हिजाब वादावर कुरैशी यांनी म्हटले की, हिजाब कुराणचा भाग नाही. मात्र, मुलींनी सभ्य वेशभूषा करण्याबाबत सुचवण्यात आले आहे. शाळेच्या गणवेशात शीखांना पगडी आणि सिंदूर लावण्याची परवानगी आहे. तर, हिजाबवरून काय त्रास होत आहे असा प्रश्न करत हिजाब आवश्यक आहे की नाही याचा निर्णय मौलवी देतील. कोर्ट सांगू शकत नाही, असेही त्यांनी म्हटले. 

ईव्हीएमवर काय म्हणाले?

ईव्हीएम हॅकिंगचा मुद्दा कुरैशी यांनी फेटाळून लावला. ईव्हीएम विश्वासार्ह असल्याचे त्यांनी सांगितले. यामध्ये छेडछाड करता आली असती तर भाजपने पश्चिम बंगाल विधानसभेची निवडणूक जिंकली असती असेही त्यांनी म्हटले. 

 

इतर महत्त्वाच्या बातम्या:

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Parliament Standing Committee : केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Eknath Khadse : खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis Office : उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या मंत्रालयातील कार्यालयाबाहेर महिलेकडून तोडफोडMaharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 04 PM 27 Sept 2024ABP Majha Headlines : 04 PM: 27 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSanjay Shirsat Mumbai : राऊतांवर दलाल नंबर 1 पिक्चर यायला हवा, शिरसाटांचा टोला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Parliament Standing Committee : केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Eknath Khadse : खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
Haribhau Bagde: हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Devendra Fadnavis : मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, कोणी जाणीवपूर्वक...
मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, कोणी जाणीवपूर्वक...
Sangli News : कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
Pune Gang Rape : पुण्यात धनदांडग्या बापांच्या पोरांच्या विकृतीचा कळस; प्राध्यापकाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार करत नग्नावस्थेत फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाला टाकले
पुण्यात विकृतीचा कळस; प्राध्यापकाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार करत नग्नावस्थेत फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाला टाकले
Embed widget