एक्स्प्लोर
India-US | भारत आणि अमेरिकेच्या अध्यक्ष भेटीचा इतिहास
जगातल्या सर्वात शक्तिशाली देशाच्या राष्ट्राध्यक्षांच्या भारत भेटीचा इतिहास....
उस्मानाबाद : जगातल्या सर्वात शक्तिशाली देशाचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या बाबतीत तुम्ही अनेक बाबी ऐकल्या असतील परंतू आपल्याला माहित आहे का? कि ट्रम्प हे फक्त चित्रपटाचेच शौकीन नसून त्यांनी बऱ्याच हॉलिवूड चित्रपटात वेगवेगळ्या भूमिका हि बजावल्या आहेत. शिवाय ते बर्गर आणि पिझ्झाच्या जाहिरातीतहि काम केलेले आहे. विशेष म्हणजे 1996च्या एका टीव्ही मालिकेत ते राष्ट्राध्यक्ष होण्याच्या संदर्भाने एक भविष्यवाणी केली गेली होती.
भारत दौऱ्यावर येणारे डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे 7वे राष्ट्राध्यक्ष असतील आणि हा प्रवास 1959मध्ये सुरु झाला जेंव्हा अमेरिकेचे 34 वे राष्ट्राध्यक्ष ड्वाइट आइज़नहॉवर हे भारतात आले होते. ज्याप्रमाणे ट्रम्प यांच्या स्वागतासाठी लाखो लोक जमा होतील त्याचप्रमाणे ड्वाइट आइज़नहॉवर यांच्या तत्कालीन दौऱ्यानिमित्ताने मोठया संख्येने लोकांनी त्यांचे देखील स्वागत केले होते.
1959 साली अमेरिकेचे 34 वे राष्ट्राध्यक्ष ड्वाइट आइज़नहॉवर भारत भेटीसाठी येणारे पहिले राष्ट्राध्यक्ष होते. 24-25 फेब्रुवारीला येणारे डोनाल्ड ट्रम्प यांचाही दौरा याच निमित्ताने त्यावेळेची आठवण करुन देतो आहे. यो दोन दौऱ्यांमधील सर्वात जास्त साम्य म्हणजे भारतीय लोकांचे प्रेम. आइज़नहॉवर यांच्या भारत भेटीच्या दरम्यान दिल्लीतील कनॉटप्लेस ते दिल्ली विद्यापीठ, जगातील कृषी प्रदर्शन आणि राम लीला मैदानापर्यंत प्रत्येक ठिकाणी लोंकानी उपस्थित राहून त्यांचे भव्य दिव्य स्वागत केले होते. असं सांगितलं जात कि त्यावेळेचे भारताचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी आइज़नहॉवर यांच्या स्वागतासाठी लाखो लोक जमा केले होते. मात्र लोक जमा केल्याचे आकड्यासंदर्भात अधिकृत नेमकी किती संख्या होती हे स्पष्ट झालं नाही.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत दौऱ्याच्या अनुषंगाने त्यांच्या स्वागतासाठी जमा होणाऱ्या भारतीय लोकांच्या गर्दीबाबत उत्सुक आहेत. त्यांच्या दौऱ्याची विशेष बाब म्हणजे अहमदाबाद येथील त्यांचे स्वागत. डोनाल्ड ट्रम्प रोड शोच्या दरम्यान मोटेरा स्टेडियमपर्यंत एक लाखापेक्षाहि जास्त लोक त्यांच्या स्वागतासाठी जमा होतील आणि स्टेडियममध्येहि उपस्थित होतील.
याबाबत हि ट्रम्प मोठे उत्साहित आहेत. विशेष म्हणजे एक दिवस अगोदर आलेल्या त्यांच्या व्हिडीओमध्ये असे सांगण्यात आले होते कि एक मिलियन लोक तेथे जमा होतीत. हा आकडा भारताच्या हिशोबाने 70 लाख समजण्यात आला.
पूर्ण तयारीनिशी अहमदाबाद येथे होऊ घातलेल्या ‘नमस्ते ट्रम्प’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून अमेरिकन राष्ट्राध्यक्षांसाठी विदेशी भूमीवर सगळ्यात जास्त लोकांना संबोधित करण्याची संधी दिली जावी आणि ती दिली गेली आहेच. महत्वाचं म्हणजे या भव्य स्वागत सोहळ्याच्या तयारीत झोपड्या दिसू नयेत म्हणून भिंती उभ्या केल्या जात आहेत. यावर मोठ्या प्रमाणावर टीका केली जात आहे.
एकीकडे भारत दौऱ्याच्या दरम्यान होणाऱ्या भव्य स्वागताचे ट्रम्प आतुरतेने वाट पाहत आहेत. तर दुसरीकडे 61 वर्षांपूर्वी भारतात आलेल्या ड्वाइट आइज़नहॉवर यांनी दौऱ्यानंतर भारतीयांनी दाखवलेलं प्रेम आणि त्यांच्या दौऱ्यादरम्यान त्यांची केली गेलेली व्यवस्था याबाबत कौतुक केले होते. आपल्या चार दिवसीय भारत भेटी दरम्यान ड्वाइट आइज़नहॉवर हे दिल्लीच्या कनॉट प्लेस येथे गेले जिथे लोकांनी मोठ्या संख्येने एकत्रित येऊन त्यांच्या प्रति प्रेम व्यक्त केले होते. ते महात्मा गांधी यांच्या राजघाट स्थित समाधी स्थळी पण गेले होते. ड्वाइट आइज़नहॉवर यांनी संसदेत एकत्रित अधिवेशन सत्रास संबोधित केले होते त्यात एकूण 15 वेळेस त्यांच्या भाषणाची टाळ्या वाजून प्रशंसा केली होती.
तत्कालीन राष्ट्रपती डॉ राजेंद्र प्रसाद यांनी राष्ट्रपती भवन येथे ड्वाइट आइज़नहॉवर यांच्यासाठी शाही भोजनाचे आयोजन केले होते. त्यावेळी दिवंगत बोलीवूड अभिनेत्री भरतनाट्यम नृत्यांगना वैजयंती माला यांनी नृत्य सादर केले होते. दिल्लीत ड्वाइट आइज़नहॉवर यांनी इतिहासात पहिल्यांदाच आयोजित केलेल्या जागतिक कृषी प्रदर्शनाचे उदघाटन केले. या प्रदर्शनात 25 हजार पेक्षा जास्त लोक उपस्थित होते. यानंतर आइज़नहॉवर यांनी आग्रा येथे जाऊन ताजमहालला भेट दिली. आणि त्याची स्तुती देखील केली. त्यांच्या नंतर अत्तापर्यंत दोन राष्ट्राध्यक्षांनी असे केले ज्यात एक बिल क्लिंटन आणि दुसरे डोनाल्ड ट्रम्प हे असणार आहेत. ड्वाइट आइज़नहॉवर यांनी ताजमहाल पाहणी केल्यानंतर या परिसरातील एका गावचा दौराहि केला होता. आपल्या भारत दौऱ्याच्या अंतिम चरणात ड्वाइट आइज़नहॉवर यांनी दिल्ली येथे येऊन रामलीला मैदानावर भाषण दिले जे ऐकण्यासाठी मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जालना
भविष्य
भारत
कोल्हापूर
Advertisement