Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
Mumbai North West Loksabha : मी सहा वाजता गेलो होतो. मतमोजणी पूर्ण झाली नसताना उमेदवाराला विजयी कसं काय घोषित केलं. मी त्यासाठी गेलो होतो, हा रडीचा डाव आहे, असं रवींद्र वायकरांनी म्हटलं आहे.
मुंबई : लोकसभा निवडणुकीत मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार रवींद्र वायकर यांचा केवळ 48 मतांनी विजय झाला. या प्रकरणात आता ईव्हीएम अनलॉक करणारा मोबाईल रवींद्र वायकरांच्या मेव्हण्याकडेच सापडल्यानंतर महाविकास आघाडीतील नेत्यांचा वायकरांवर जोरदार हल्लाबोल करण्यात येत आहे. यावर प्रतिक्रिया देताना रवींद्र वायकर यांनी म्हणाले की, त्यांचा रडीचा डाव सुरू आहे. आतमध्ये किती मोबाईल होते कायद्यात काय असेल तर ते त्यांनी कायद्याने काय असेल ते कारावं. पारदर्शकपणे निवडणूक झाली नसेल तरं कायद्याने काय असेल, ते करावं. मी सहा वाजता गेलो होतो, मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं. मी त्यासाठी गेलो होतो, हा रडीचा डाव आहे, असं वायकरांनी यावेळी सांगितलं आहे.
हा सगळा रडीचा डाव सुरू आहे
रवींद्र वायकर यांनी म्हटलं आहे की, हा सगळा रडीचा डाव सुरू आहे. बाकी काही चाललं नाहीय. दूध का दूध, पानी का पानी होऊन जाईल. हिंदुस्थानमध्ये इलेक्शन झाल्यानंतर सगळ्या ठिकाणचा निकाल लागला, तसाच माझा देखील निकाल लागला. मी सहा वाजेपर्यंत इथेच होतो. त्यानंतर मी मतमोजणी केंद्रावर गेलो. सहा वाजता मी गेलो तेव्हा मला कळलं की, त्या आधीच तुम्ही त्या उमेदवाराला घोषित करून टाकलं. एक लाख मतमोजणीची बाकी असताना त्या आधीच तुम्ही निकाल कसा घोषित केलात, त्यामुळे मी तिथे गेलो, असं वायकर म्हणाले.
मतमोजणी चालू होती, मी तिथे जाऊन फक्त बसलो
मी गेलो त्या ठिकाणी मतमोजणीची प्रक्रिया सुरू होते, त्यामुळे मी तिथे काहीच बोललो नाही. मतमोजणी चालू होती, त्यामुळे मी तिथे जाऊन फक्त बसलो. त्यानंतर साधारण एक ते दीड तासाने निकाल घोषित केला. बॅलेट पेपरची मतमोजणी सकाळी आठ वाजता सुरू झाली. त्यात पंधराशे एक मतं त्यांना मिळाली आहेत आणि 1550 मतं मला मिळालेत. ईव्हीएममध्ये ते एक मताने जिंकले होते. बॅलेट पेपरमध्ये 48 मतांनी मला विजयी घोषित केलं, असं वायकर यांनी पुढे सांगितलं.
एकटा रवींद्र वायकर तिथे काय करणार आहे?
वायकर म्हणाले, हजारो पोलीस, 20 कँडिडेटचे उमेदवार, त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. एकटा तिथे रवींद्र वायकर जाऊन काय करणार आहे. रडीचा डाव चाललेला आहे. ही हार त्यांच्या जिव्हारी लागली आहे. त्यांच्या या रडीच्या डावाला मी काही महत्त्व देत नाही. निवडणूक आयोगाने जो निर्णय घेतलेला आहे, तो योग्य घेतलेला आहे.
EVM असं कसं हॅक करता येईल?
दुसरा प्रश्न जो मोबाईल संदर्भातला आहे, तर त्यावेळी आतमध्ये किती जण मोबाईल घेऊन होते? तुम्हालाही आतून बातम्या मिळत असतील? किती जणांकडे मोबाईल असतील? यामध्ये 188 च्या कायद्याप्रमाणे जो काही 500 रुपयांचा वगैरे काही नसेल तसं करावं ना. कुणी, कुणाचा नातेवाईक आहे, म्हणून त्याने ते ईव्हीएम हॅक केली. EVM असं कसं हॅक करता येईल? मला काय याविषयी बोलावसं वाटत नाही तरी, मी आत्ता एक्सप्लेन केलेलं आहे. पारदर्शकतेने झालं नसेल, तर कायदा आहे. मग हिंदुस्थानातली देखील निवडणूक पारदर्शक झाली नाही. निवडणूक ही पारदर्शकच झाली आहे. रडीचा डाव आता त्यांनी थांबवावा, असंही ते म्हणाले आहेत.