एक्स्प्लोर
देशभरातील सहकारी बँका ईडीच्या रडारवर, गैरव्यवहार झाल्याचा संशय
नवी दिल्ली : संपूर्ण देशभरातील सहकारी बँका ईडी अर्थात अंमलबजावणी संचालनयाच्या रडारवर आहेत. देशभरातील सहकारी बँकांमधील डोरमेन्ट, लोन अकाऊंटची माहिती ईडीने मागवली आहे.
काळा पैसा सहकारी बँकांच्या माध्यमातून पांढरा केला असल्याची ईडीला शंका आहे. कारण अनेक दिवसांपासून बंद असलेली खाती देखील गेल्या चार दिवसांपासून सुरु करण्यात आल्याचं ईडीच्या निदर्शनास आलं आहे.
महाराष्ट्रातील सहकारी बँकांचं जाळं पाहता ही बातमी राज्यासाठी महत्वाची मानली जात आहे. कारण देशभरातील सहकारी बँकांमध्ये चार दिवसात 8 हजार कोटींचे व्यवहार झाले आहे. यापैकी पाच हजार कोटींचे व्यवहार फक्त महाराष्ट्रात झाल्याची माहिती आहे. त्यामुळे ईडीने आता लोन अकाऊंट आणि खात्याची माहिती मागवली आहे.
नोटाबंदीनंतर अर्थ मंत्रालयाने सहकारी बँकांना जुन्या नोटा स्वीकारण्याची मुभा दिली नव्हती. मात्र शेतकऱ्यांच्या सोयीसाठी ही बंदी मागे घेण्यात आली. बंदी मागे घेताच केवळ चार दिवसातच एवढे मोठे व्यवहार झाल्याने ईडीने चौकशी सुरु केली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
महाराष्ट्र
Advertisement