एक्स्प्लोर

GPS Toll: GPS आधारीत टोल म्हणजे काय, कोणत्या देशात सुरू आहे अशी टोल वसुली? जाणून घ्या

GPS Based Toll Collection : देशात आता जीपीएस आधारीत टोल वसुली सुरू करण्यासाठी सरकारने हालचाली सुरू केल्या आहेत. जाणून घ्या ही जीपीएस आधारीत टोल वसुली आणि तिचे फायदे...

GPS Based Toll Collection : टोलच्या रांगेतून वाहनांची सुटका करण्यासाठी केंद्र सरकारने फास्टॅग लागू केला होता. आता फास्टॅगही संपुष्टात येणार असल्याची शक्यता असून जीपीएस आधारे टोल वसुली होणार आहे. सॅटेलाइट नेव्हिगेशन टोलिंग सिस्टिम ही नवी यंत्रणा लागू करण्यासाठी केंद्र सरकारनं चाचण्या सुरु केल्या आहेत. त्यात देशभरातील 1 लाखांहून अधिक वाहनांचा समावेश आहे. जीपीएस आधारीत टोल वसुली कशी होणार, कोणत्या देशात हा प्रयोग झालाय, जाणून घेऊयात 

जीपीएस आधारीत टोल वसुली म्हणजे काय?

सध्या बहुतांशी नव्या वाहनांमध्ये जीपीएस यंत्रणा असते. संबंधित वाहनाने प्रवास केलेल्या मार्गावरून टोल वसूल केला जाणार. टोलची रक्कम ही वाहनधारकाच्या बँक खात्यातून अथवा ई-वॉलेटमधून कापण्यात येईल. ज्या वाहनांमध्ये जीपीएस यंत्रणा नसणार, अशा वाहनांसाठी जीपीएस लावण्यासाठी सरकार निर्णय घेणार असल्याचे याआधी परिवहन, रस्ते महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले होते. 

कोणत्या देशात GNSSचा वापर?

Global Navigation Satellite System (GNSS) चा वापर करून काही देशांमध्ये टोल आकारणी केली जाते. युरोपमधील काही देशांमध्ये 3.5 टन वजनापेक्षा अधिक वाहनांकडून टोल आकारणी केली जाते. यामध्ये जर्मनी, स्लोव्हाकिया, हंगेरी, बेल्जियम, रशिया, चेक प्रजासत्ताक, बल्गेरिया आदी देशांमध्ये ही GNSS चा वापर करून  टोल आकारला जातो. पोलंडनेदेखील मागील वर्षी GNSS आधारीत टोल वसूल करण्याचा निर्णय घेतला. 

जीपीएस आधारीत टोलचा काय फायदा?

जीपीएस आधारीत टोल वसुली सुरू झाल्यास टोल नाक्यावर होणारी वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर कमी होईल असा दावा करण्यात येतो. टोल नाकेही हटवण्यात येतील. थेट टोल वसुली होणार असल्याने वाहने वाहतूक कोंडीत अडकणार नाहीत. 

वेळ आणि इंधनाची बचत

जीपीएस तंत्रज्ञानाच्या मदतीने देशभरातील टोलनाक्यांवरील कोट्यवधी प्रवाशांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे. वाहतूक कोंडी न झाल्याने इंधनाची बचत होईल. त्याशिवाय प्रवासाला कमी वेळ लागेल. 

FAStag नेमकं काय आहे? त्याने काय सुविधा मिळते?

फास्टटॅग म्हणजे एक डिजिटल स्टिकर आहे. हे स्टिकर गाडीच्या समोरच्या काचेवर लावलं जातं. रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन टेक्नॉलॉजी म्हणजे RFID तंत्रज्ञानावर हे स्टिकर काम करतं. या टेक्नॉलीजीच्या मदतीने टोल नाक्यांवर लागलेले कॅमेरे स्टिकरवरील बारकोड स्कॅन करतात आणि FASTag खात्यातून टोलची रक्कम वजा होते. रोख पैशांचे व्यवहार न करता टोल भरण्यासाठी या फास्टॅगचा वापर होतो. टोलचे पैसे देण्यासाठी वाहनांना टोलनाक्यावर थांबण्याचीही गरज लागत नाही. त्यामुळे वाहनचालकांना वेळ वाचतो, इंधनाची बचत होते. 

महत्त्वाच्या बातम्या

Tiger Shroff: टायगर श्रॉफवर गोळी झाडणाऱ्यांना अटक, दिल्लीमार्गे नेपाळला जाण्याची तयारी; अटकेनंतर पोलिसांनी दिली माहिती
टायगर श्रॉफवर गोळी झाडणाऱ्यांना अटक, दिल्लीमार्गे नेपाळला जाण्याची तयारी; अटकेनंतर पोलिसांनी दिली माहिती
Tiger Shroff Car Firing Marathi News: अंदाज खरा ठरला, एक आरोपी अल्पवयीन निघाला, दुसरा आरोपी मुंबईतील रॅपिडो रायडर; टायगर श्रॉफवरील हल्लेखोर सापडले, कुठेकुठे लपले?
अंदाज खरा ठरला, एक आरोपी अल्पवयीन निघाला, दुसरा आरोपी मुंबईतील रॅपिडो रायडर; टायगर श्रॉफवरील हल्लेखोर सापडले, कुठेकुठे लपले?
टायगर श्रॉफवरील हल्ल्याची लॉरेन्स बिश्नोई गँगने स्वीकारली जबाबदारी; ऑडिओ क्लीप, फेसबुक पोस्ट जारी
टायगर श्रॉफवरील हल्ल्याची लॉरेन्स बिश्नोई गँगने स्वीकारली जबाबदारी; ऑडिओ क्लीप, फेसबुक पोस्ट जारी
बाबा सिद्दीकींना संपवलं, सलमान खान, रोहित शेट्टीनंतर टायगर श्राॅफ टार्गेटवर; मुंबईत कायदा-सुव्यवस्थेचा बोजवारा
बाबा सिद्दीकींना संपवलं, सलमान खान, रोहित शेट्टीनंतर टायगर श्राॅफ टार्गेटवर; मुंबईत कायदा-सुव्यवस्थेचा बोजवारा

व्हिडीओ

Mumbai Police PC On Tiger Shroff Firing : टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण, पोलिसांची ईनडिटेल प्रेस | ABP Majha
Kolhapur Gokul : गोकुळ दूध संघाच्या मतमोजणीला वेग; दुसरी फेरी सुरू
Anandache Paan : 'आठवणींची साठवण' आणि 'सहवास प्रतिभावंतांचा', लेखक अशोक कोठावळे यांच्यासोबत संवाद
Mann Suddha Tujha Season 3 : युरेका...युरेका | मन सुद्ध तुझं | Episode 3 | ABP Majha
Shetitil Navdurga | Seema Chavan | पिकं बदलत गेली… पण भरघोस उत्पन्नाचा तिचा ध्यास कधीच बदलला नाही!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik: अर्धनग्न पूजा ते दैवी अन् अघोरी शक्तीने पैशाचा पाऊस पाडण्याचा बहाणा, नाशिकच्या भोंदूने पनवेलच्या पीडितेसोबत नको-नको ते केलं; अंनिसच्या प्रयत्नांनंतर अखेर गुन्हा दाखल
अर्धनग्न पूजा ते दैवी अन् अघोरी शक्तीने पैशाचा पाऊस पाडण्याचा बहाणा, नाशिकच्या भोंदूने पनवेलच्या पीडितेसोबत नको-नको ते केलं; अंनिसच्या प्रयत्नांनंतर अखेर गुन्हा दाखल
Satej Patil : गोकुळच्या निवडणुकीत महायुतीला फटका, सतेज पाटलांच्या विजयाची इनसाईड स्टोरी, सहा प्रमुख मुद्दे
गोकुळच्या निवडणुकीत महायुतीला फटका, सतेज पाटलांच्या विजयाची इनसाईड स्टोरी, सहा प्रमुख मुद्दे
Elon Musk : इलॉन मस्क यांची मोठी घोषणा, अमेरिकेतील प्रत्येक मुलाला SpaceX चा एक शेअर देणार, मस्क यांच्या घोषणेचं नेमकं कारण काय?
इलॉन मस्क यांची मोठी घोषणा, अमेरिकेतील प्रत्येक मुलाला SpaceX चा एक शेअर देणार 
Gokul Election Result: कोल्हापूरकरांचा विषयच हार्ड! जयंत पाटील यांची गोकुळच्या निकालावर पोस्ट, सतेज पाटील यांचं अभिनंदन
कोल्हापूरकरांचा विषयच हार्ड! जयंत पाटील यांची गोकुळच्या निकालावर पोस्ट, सतेज पाटील यांचं अभिनंदन
आमचा रांगडा पाटील जिंकला, धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले; आता, शिक्षक-पदवीधरचं सोनंही आम्हीच लुटणार
आमचा रांगडा पाटील जिंकला, धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले; आता, शिक्षक-पदवीधरचं सोनंही आम्हीच लुटणार
'गोकुळ'मध्ये महायुतीचा पराभव, मुलगाही पडला; मंत्री हसन मुश्रीफांची प्रतिक्रिया, सांगितलं परभवाचं राज'कारण'
'गोकुळ'मध्ये महायुतीचा पराभव, मुलगाही पडला; मंत्री हसन मुश्रीफांची प्रतिक्रिया, सांगितलं परभवाचं राज'कारण'
JIO IPO : जिओच्या आयपीओसाठी अँकर इन्वेस्टर्सची 30 पट मागणी, 8110 कोटींसाठी अडीच लाख कोटींची बोली, विदेशी आणि भारतीय फंड हाऊसेसचा दमदार प्रतिसाद
जिओच्या आयपीओसाठी अँकर इन्वेस्टर्सची 30 पट मागणी, विदेशी आणि भारतीय फंड हाऊसेसचा दमदार प्रतिसाद
“दहा हजार मते जर बाद होत असतील, तर अशा पदवीधर आणि शिक्षकांना पदवी कोणी दिली, हे तपासावे लागेल''; फडणवीसांची मश्किल टिपण्णी
“दहा हजार मते जर बाद होत असतील, तर अशा पदवीधर आणि शिक्षकांना पदवी कोणी दिली, हे तपासावे लागेल''; फडणवीसांची मश्किल टिपण्णी
Embed widget