एक्स्प्लोर
बलात्कारी बाबाचा भांडाफोड, 41 अल्पवयीन मुलींची सुटका
राजधानी दिल्लीत रोहिणी भागातील ही घटना आहे. दिल्ली पोलिसांनी सलग दुसऱ्या दिवशी या बाबाच्या ठिकाण्यांवर छापेमारी केली.
नवी दिल्ली : अध्यात्मिक विद्यापीठाच्या नावावर अल्पवयीन मुलींचं लैंगिक शोषण करणारा बलात्कारी बाबा वीरेंद्र देव दीक्षितचा पोलिसांनी भांडाफोड केला आहे. राजधानी दिल्लीत रोहिणी भागातील ही घटना आहे. दिल्ली पोलिसांनी सलग दुसऱ्या दिवशी या बाबाच्या ठिकाण्यांवर छापेमारी केली.
बाबाच्या आश्रमातून 41 अल्पवयीन मुलींची सुटका करण्यात आली आहे. पोलिसांनी आश्रमाचे 14 दरवाजेही तोडले, अशी माहिती दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालिवाल यांनी दिली.
छापेमारीदरम्यान दिल्ली पोलिसांसोबत स्वाती मालिवालही उपस्थित होत्या. ''बलात्कारी बाबाच्या आश्रमातून मोठ्या प्रमाणात अश्लील सामग्री जप्त करण्यात आली. आश्रमातील पाणी प्यायल्यानंतर दोन ते तीन तास चक्कर येत होती. या आश्रमात एकही धार्मिक पुस्तक नाही, उलट अश्लील शब्दांमध्ये लिहिलेल्या चिठ्ठ्या सापडल्या'', अशी माहितीही स्वाती मालिवाल यांनी दिली.
दरम्यान, बलात्कारी बाबा वीरेंद्र देव सध्या फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. अनेक मुलींनी त्याच्यावर बलात्काराचा आरोप केला आहे. पीडित कुटुंबीयांनी एबीपी न्यूजवर बाबाचे कारनामे सांगितले. आश्रमात राहत असलेली आपली बहिण 9 ऑक्टोबरपासून बेपत्ता असल्याचं एका तक्रारदाराने सांगितलं.
बलात्कारी बाबा वीरेंद्र देव स्वतःला कृष्ण असल्याचं सांगतो. लैंगिक शोषण करण्यापूर्वी तो मुलींना एक पदार्थ द्यायचा, ज्याला तो गुप्त प्रसाद असल्याचं सांगायचा, अशी तक्रारही करण्यात आली आहे.
हा प्रदास खाल्ल्यानंतर मुली बेशुद्ध होत होत्या. बलात्कारी बाबा मुलींचा ब्रेनवॉश करायचा आणि जीवे मारण्याची धमकीही द्यायचा, असाही आरोप करण्यात आला आहे. बाबा मुलींकडून मसाज करुन घेत होता, असा आरोप पीडितांनी केला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
नाशिक
क्राईम
राजकारण
Advertisement