(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Aditya Thackeray On EVM : ईव्हीएम नसतं तर भाजपला 40 जागा देखील मिळाल्या नसत्या, आदित्य ठाकरेंचा टोला
Aditya Thackeray On EVM : ईव्हीएम नसतं तर भाजपला 40 जागा देखील मिळाल्या नसत्या, आदित्य ठाकरेंचा टोला
हे देखील वाचा
अजितदादा केंद्रात कुणाला मंत्री करणार? मंत्रिपदही पत्नीला की निष्ठावान नेत्याला? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
मुंबई : राष्ट्रवादीच्या (NCP) कोट्यात कॅबिनेट मंत्री पद आलं तर ते मलाच मिळणार, योग्य वेळ आल्यावर योग्य निर्णय होईल. सुनेत्रा पवारांच्या (Sunetra Pawar) नावाची चर्चा सुरू असताना अजित पवार गटाचे (Ajit Pawar) नेते प्रफुल पटेल (Praful Patel) यांनी मोठं वक्तव्य केले आहे. छगन भुजबळांसह 13 इच्छुकांना बाजूला ठेवत अजित पवारांनी राज्यसभेच्या खासदारकीची माळ पत्नी सुनेत्रा यांच्या गळ्यात घातली. बिनविरोध निवड निश्चित झाल्यावर रॅलीही निघाली. काहींनी दबकत नाराजी व्यक्त केली तर काहींनी मनातच नाराजीचा गळा घोटला. आता हा विषय संपला असं म्हणत नेत्यांसह कार्यकर्तेही दुसऱ्या कामाला लागले. मात्र हा विषय संपला नाही तर खरा आता सुरू झालाय..
अजित पवारांच्या राष्ट्रवादीतून मोदींच्या कॅबिनेटमध्ये मंत्री कोण होणार? पत्नीला मागच्या दारानं संसदेत एन्ट्री मिळवून दिल्यानंतर, अजित पवार मंत्रिपद घरातच ठेवणार की निष्ठावान नेत्याला देणार? आता हे प्रश्न उपस्थित करण्यामागचं कारणही तसंच आहे.मंत्री बनण्यासाठी अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा या उत्सुक आहेत. तर दुसरीकडे, मीच मंत्री होणार असा प्रफुल्ल पटेल यांना पूर्ण विश्वास आहे. तर केंद्रात मंत्रिपद मिळालं तर काम करायलं आवडेल, असे सुनेत्रा पवार म्हणाल्या. थोडक्याच अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मंत्रिपदासाठी रस्सीखेच सुरू असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे.