(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Punjab Govt : 'मान' सरकारचा मोठा निर्णय, पंजाबमध्ये आता घरोघरी पोहोचणार रेशन
पंजाबमधील 'आप' सरकार आता घरोघरी रेशन पोहोचवणार आहे. 75 वर्षापासून चालत आलेली जुनी व्यवस्था बदलणार असल्याचे मुख्यमंत्री भगवंत मान (Bhagwant Mann) यांनी सांगितले.
Punjab Govt : पंजाबमध्ये सत्ता स्थापन केलेल्या आम आदमी पार्टीने मोठा निर्णय घेतला आहे. 'आप' सरकार आता पंजाबमध्ये घरोघरी रेशन पोहोचवणार आहे. 75 वर्षापासून चालत आलेली जुनी व्यवस्था बदलणार असल्याचे मुख्यमंत्री भगवंत मान (Bhagwant Mann) यांनी सांगितले. ही योजना सुरू केल्यामुळं राज्यातील आम आदमी पक्षाचं सरकार घरोघरी रेशन पोहोचवणार आहे. ही योजना ऐच्छिक असली तरी. लोक रेशन दुकानातून रेशन घेऊ शकतील असेही मान यांनी सांगितले.
सरकारने डोअर स्टेप डिलिव्हरी योजना सुरु करण्याचा निर्णय गेतला आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी सरकारने तयारी सुरु केली आहे. अधिकारी फोन करुन वेळ घेतल्यानंतर घरोघरी रेशन पोहोचवतील. यापूर्वी ही योजना दिल्लीतील अरविंद केजरीवाल सरकारने लागू केली होती. मात्र, केंद्र सरकारने दिल्लीत ही योजना बंद केली होती. आता ही योजना पंजाबमध्ये सुरु करण्यात येणार आहे.
आज़ादी के 75 साल बाद भी हमारे लोग कतारों में खड़े हैं। आज हम ये सिस्टम बदलने जा रहे हैं।
— Bhagwant Mann (@BhagwantMann) March 28, 2022
अब हमारी बुजुर्ग माताओं को राशन के लिए घंटो लाइन में नहीं लगना पड़ेगा। किसी को अपनी दिहाड़ी नहीं छोड़नी पड़ेगी।
आज मैंने फैसला लिया है कि आपकी सरकार आपके घर राशन पहुंचाएगी। pic.twitter.com/GxgCcCDfPw
या योजनेबाबत माहिती सांगणारे ट्वीट मुख्यमंत्री भगवंत मान यांनी केले आहे. यामध्ये त्यांनी असे म्हटले आहे की, 'स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतरही आमचे लोक रांगेत उभे आहेत. आज आपण ही व्यवस्था बदलणार आहोत. आता आमच्या वृद्ध मातांना रेशनसाठी तासन् तास रांगेत उभे राहावे लागणार नाही. कोणालाही रोजची मजुरी सोडावी लागणार नाही. आज मी ठरवले आहे की तुमचे सरकार तुमच्या घरी रेशन पोहोचवेल, असे भगवंत मान यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे.
मुख्यमंत्री झाल्यापासून भगवंत मान एकापाठोपाठ एक मोठे निर्णय घेत आहेत. यापूर्वी भगवंत मान यांनी आमदारांच्या पेन्शनमध्ये बदल करण्याची घोषणा केली होती. भगवंत मान यांच्या म्हणण्यानुसार, आतापासून आमदारांना एकदाच पेन्शन मिळणार आहे. आत्तापर्यंत प्रत्येक वेळी आमदार झाल्यावर पेन्शनची रक्कम जोडली जायची. इतकंच नाही तर आमदारांच्या कुटुंबीयांना मिळणाऱ्या पेन्शनमध्ये कपात करण्याची घोषणाही मान यांनी केली आहे. या निर्णयामुळं वाचणारे कोट्यवधी रुपये गरीब कल्याणासाठी वापरले जातील, असेही मान यांनी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या: