एक्स्प्लोर

डोनाल्ड ट्रम्प झाले 'बाहुबली फॅन'; शेअर केला 'हा' व्हिडीओ

राष्ट्रपती ट्रम्प यांनी हे ट्वीट 23 जानेवारी रोजी यांनी सकाळी चार वाजता रिट्वीट केलं आहे. अडीच तासांत जवळपास 13 हजार यूजर्सनी याला रिट्विट केलं आणि 50 हजार जणांनी लाईक केला आहे.

नवी दिल्ली : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्वागताची जोरदार तयारी सुरू आहे. या दौऱ्यासाठी स्वतः ट्रम्पही बरेच उत्सुक आहेत. भारत दौऱ्यापूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी एक व्हिडीओ रिट्विट केलाय. या व्हिडीओमध्ये ट्रम्प बाहुबलीच्या अवतारात दिसून येत आहेत. पहाटे चारच्या सुमारास ट्रम्प यांनी हा व्हीडिओ रिट्विट केला. अडीच तासांत जवळपास 13 हजार यूजर्सनी याला रिट्विट केलं आणि 50 हजार जणांनी लाईक केला.

राष्ट्रपती ट्रम्प यांनी हे ट्वीट 23 जानेवारी रोजी यांनी सकाळी चार वाजता रिट्वीट केलं आहे. अडीच तासांत जवळपास 13 हजार यूजर्सनी याला रिट्विट केलं आणि 50 हजार जणांनी लाईक केला आहे. हा बाहुबली व्हिडीओ @Solmemes1 या ट्विटर हॅन्डलवरून डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्वीट केलं आहे.

पाहा व्हिडीओ : डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून भारताला काय सूट मिळेल?

राष्ट्रपती ट्रम्प यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी

अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्वागतासाठी भारतात जय्यत तयारी सुरू आहे. उद्या म्हणजेच, 24 फेब्रुवारीला जगातील सर्वात मोठी महासत्ता असलेल्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष भारत दौऱ्यावर येणार आहेत. उद्या भारतात अहमदाबादमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प 11 किलोमीटर लांब रोड शो करणार आहेत. हा रोड शो खास करण्यासाठी अनेक उपाययोजना राबवण्यात येत आहेत. रोड शोसाठी रस्त्यामध्ये 28 स्वागत मंच तयार केले आहेत. या ठिकाणी वेगवेगळ्या प्रदेशातील लोक कलाकार आपल्या कला सादर करणार आहेत. तसेच अनेक विद्यार्थीदेखील या रोडशोसाठी उत्सुक आहेत.

ट्रम्प यांच्यासोबत मुलगी आणि जावईदेखील भारत दौऱ्यावर

डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या पत्नीसोबत आता मुलगी इवांका ट्रम्प आपल्या पतीसह भारत दौऱ्यावर येणार आहेत. इवांका ट्रम्पचा हा दुसरा भारत दौरा असणार आहे. याआधी इवांका 2017मध्ये हैदराबादमधील ग्लोबल बिजनेस समिटमध्ये सहभागी होण्यासाठी आली होती. परंतु, डोनाल्ड ट्रम्प यांचे जावई जेरेड कुशनर यांचा हा पहिलाच भारत दौरा असणार आहे.

पाहा व्हिडीओ : Majha Vishesh | ट्रंप यांच्या भारत दौऱ्यातून भारताला काय मिळणार?

हेलिकॉप्टरच्या माध्यमातून शहरात गस्त घालणार

ट्रम्प यांच्या दौऱ्यामुळे हेलीकॉप्टरमार्फत संपूर्ण शहरात चोख बंदोबस्त असणार आहे. तसेच अमेरिकन स्नायपर्स, सीसीटिव्ही यांमार्फत नजर ठेवण्यात येणार आहे. एवढचं नाहीतर संपूर्ण शहरावर हेलिकॉप्टरच्या मदतीने नजर ठेवली जाणार आहे. अहमदाबादमध्ये 11 हजारपेक्षा अधिक पोलीस तैनात करण्यात आले आहेत. पीएम मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प साबरमती नदीवर काही वेळ थांबणार असल्याचीही माहिती मिळत आहे.

24 फेब्रुवारीचा डोनाल्ड यांचा कार्यक्रम

12.00 : दुपारी 12 वाजता डोनाल्ड ट्रम्प भारतात येणार. पंतप्रधान नरेद्र मोदी त्यांना घेण्यासाठी अहमदाबाद एअरपोर्टला जाणार आहे. यावेळी त्यांचा गार्ड ऑफ ऑनरने सन्मान करण्यात येणार आहे. त्यानंतर ते साबरमती आश्रमला भेट देणार आहे. साबरमती आश्रमात ते 20 मिनीटे थांबणार आहे.

1.15 : जगातील सर्वात मोठ्या मोटेरा स्टेडियमचे ते उद्घाटन करणार आहे. या वेळी नमस्ते ट्रम्प हा कार्यक्रम होणार आहे.

3.30 : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांची पत्नी आग्र्यासाठी रवाना होतील.

4.30 : ट्रम्प ताजमहाल पाहण्सासाठी जाणार आहे. त्यांना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सायंकाळी पाच वाजता ताजमहाल पाहण्यासाठी घेऊन जाणार आहे. ताजमहालला भेट दिल्यानंतर सायंकाळी 5.30 वाजता दिल्लीला येणार आहे.

25 फेब्रुवारीचा कार्यक्रम

सकाळी 9.00 : ट्रम्प यांचे राष्ट्रपती भवन येथे स्वागत

सकाळी 11.30 : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात नवी दिल्लीतील हैदराबाद हाऊस येथे द्विपक्षीय चर्चा होईल. दरम्यान, मेलानिया ट्रम्प दिल्ली सरकारच्या शासकीय शाळेला भेट देणार आहे आणि मुलांना भेटणार आहे.

दुपारी 4 30 : अमेरिकेचे अध्यक्ष दूतावासातील कर्मचार्‍यांना भेट देणार आहे.

रात्री 8.00 : रात्री आठ वाजता राष्ट्रपती भवनात या दोघांसाठी जेवणाचे आयोजन केले आहे.

रात्री 10 : डोनाल्ड ट्रम्प दहा वाजता पत्नीसह जर्मनीला रवाना होणार आहे.

दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प 24 फेब्रुवारीला दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर येत आहेत. यावेळी त्यांच्यासोबत त्यांची पत्नी मेलानिया ट्रम्प देखील असणार आहे. डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी एक जनसभाही करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सर्वात मोठ्या मोटेरा स्टेडियमध्ये ही सभा होण्याची शक्यता आहे. डोनाल्ड ट्रम्प पत्नी मेलानिया सोबत अहमदाबाद आणि नवी दिल्ली येथे जाणार आहेत.

संबंधित बातम्या : 

Namaste Trump | कार्यक्रम खासगी संस्थेचा, मग सरकारकडून कोट्यवधींचा खर्च का? : काँग्रेस

जाणून घ्या कसा असणार डोनाल्ड ट्रम्प यांचा भारत दौरा

Viral : जगातील सर्वात मोठं क्रिकेट स्टेडियम गुजरातमध्ये, BCCI कडून एरियल व्ह्यू फोटो शेअर

डोनाल्ड ट्रम्प भारतात येण्याआधी अमेरिकी सीक्रेट सर्व्हिसचे एजंट दाखल; दौऱ्यासाठी करणार नियोजन

महत्त्वाच्या बातम्या

Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
धक्कादायक! ऑटो आणि कंटेनरची समोरासमोर धडक, भीषण अपघातात सात जणांचा जागीच अंत, अनेकजण जखमी
धक्कादायक! ऑटो आणि कंटेनरची समोरासमोर धडक, भीषण अपघातात सात जणांचा जागीच अंत, अनेकजण जखमी
देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी सोन्याला किती होता दर? आजचे दर काय? 80 वर्षात नेमकी किती झाली वाढ?
देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी सोन्याला किती होता दर? आजचे दर काय? 80 वर्षात नेमकी किती झाली वाढ?
99 टक्के सरकारी नोकऱ्यांमध्ये घोटाळा, विशिष्ट जाती, वर्गातील लोकांनाच झुकतं माप, बाबा रामदेव यांचा गंभीर आरोप, पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा
99 टक्के सरकारी नोकऱ्यांमध्ये घोटाळा, विशिष्ट जाती, वर्गातील लोकांनाच झुकतं माप, बाबा रामदेव यांचा गंभीर आरोप, पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
Embed widget