Eid-ul-Fitr 2021 : आज देशभरात ईदचा उत्साह, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याचं आवाहन
Eid-ul-Fitr 2021 : आज देशभरात ईद-उल-फितर मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. या ईदला मीठी ईद असंही म्हटलं जातं. कोरोनाची पार्श्वभूमी लक्षात घेता आजचा सण सोशल डिस्टन्सिंगचे पालन करुन करावा असं आवाहन करण्यात आलं आहे.

नवी दिल्ली : आज देशभरात ईद-उल-फितर मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. देशभरातून आणि जगभरातून या सणासाठी लोक एकमेकांना शुभेच्छा देत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता या वेळची ईद ही कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करुन साजरी करण्यात यावी असं आवाहन देशभरातील प्रमुख मौलवींनी केलंय. शव्वाल म्हणजे इस्लामी कॅलेंडरचा दहावा महिन्याच्या पहिल्या दिवशी ही ईद साजरी केली जाते.
ईदचा सण म्हणजे आनंद आणि उत्साहाचा सण होय. इस्लाममध्ये पवित्र समजल्या जाणाऱ्या रमजान महिन्याचा शेवट या ईदने होतो. जगभरात हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय. या दिवशी लोक एकमेकांना शुभेच्छा देतात आणि एकमेकांसाठी प्रार्थना करतात.
गेल्या वर्षी प्रमाणे या वर्षीही ईदवर कोरोनाचे सावट आहे. त्यामुळे काही कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करुन हा सण साजरा करण्यात यावा या अटीसह विशेष परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि फोनवरुन लोक एकमेकांना शुभेच्छा देत आहेत.
देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीही देशवासियांना ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
सभी देशवासियों को ईद मुबारक!
— President of India (@rashtrapatibhvn) May 14, 2021
यह त्योहार, आपसी भाईचारे और मेल-जोल की भावना को मजबूत करने तथा स्वयं को मानवता की सेवा करने के लिए फिर से समर्पित करने का अवसर है।
आइए, हम कोविड-19 से निपटने के लिए सभी नियमों के पालन करने का तथा समाज व देश की भलाई के लिए काम करने का संकल्प लें।
भारत-पाकिस्तान सीमेवर ईदच्या शुभेच्छा
गुरुवारी भारत आणि पाकिस्तानच्या लष्कराने पूंछ रावलाकोट, मेंढर-हॉट स्प्रिंग, टिथवाल क्रॉसिंग आणि उरी या ठिकाणी मिठाईची देवाण-घेवाण केली. ही परंपरा गेल्या अनेक दिवसांपासून सुरु आहे. मधल्या काळात दोन देशांतील वाढत्या तणावामुळे ती बंद झाली होती.
महत्वाच्या बातम्या :























