एक्स्प्लोर

Arvind Kejriwal: मोठी बातमी: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीकडून अटक

Arvind Kejriwal: सक्तवसुली संचलनालयाकडून अरविंद केजरीवाल यांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांना अटक केल्यामुळे आता त्यांची रवानगी तुरुंगात होणार आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी आम आदमी पक्षाला मोठा धक्का.

नवी दिल्ली: दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा (AAP) अरविंद केजरीवाल यांना गुरुवारी रात्री सक्तवसुली संचलनालयाकडून अटक करण्यात आली. आज संध्याकाळी ईडीचे अधिकारी त्यांच्या घरी पोहोचले तेव्हाच त्यांच्यावर कारवाई होणार असल्याची कुणकुण लागली होती. ईडीच्या अधिकाऱ्यांनी अरविंद केजरीवाल यांच्या घरी काहीवेळ तपास केला. त्यानंतर साधारण दोन तासांनी ईडीच्या अधिकाऱ्यांनी अरविंद केजरीवाल (CM Arvind Kejriwal) यांना अटक केली. दिल्लीतील मद्य घोटाळा प्रकरणात अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आली आहे. अरविंद केजरीवाल यांना मद्य घोटाळा प्रकरणात नऊवेळा समन्स बजावण्यात आले होते. मात्र, अरविंद केजरीवाल एकदाही ईडीच्या चौकशीला हजर राहिले नव्हते.  अखेर गुरुवारी संध्याकाळी ईडीचे अधिकारी त्यांच्या घरी पोहोचले. सुरुवातीला त्यांची चौकशी होईल, असे सांगण्यात आले होते. मात्र, दोन तासांच्या चौकशीनंतर ईडीने अरविंद केजरीवाल यांना ताब्यात घेतले. ईडीच्या या कारवाईमुळे आम आदमी पक्षाला मोठा धक्का बसला आहे. ईडीच्या कारवाईनंतर आपचे कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झाले आहेत. कोणत्याही परिस्थितीत अरविंद केजरीवाल हेच दिल्लीचे मुख्यमंत्री राहतील, असे आपकडून सांगण्यात आले.

अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आली. हे एक राजकीय षडयंत्र आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हेच राहतील. त्यांना तुरुंगात सरकार चालवावे लागले तरी हरकत नाही. मात्र, मुख्यमंत्री केजरीवाल हेच राहतील. ईडीकडून अनेक धाडी टाकण्यात आल्या मात्र, त्यातून एक रुपयाही त्यांना मिळाला नाही. आज लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर अटक करण्यात आली. हे एक षडयंत्र आहे. अरविंद केजरीवाल माणूस नाहीत, ते एक विचार आहेत, अशी प्रतिक्रिया आपच्या नेत्या आतिशी मारलेना यांनी व्यक्त केली आहे.

काय आहे दिल्ली मद्यघोटाळा प्रकरण? 

1. दिल्लीतील कथित दारू घोटाळ्याप्रकरणी सिसोदिया यांना अटक करण्यात आली आहे. हे प्रकरण 2021 मध्ये सादर केलेल्या दिल्लीच्या नवीन दारू विक्री धोरणाशी संबंधित आहे (आता रद्द करण्यात आले आहे). केजरीवाल सरकारने 2021 मध्ये मद्यविक्रीसाठी नवीन धोरण तयार केले होते. ज्यामध्ये कथित घोटाळ्याचा आरोप आहे. वाद वाढल्यानंतर तो रद्दही करण्यात आला.

2. या धोरणात सरकारचा दारूविक्रीशी काहीही संबंध नसून केवळ खासगी दुकानांनाच दारू विक्री करण्याची परवानगी होती. मद्याचा काळाबाजार रोखणे, महसूल वाढवणे आणि ग्राहकांचा चांगली सुविधा मिळावी हा त्याचा मुख्य उद्देश होता. मनीष सिसोदिया हे दिल्लीच्या उत्पादन शुल्क विभागाचे प्रमुख आहेत. त्यामुळे त्यांच्यावर घोटाळ्याचा आरोप करण्यात आले आहेत. 

3. या धोरणांतर्गत दिल्लीत मद्याची होम डिलिव्हरी आणि दुकाने पहाटे 3 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली होती. परवानाधारक मद्यावर अमर्यादित सूट देखील देऊ शकत होते.

4. नव्या धोरणात तरुणांचे दारू पिण्याचे वयही कमी करण्यात आले. त्यावरून बराच गदारोळ झाला. केजरीवाल सरकार तरुणांना नशेच्या आहारी ढकलत असल्याचा आरोप भाजपने केला.

5. दिल्ली सरकारने या धोरणातून उत्पन्नात लक्षणीय 27 टक्के वाढ नोंदवली. ज्यामुळे सुमारे 8,900 कोटी रुपये उत्पन्न झाले. याचदरम्यान दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने आणि दिल्लीचे नायब राज्यपाल व्हीके सक्सेना यांनी या प्रकरणात गैरप्रकार झाल्याची भीती व्यक्त केली. या धोरणाविरोधात उपराज्यपालांनी सीबीआय चौकशीचे आदेश दिले होते.

6. सीबीआयने दाखल केलेल्या आरोपपत्रात सिसोदिया यांचे नाव अद्याप आलेले नाही, परंतु गेल्या वर्षी सीबीआयने त्यांच्या घरासह 31 ठिकाणी छापे टाकले आणि आता त्यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी यापूर्वीही अनेकांना अटक करण्यात आली आहे.

7. सीबीआयशिवाय ईडीही या घोटाळ्याची चौकशी करत आहे. मगुंथा श्रीनिवासुलरेड्डी यांचा मुलगा मगुंथा राघव याला ईडीने अलीकडेच अटक केली आहे. ईडीचा दावा आहे की, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीतील दारू व्यवसायासंदर्भात मागुंता श्रीनिवासुलरेड्डी यांची भेट घेतली होती.

8. याआधी सीबीआयने तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांची कन्या कविताचे पूर्वी चार्टर्ड अकाउंटंट असलेले बुचीबाबू गोरंतला यांना अटक केली होती. 12 डिसेंबर रोजी सीबीआयच्या पथकाने कविता यांची देखील हैदराबादमध्ये 7 तासांपेक्षा जास्त वेळ चौकशी केली होती. कविता या दक्षिण कार्टेलचा भाग असल्याचा आरोप केंद्रीय यंत्रणेने केला होता, तसेच त्यांना मद्य धोरण प्रकरणात लाच घेतल्यामुळे फायदा झाला होता, असा आरोप आहे.

9. सीबीआय एफआयआरमधील आरोपी क्रमांक एक असलेल्या सिसोदिया यांची मागील वर्षी 17 ऑक्टोबर रोजी चौकशी करण्यात आली होती. याच्या एक महिन्यानंतर 25 नोव्हेंबर रोजी सीबीआयने या प्रकरणात आरोपपत्र दाखल केले.

10. सीबीआयच्या आरोपपत्रात सिसोदिया यांचे नाव नव्हते. कारण त्यावेळी सीबीआयचा इतर संशयित आणि आरोपींविरुद्ध तपास सुरू होता.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Saif Ali Khan : गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
Jalgaon Train Accident : जळगाव रेल्वे अपघातात 13 मृत्यू, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार? 
जळगाव रेल्वे अपघातात 13 मृत्यू, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार? 
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM : एबीपी माझा हेडलाईन्स : 22 Jan 2025 : ABP MajhaCentral Department On Bangladeshiबांगलादेशी घुसखोरांविरोधात कठोर कारवाईचे महाराष्ट्र सरकारला आदेशBird flu Maharashtra | राज्यात बर्ड फ्ल्यूने पोल्ट्री व्यावसायिकांचं वाढवलं टेंशन Special ReportSpecial Report Walmik Karadवाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी; न्यायालयीन कोठडीचा अर्थ काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Saif Ali Khan : गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
Jalgaon Train Accident : जळगाव रेल्वे अपघातात 13 मृत्यू, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार? 
जळगाव रेल्वे अपघातात 13 मृत्यू, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार? 
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
Jalgaon Train Accident : जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
लाडक्या बहिणीचे पैसे परत घेतले तर याद राखा, गाठ आमच्याशी; खडसेंची आदिती तटकरेंवर बोचरी टीका
लाडक्या बहिणीचे पैसे परत घेतले तर याद राखा, गाठ आमच्याशी; खडसेंची आदिती तटकरेंवर बोचरी टीका
Jalgaon train accident अफवेनं घात केला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जळगाव रेल्वे अपघाताने 8 ते 9 कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
अफवेनं घात केला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जळगाव रेल्वे अपघाताने 8 ते 9 कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून दखल; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना कारवाईचे निर्देश
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून मोठा निर्णय; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना लेखी निर्देश
Embed widget