एक्स्प्लोर
फैजाबादचं नाव आता अयोध्या, योगी आदित्यनाथांची घोषणा
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे भाषण सुरु असताना प्रेक्षकातून 'योगीजी फक्त एक काम करा, राम मंदिराचे निर्माण करा' अशा घोषणा दिल्या जात होत्या
लखनौ : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी फैजाबाद जिल्ह्याचे नाव बदलून अयोध्या केले आहे. अयोध्येतील दीपोत्सव कार्यक्रमादरम्यान फैजाबादच्या नामांतरासोबत आणखी काही महत्वाच्या घोषणा योगींनी केल्या.
योगी आदित्यनाथ यांनी अयोध्येतील मेडिकल कॉलेजचे नाव राजर्षी दशरथ असे ठेवले, तर भगवान श्रीराम यांचे नाव विमानतळाला देण्याची घोषणा त्यांनी केली. यापूर्वीच योगी आदित्यनाथांनी अलाहाबादचे नाव बदलून प्रयागराज केले आहे.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे भाषण सुरु असताना प्रेक्षकातून 'योगीजी फक्त एक काम करा, राम मंदिराचे निर्माण करा' अशा घोषणा दिल्या जात होत्या. 'अयोध्येच्या नावाने आजपासून हा जिल्हा ओळखला जाईल, अयोध्या आमच्या प्रतिष्ठेचा मुद्दा आहे. अयोध्येची ओळख मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्रीरामांमुळे आहे.' असं यावेळी योगी म्हणाले.
अयोध्येला काय पाहिजे, हे आज देशाला समजेल. जगातील कोणतीच शक्ती अयोध्येसोबत अन्याय करु शकत नाही, असे आश्वासन मी देतो. माझ्यापूर्वी कोणताही मुख्यमंत्री येथे आला नव्हता, पण गेल्या दीड वर्षात मी सहा वेळा आलो, कारण अयोध्येचा विकास करण्याची आमची इच्छा आहे, असे योगी आदित्यनाथ म्हणाले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement