एक्स्प्लोर

Namaste Trump | ट्रम्प यांच्या स्वागतासाठी असलेला मोटेरा स्टेडियमजवळील गेट कोसळला

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प 24 फेब्रुवारीला दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर येत आहेत. यावेळी त्यांच्यासोबत त्यांची पत्नी मेलानिया ट्रम्प देखील असणार आहे. डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी एक जनसभाही करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

नवी दिल्ली : अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियममध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्वागतासाठी उभारण्यात आलेला तात्पुरता गेट कोसळल्याची माहिती मिळत आहे. मोटेराच्या गेट नंबर तीनवर हा तात्पुरता गेट उभारण्यात आला होता. याच गेटमधून ट्रम्प आणि मोदी यांची एंट्री होणार होती. मात्र जोरदार हवेमुळे हा गेट कोसळल्याची माहिती मिळत आहे.

जगातील सर्वात मोठी महासत्ता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमेरीकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारत दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी करण्यात येत आहे. जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियममध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी 'नमस्ते ट्रम्प' या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. परंतु, ट्रम्प यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी सुरू असताना मोटेरा स्टेडियममधील गेट कोसळला आहे. स्टेडियमजवळ जोरदार हवेमुळे हा गेट कोसळल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, या घटनेत कोणतीही जीवीतहानी झालेली नाही. पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प याच गेटमधून उद्या एंट्री घेणार आहेत.

अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प 24 फेब्रुवारीला भारत दौऱ्यावर येणार आहेत. ट्रम्पच्या भारत दौऱ्याव येत असल्यामुळे त्यांच्या प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टींची काळजी घेण्यात येत आहे. तसेच आपल्या भारत दौऱ्याबाबत स्वतः डोनाल्ड ट्रम्पही उत्साही असल्याचं बोललं जात आहे.

पाहा व्हिडीओ : Majha Vishesh | ट्रंप यांच्या भारत दौऱ्यातून भारताला काय मिळणार?

बाहुबलीचा व्हिडीओ केला रिट्वीट

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्वागताची जोरदार तयारी सुरू आहे. या दौऱ्यासाठी स्वतः ट्रम्पही बरेच उत्सुक आहेत. भारत दौऱ्यापूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी एक व्हिडीओ रिट्विट केलाय. या व्हिडीओमध्ये ट्रम्प बाहुबलीच्या अवतारात दिसून येत आहेत. पहाटे चारच्या सुमारास ट्रम्प यांनी हा व्हीडिओ रिट्विट केला. अडीच तासांत जवळपास 13 हजार यूजर्सनी याला रिट्विट केलं आणि 50 हजार जणांनी लाईक केला.

Namaste Trump | कार्यक्रम खासगी संस्थेचा, मग सरकारकडून कोट्यवधींचा खर्च का? : काँग्रेस

राष्ट्रपती ट्रम्प यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी

अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्वागतासाठी भारतात जय्यत तयारी सुरू आहे. उद्या म्हणजेच, 24 फेब्रुवारीला जगातील सर्वात मोठी महासत्ता असलेल्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष भारत दौऱ्यावर येणार आहेत. उद्या भारतात अहमदाबादमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प 11 किलोमीटर लांब रोड शो करणार आहेत. हा रोड शो खास करण्यासाठी अनेक उपाययोजना राबवण्यात येत आहेत. रोड शोसाठी रस्त्यामध्ये 28 स्वागत मंच तयार केले आहेत. या ठिकाणी वेगवेगळ्या प्रदेशातील लोक कलाकार आपल्या कला सादर करणार आहेत. तसेच अनेक विद्यार्थीदेखील या रोडशोसाठी उत्सुक आहेत.

डोनाल्ड ट्रम्प यांचा भारत दौरा; भारतीय सैन्य दलही स्वागतासाठी सज्ज

ट्रम्प यांच्यासोबत मुलगी आणि जावईदेखील भारत दौऱ्यावर

डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या पत्नीसोबत आता मुलगी इवांका ट्रम्प आपल्या पतीसह भारत दौऱ्यावर येणार आहेत. इवांका ट्रम्पचा हा दुसरा भारत दौरा असणार आहे. याआधी इवांका 2017मध्ये हैदराबादमधील ग्लोबल बिजनेस समिटमध्ये सहभागी होण्यासाठी आली होती. परंतु, डोनाल्ड ट्रम्प यांचे जावई जेरेड कुशनर यांचा हा पहिलाच भारत दौरा असणार आहे.

पाहा व्हिडीओ : Donald Trump | ट्रम्प येती घरा, अहमदाबादेत दिवाळी-दसरा

हेलिकॉप्टरच्या माध्यमातून शहरात गस्त घालणार

ट्रम्प यांच्या दौऱ्यामुळे हेलीकॉप्टरमार्फत संपूर्ण शहरात चोख बंदोबस्त असणार आहे. तसेच अमेरिकन स्नायपर्स, सीसीटिव्ही यांमार्फत नजर ठेवण्यात येणार आहे. एवढचं नाहीतर संपूर्ण शहरावर हेलिकॉप्टरच्या मदतीने नजर ठेवली जाणार आहे. अहमदाबादमध्ये 11 हजारपेक्षा अधिक पोलीस तैनात करण्यात आले आहेत. पीएम मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प साबरमती नदीवर काही वेळ थांबणार असल्याचीही माहिती मिळत आहे.

India-US | भारत आणि अमेरिकेच्या अध्यक्ष भेटीचा इतिहास

24 फेब्रुवारीचा डोनाल्ड यांचा कार्यक्रम

12.00 : दुपारी 12 वाजता डोनाल्ड ट्रम्प भारतात येणार. पंतप्रधान नरेद्र मोदी त्यांना घेण्यासाठी अहमदाबाद एअरपोर्टला जाणार आहे. यावेळी त्यांचा गार्ड ऑफ ऑनरने सन्मान करण्यात येणार आहे. त्यानंतर ते साबरमती आश्रमला भेट देणार आहे. साबरमती आश्रमात ते 20 मिनीटे थांबणार आहे.

1.15 : जगातील सर्वात मोठ्या मोटेरा स्टेडियमचे ते उद्घाटन करणार आहे. या वेळी नमस्ते ट्रम्प हा कार्यक्रम होणार आहे.

3.30 : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांची पत्नी आग्र्यासाठी रवाना होतील.

4.30 : ट्रम्प ताजमहाल पाहण्सासाठी जाणार आहे. त्यांना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सायंकाळी पाच वाजता ताजमहाल पाहण्यासाठी घेऊन जाणार आहे. ताजमहालला भेट दिल्यानंतर सायंकाळी 5.30 वाजता दिल्लीला येणार आहे.

'नमस्ते इवांका'; डोनाल्ड ट्रम्पसोबत इवांका ट्रम्पही येणार भारतात

25 फेब्रुवारीचा कार्यक्रम

सकाळी 9.00 : ट्रम्प यांचे राष्ट्रपती भवन येथे स्वागत

सकाळी 11.30 : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात नवी दिल्लीतील हैदराबाद हाऊस येथे द्विपक्षीय चर्चा होईल. दरम्यान, मेलानिया ट्रम्प दिल्ली सरकारच्या शासकीय शाळेला भेट देणार आहे आणि मुलांना भेटणार आहे.

दुपारी 4 30 : अमेरिकेचे अध्यक्ष दूतावासातील कर्मचार्‍यांना भेट देणार आहे.

रात्री 8.00 : रात्री आठ वाजता राष्ट्रपती भवनात या दोघांसाठी जेवणाचे आयोजन केले आहे.

रात्री 10 : डोनाल्ड ट्रम्प दहा वाजता पत्नीसह जर्मनीला रवाना होणार आहे.

दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प 24 फेब्रुवारीला दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर येत आहेत. यावेळी त्यांच्यासोबत त्यांची पत्नी मेलानिया ट्रम्प देखील असणार आहे. डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी एक जनसभाही करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सर्वात मोठ्या मोटेरा स्टेडियमध्ये ही सभा होण्याची शक्यता आहे. डोनाल्ड ट्रम्प पत्नी मेलानिया सोबत अहमदाबाद आणि नवी दिल्ली येथे जाणार आहेत.

संबंधित बातम्या : 

डोनाल्ड ट्रम्प झाले 'बाहुबली फॅन'; शेअर केला 'हा' व्हिडीओ

Namaste Trump | कार्यक्रम खासगी संस्थेचा, मग सरकारकडून कोट्यवधींचा खर्च का? : काँग्रेस

जाणून घ्या कसा असणार डोनाल्ड ट्रम्प यांचा भारत दौरा

Viral : जगातील सर्वात मोठं क्रिकेट स्टेडियम गुजरातमध्ये, BCCI कडून एरियल व्ह्यू फोटो शेअर

डोनाल्ड ट्रम्प भारतात येण्याआधी अमेरिकी सीक्रेट सर्व्हिसचे एजंट दाखल; दौऱ्यासाठी करणार नियोजन

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Umar Khalid : उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
Eknath Shinde: मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
मोठी बातमी!केंद्रीय कृषिमंत्र्यांविरुद्ध अविश्वास प्रस्ताव; ओमराजेंसह महाराष्ट्रातील 25 खासदारांच्या सह्या
मोठी बातमी!केंद्रीय कृषिमंत्र्यांविरुद्ध अविश्वास प्रस्ताव; ओमराजेंसह महाराष्ट्रातील 25 खासदारांच्या सह्या

व्हिडीओ

Uddhav Thackeray On Amit Shah : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा अमित शाहांवर वार
Uddhav Thackeray PC FULL : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा Amit Shah यांच्यावर वार
Mahapalikecha Mahasangram Bhiwandi : पाणी, रस्ते,आरोग्य... मूलभूत सुविधांची वानवा ; भिवंडीकर आक्रमक
Mahapalikecha Mahasangram Amravati : भावी नगरसेवकांकडून अमरावतीकरांच्या अपेक्षा काय?
Sushma Andhare PC : पालखी मार्गाचा चौदाशे कोटींचा गैरव्यवहार, अंधारेंनी महामार्गाचा नकाशाच मांडला

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Umar Khalid : उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
Eknath Shinde: मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
मोठी बातमी!केंद्रीय कृषिमंत्र्यांविरुद्ध अविश्वास प्रस्ताव; ओमराजेंसह महाराष्ट्रातील 25 खासदारांच्या सह्या
मोठी बातमी!केंद्रीय कृषिमंत्र्यांविरुद्ध अविश्वास प्रस्ताव; ओमराजेंसह महाराष्ट्रातील 25 खासदारांच्या सह्या
महापालिकेचा लिपिक दिव्यांगाकडून लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात दोन दिवसांत दुसरी मोठी कारवाई
महापालिकेचा लिपिक दिव्यांगाकडून लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात दोन दिवसांत दुसरी मोठी कारवाई
मोठी बातमी! केवळ 500 रुपयांत स्टेडियम दिलं, 29 वर्षांचा करार; कोट्यवधींचा महसूल बुडवल्याचा धक्कादायक प्रकार
मोठी बातमी! केवळ 500 रुपयांत स्टेडियम दिलं, 29 वर्षांचा करार; कोट्यवधींचा महसूल बुडवल्याचा धक्कादायक प्रकार
Gold Silver Rate : 2025 मध्ये सोने- चांदीचे गुंतवणूकदार मालामालं, सोनं 52795 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 1 लाखांची वाढ, जाणून घ्या आजचे दर
सोने चांदीचे गुंतवणूकदार मालामाल, सोनं 52795 रुपयांनी महागलं तर चांदीच्या दरात 1 लाखांची वाढ
Patanjali : समर्पणासह देश सेवा, पतंजली व्यवसाय नव्हे तर पारदर्शक अन् स्वदेशी मिशन, जाणून घ्या
समर्पणासह देश सेवा, पतंजली व्यवसाय नव्हे तर पारदर्शक अन् स्वदेशी मिशन, जाणून घ्या
Embed widget