Mahapalikecha Mahasangram Amravati : भावी नगरसेवकांकडून अमरावतीकरांच्या अपेक्षा काय?
अमरावती महानगरपालिकेवर २०२२पासून प्रशासक आहे. महानगरपालिकेवर प्रशासक असल्यानं अमरावतीकरांना अनेक समस्यांना सामोरं जाव लागतंय. त्यामुळे या निवडणुकीत रस्ते, उड्डाणपूल, नालेसफाई हे मुद्दे चर्चेत राहणार आहेत.
अमरावती महानगरपालीकेची शेवटची निवडणूक 21 फेब्रुवारी 2017 ला झाली.. मार्च 2022 पासून महानगरपालीकेवर प्रशासक राज आहे.. आता लवकरच महानगरपालिका निवडणूक होणार आहे.. मात्र प्रशासक राज मध्ये सामान्य नागरिकांना अनेक त्रासांना सामोरे जावं लागलं.. अमरावती शहराच्या राजकमल चौकातील उड्डाणपूल बंद केल्याने सर्वात मोठी समस्या निर्माण झाली आहे ती वाहतूक कोंडीची.. त्यामुळे महानगरपालिका निवडणुकीत हा मुद्दा चांगलाच गाजनार आहे.. याशिवाय साफसफाई, नालेसफाई, अशे अनेक मुद्दे सध्या अमरावती करांना सतावत आहे.. यावर राजकीय नेत्यांनी काय भूमिका.. ते कोणते मुद्दे घेऊन जनतेसमोर जाणार.. सत्ताधारी आणि विरोधकांशी संवाद साधला आहे आमचे प्रतिनिधी यांनी...
*2017 मधील अमरावती महानगरपालिका पक्षीय बलाबल*
*एकूण 87 जागा*
भाजप - 45
काँग्रेस - 15
शिवसेना - 07
राष्ट्रवादी - 00
एम आय एम - 10
बहुजन समाज पार्टी - 05
युवा स्वाभिमान - 03
अपक्ष - 02























