एक्स्प्लोर

Bihar Election 2020 | कोरोना लसीच्या मोफत वाटपाचे आश्वासन देणे हे निवडणूक आचारसंहिते उल्लंघन नाही: निवडणूक आयोग

बिहार निवडणूकीत भाजपने त्यांच्या जहीरनाम्यात दिलेले कोरोनाच्या मोफत लसीचे आश्वासन हे आचारसंहितेचे उल्लंघन नसल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.मतदारांचा विश्वास केवळ अशाच आश्वासनाने जिंकायला हवा जी पूर्ण केली जाऊ शकतील असे निवडणूक आयोगाने मत मांडले.

नवी दिल्ली: बिहार विधानसभा निवडणूकीसाठी भाजपच्या जाहीरनाम्यात देण्यात आलेल्या कोरोनाच्या लसीच्या मोफत वाटपाचे आश्वासन हे निवडणूक आयोगाच्या आदर्श आचार संहितेचे उल्लंघन नसल्याचे केंद्रीय निवडणूक आयोगोने स्पष्ट केलंय. यासंदर्भात आरटीआय कार्यकर्ता साकेत गोखले यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केलेल्या तक्रारीवर उत्तर देताना निवडणूक आयोगोने सांगितले की त्यांना या प्रकरणात आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन झाल्याचे दिसत नाही. साकेत गोखले यांनी भाजपचे मोफत कोरोना लसीचे आश्वासन हे पक्षपातीपूर्ण आणि निवडणूकीदरम्यान केंद्र सरकाद्वारे सत्तेचा दुरुपयोग असल्याचा दावा केला होता.

निवडणूक आयोगाच्या आदर्श आचारसंहितेच्या आठव्या खंडात जाहीरनाम्यासंदर्भात निर्देशक तत्वे आहेत. याचा आधार घेऊन निवडणूक आयोगाने मोफत कोरोना लसीचे आश्वासन हे आचार संहितेचे उल्लंघन नाही असे स्पष्ट केले आहे.

भारतीय संविधानात राज्यांच्या मार्गदर्शक तत्वांमध्ये असे सांगितले आहे की सामान्य नागरिकांच्या कल्याणासाठी राज्य योजना तयार करु शकते आणि निवडणूकीच्या जाहीरनाम्यात मोफत लसीचे वाटप करण्याचे आश्वासन दिल्याने आचारसंहितेचे कोणतेही उल्लंघन होत नाही. निवडणूक आयोगाने असेही सांगितले की मतदारांचा विश्वास केवळ अशाच आश्वासनाने जिंकायला हवा जी पूर्ण केली जाऊ शकतील.

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केली होती घोषणा शुक्रवारी साकेत गोखले यांनी केंद्र सरकारने केलेली मोफत आश्वासनाची घोषणा ही केवळ एका राज्यासाठी केली आहे आणि त्या राज्यात आता विधानसभा निवडणूका सुरु आहेत अशा प्रकारचे एक ट्विट केले होते. 22 ऑक्टोबर रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी बिहारच्या निवडणूकीसाठी भाजपचा जाहीरनामा घोषित केला होता ज्यात आयसीएमआरने कोरोनाच्या लसीला मंजूरी दिल्यानंतर बिहारच्या नागरिकांना ती मोफत दिली जाईल असे सांगितले होते.

भाजपच्या या आश्वासनावर राजदचे नेते तेजस्वी यादव यांनी टीका केली होती. त्यांनी म्हटले होते की कोरोनाची लस ही भाजपाच्या मालकीची नाही, त्यावर सगळ्या देशाचा अधिकार आहे. त्याचबरोबर देशभरातील विरोधी पक्षाच्या नेत्यांनी भाजपवर या मुद्द्यावरुन टीका केली होती. कोरोनाच्या लसीचे भाजप राजकारण करत असल्याची टीका त्यांनी केली होती.

महत्वाच्या बातम्या:

लोकसंख्येनुसारच मिळायला हवं आरक्षण, ऐन निवडणुकीत नितीशकुमारांचं आरक्षणावर मोठं वक्तव्य

Bihar Election 2020 | राहुल गांधींच्या ट्वीटची निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार भाजप; काय आहे प्रकरण?

Bihar Election 2020 | तेजस्वी यादव यांची भाजपवर टीका, म्हणाले कोरोना लस संपूर्ण देशाच्या मालकीची, भाजपची नाही

महत्त्वाच्या बातम्या

ममता बॅनर्जींच्या फुटीर 20 खासदारांनी निवडणूक आयोगाकडे नोंदणी असलेला, पण मान्यता नसलेला त्रिपुरातला पक्ष निवडला, पण भाजपला पाठिंबा दिला, पक्ष आणि चिन्हावर सुद्धा दावा करणार
ममता बॅनर्जींच्या फुटीर 20 खासदारांनी निवडणूक आयोगाकडे नोंदणी असलेला, पण मान्यता नसलेला त्रिपुरातला पक्ष निवडला, पण भाजपला पाठिंबा दिला, पक्ष आणि चिन्हावर सुद्धा दावा करणार
Morena Train Accident: इंटरसिटी एक्स्प्रेसला आग लागल्याची खोटी अफवा पसरली, प्रवासी ट्रॅकवर उतरले अन् विरुद्ध दिशेनं येणाऱ्या दुसऱ्या एक्स्प्रेसनं चार जणांना चिरडलं
इंटरसिटी एक्स्प्रेसला आग लागल्याची खोटी अफवा पसरली, प्रवासी ट्रॅकवर उतरले अन् विरुद्ध दिशेनं येणाऱ्या दुसऱ्या एक्स्प्रेसनं चार जणांना चिरडलं
Trinamool Congress Crisis: तृणमूल काँग्रेसचे बंडखोर खासदार बंगाल भाजप प्रभारींच्या घरी पोहोचले; उद्या लोकसभा अध्यक्षांची भेट घेणार
तृणमूल काँग्रेसचे बंडखोर खासदार बंगाल भाजप प्रभारींच्या घरी पोहोचले; उद्या लोकसभा अध्यक्षांची भेट घेणार
Bihar Police Recruitment Exam: बिहार पोलीस भरती परीक्षेत तुफानी राडा, पाटलीपुत्र स्थानकावर दगडफेक आणि तोडफोड, रेल्वेगाड्या थांबवल्या; पोलिसांचा थेट गोळीबार
बिहार पोलीस भरती परीक्षेत तुफानी राडा, पाटलीपुत्र स्थानकावर दगडफेक आणि तोडफोड, रेल्वेगाड्या थांबवल्या; पोलिसांचा थेट गोळीबार

व्हिडीओ

Tandulwadi Accident Savior : तांदूळवाडीतील अपघात कसा घडला? 'देवदूत' इरफानने पाच जणांचा जीव वाचवला!
Tukaram Mundhe Special Report:तुकाराम मुंढेंच्या कारवाईच्या धास्तीने परळीतील पानटपऱ्यांची शटर्स डाऊन
Shiv Sena UBT Operational Friction: उबाठाचे तेच पाच खासदार, उद्धव ठाकरेंच्या बैठकीला अनुपस्थिती, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!
Sanjay Raut PC : धारावी ताब्यात घेण्यासाठी अदानींनी पाकिस्तानातून गुंड आणलेत, राऊतांचे आरोप
Mountaineer Umesh Zirpe On Majha Katta : यावेळीची मोहीम कशी होती? झिरपेंनी सांगितला थरारक अनुभव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ममता बॅनर्जींच्या फुटीर 20 खासदारांनी निवडणूक आयोगाकडे नोंदणी असलेला, पण मान्यता नसलेला त्रिपुरातला पक्ष निवडला, पण भाजपला पाठिंबा दिला, पक्ष आणि चिन्हावर सुद्धा दावा करणार
ममता बॅनर्जींच्या फुटीर 20 खासदारांनी निवडणूक आयोगाकडे नोंदणी असलेला, पण मान्यता नसलेला त्रिपुरातला पक्ष निवडला, पण भाजपला पाठिंबा दिला, पक्ष आणि चिन्हावर सुद्धा दावा करणार
Maharashtra Live blog updates: मान्सून लांबल्याने शेतकरी चिंतेत, पावसाअभावी पेरण्या खोळंबल्या
Maharashtra Live blog updates: मान्सून लांबल्याने शेतकरी चिंतेत, पावसाअभावी पेरण्या खोळंबल्या
Iran War Live Update: भारतासकट जगाला दिलासा मिळणार? अमेरिका आणि इराणमध्ये शांतता करारात काय काय ठरलं? पहिल्यांदाच माहिती समोर!
भारतासकट जगाला दिलासा मिळणार? अमेरिका आणि इराणमध्ये शांतता करारात काय काय ठरलं? पहिल्यांदाच माहिती समोर!
Solapur Accident: खुदा का फरिश्ता... चिमुकल्याला बुडताना पाहून थेट विहिरीत उडी; देवदूत इरफानने 5 जणांचा जीव वाचवला
Video: खुदा का फरिश्ता... चिमुकल्याला बुडताना पाहून थेट विहिरीत उडी; देवदूत इरफानने 5 जणांचा जीव वाचवला
मुख्यमंत्री विद्यार्थ्यांच्या स्वागताला, देवेंद्र फडणवीस अन् सुनेत्रा पवारांची 'शाळा' ठरली; एकनाथ शिंदेंनी सायकल वाटल्या
मुख्यमंत्री विद्यार्थ्यांच्या स्वागताला, देवेंद्र फडणवीस अन् सुनेत्रा पवारांची 'शाळा' ठरली; एकनाथ शिंदेंनी सायकल वाटल्या
BLOG: दुष्काळाची व्हायरल चर्चा आणि जांभूळ आख्यान, महाभारताच्या काळातलं फळ
BLOG: दुष्काळाची व्हायरल चर्चा आणि जांभूळ आख्यान, महाभारताच्या काळातलं फळ
Morena Train Accident: इंटरसिटी एक्स्प्रेसला आग लागल्याची खोटी अफवा पसरली, प्रवासी ट्रॅकवर उतरले अन् विरुद्ध दिशेनं येणाऱ्या दुसऱ्या एक्स्प्रेसनं चार जणांना चिरडलं
इंटरसिटी एक्स्प्रेसला आग लागल्याची खोटी अफवा पसरली, प्रवासी ट्रॅकवर उतरले अन् विरुद्ध दिशेनं येणाऱ्या दुसऱ्या एक्स्प्रेसनं चार जणांना चिरडलं
Malshiras Pickup Accident : माळशिरसमध्ये पिकअप विहिरीत कोसळून 8 जणांचा मृत्यू, रस्ता सुरक्षा उपाय योजना नाहीत, बैठका होतात पण कंत्राटदारांवर कारवाई होत नाही, धैर्यशील मोहिते पाटील यांचं वक्तव्य
माळशिरसमध्ये भीषण अपघात, धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले, चार चार वर्ष कामं अपूर्ण, पत्रव्यवहार केला तरी दखल घेत नाहीत...
Embed widget