कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांची 22 जुलैपासून 'शेतकरी संसद', जंतर-मंतरवर आंदोलन
22 जुलैपासून संसदेचं पावसाळी अधिवेशन संपेपर्यंत 'शेतकरी संसद' आयोजित करण्यात येणार आहे. या आंदोलनासाठी सिंघू सिमेवरुन दररोज 200 शेतकरी आंदोलनासाठी जंतर-मंतरवर एकत्र येणार आहेत.
Farmers Protest : शेतकरी संघटनांनी मंगळवारी बोलताना, संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरु असताना जंतर-मंतरवर 'शेतकरी संसद' आयोजित करणार आहेत. 22 जुलैपासून दररोज सिंघू सीमेवरुन 200 आंदोलक शेतकरी जंतर-मंतरवर दाखल होतील. यापूर्वी दिल्ली पोलीस अधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीत एका शेतकरी नेत्यानं म्हटलं की, "शेतकरी नवे कृषी कायदे मागे घेण्याच्या मागणीसाठी जंतर-मंतरवर शांततेत आंदोलन करणार आहेत. हे आंदोलन शांततेत पार पडले, यापैकी एकही शेतकरी संसदेत सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनात व्यत्यय आणणार नाही."
शेतकरी नेते म्हणाले की, "आम्ही 22 जुलैपासून पावसाळी अधिवेशन संपेपर्यंत 'शेतकरी संसद' आयोजित करणार आहोत. 200 आंदोलक दरदिवशी जंतर-मंतरवर पोहोचणार आहेत. प्रत्येक दिवशी एक अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडले जातील. पहिल्या दोन दिवसांदरम्यान, एपीएमसी अधिनियमवर चर्चा होणार आहेत. त्यानंतर इतर विधेयकांवरही दररोज चर्चा करण्यात येईल."
राष्ट्रीय शेतकरी मजूर महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष शिव कुमार कक्का यांनी सांगितलं की, 22 जुलैपासून दररोज 200 शेतकरी ओळखपत्रासह सिंघू सिमेवरुन जंतर-मंतरवर आंदोलन करण्यासाठी जाणार आहेत.
केंद्रीय कृषी कायद्याविरोधात शेतकरी आंदोलनाचं नेतृत्त्व करणारे 40 हून अधिक शेतकरी संघटनांच्या संयुक्त संस्था संयुक्त किसान मोर्चा (एसकेएम) ने योजना तयार केली होती की, 22 जुलैपासून दररोज जवळपास 200 शेतकरी पावसाळी अधिवेशना दरम्यान संसदेबाहेर कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणार आहेत.
कक्का म्हणाले की, "आम्ही पोलिसांना या आंदोलनासंदर्भात माहिती दिली आहे. दररोज 200 शेतकरी ओळखपत्रासह सिंघू सिमेवरुन जंतर-मंतरवर आंदोलन करण्यासाठी जाणार आहेत. हे आंदोलन शांततेत पार पडेल." पुढे बोलताना ते म्हणाले की, "जेव्हा पोलिसांनी आम्हाला आंदोलकांची संख्या कमी करण्यासाठी सांगितलं, त्यावेळी आम्ही त्यांना कायदा आणि सुव्यवस्थेवर लक्ष केंद्रीत करण्यास सांगितलं आणि आंदोलन शांततेत पार पडेल असं आश्वासनही दिलं."
महत्त्वाच्या इतर बातम्या :