(Source: ECI/ABP News/ABP Majha)
दिल्लीतील प्रदूषणानं वाढवली चिंता, नोएडातील आठवीपर्यंतच्या वर्ग ऑनलाईन, प्रशासनाचे निर्देश
Noida School Online Class : दिल्लीतील प्रदूषणानं चिंता वाढवली असून नोएडातील आठवीपर्यंतचे वर्ग ऑनलाईन भरवण्याचे निर्देश प्रशासनानं दिले आहेत.
Noida School Online Class : दिल्ली-एनसीआरमधील वाढतं प्रदूषण चिंतेचा विषय बनली आहे. येथील हवेची हवेची गुणवत्ता 'गंभीर' श्रेणीत पोहोचली आहे. त्यामुळे दिल्लीतील नागरिकांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागत आहे. प्रदूषणामुळे प्रत्येकजण त्रस्त आहे, परंतु त्याचा परिणाम लहान मुलांवर अधिक होऊ शकतो. अशा स्थितीत नोएडामधील गौतम बुद्ध नगरमध्ये पहिली ते आठवीपर्यंतचे वर्ग ऑनलाईन माध्यमातून चालवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तूर्तास, हे आदेश 8 नोव्हेंबरपर्यंत लागू असतील. इयत्ता 9वी ते 12वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठीही ऑनलाईन वर्ग घेता येतील, असंही आदेशात म्हटलं आहे.
गौतम बुद्ध नगर जिल्हा शाळा निरीक्षक (DIOS) धरमवीर सिंह यांनी जारी केलेल्या आदेशानुसार, प्रत्येक शाळांना निर्देश देण्यात आले आहेत की, शक्य असल्यास इयत्ता नववी ते बारावीचे वर्गही ऑनलाईन करावेत. आदेशात खेळ आणि प्रार्थना यांसारख्या खुल्या मैदानात भरवल्या जाणाऱ्या वर्गांवर पूर्ण बंदी घालण्यात आली आहे. सिंह म्हणाले की, "सर्व शाळांना आठवीपर्यंत ऑनलाईन वर्ग घेण्याचे निर्देश दिले आहेत. शक्य असल्यास नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग ऑनलाईन माध्यमातून घेण्यास सांगितलं आहे.
सध्या हे निर्देश फक्त दिल्लीतील नोएडामधील शाळांसाठी लागू करण्यात आले आहेत. उर्वरित दिल्लीतील शाळांबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. शुक्रवारी (4 नोव्हेंबर) दिल्लीचे पर्यावरण मंत्री गोपाल राय यांनी उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे. दिल्लीतील प्रदुषणाची वाढती समस्या पाहता, या बैठकीत शाळांबाबत काय निर्णय घेतला जातो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
Uttar Pradesh | All schools to hold online classes mandatorily for students from std 1 to 8 in Gautam Budh Nagar district until 8th November in wake of rising air pollution. Online classes may also be held for students of classes 9 to 12. pic.twitter.com/wKgddf42PP
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) November 3, 2022
दिल्लीतील वाढतं प्रदूषण पाहता राजधानीतील शाळा बंद ठेवाव्यात, अशी मागणी भाजप आणि काँग्रेसनं दिल्ली सरकारकडे केली आहे. गुरुवारी, राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगानं (NCPCR) दिल्ली सरकारला राष्ट्रीय राजधानीतील वायू प्रदूषणाची स्थिती सुधारेपर्यंत शाळा बंद ठेवण्यास सांगितलं.
दिल्लीत ऑड-इव्हन लागू होण्याची शक्यता
घसरलेल्या एअर क्वॉलिटी इंडेक्समुळे (AQI) आता दिल्लीत ऑड-इव्हन अंमलबजावणी केली जाण्याची शक्यता आहे. भाजप आणि काँग्रेसकडूनही दिल्लीत ऑड इव्हन लागू करण्याची मागणी केली जात आहे. एअर क्वॉलिटी कमिशनने (CAQM) आपल्या आदेशात लहान मुलं, वृद्ध आणि ज्यांना श्वास घेण्यास त्रास होत आहे. त्यांनी घराबाहेर पडू नये, असे निर्देश दिले आहेत. या लोकांनी शक्यतो बाहेर जाणं टाळावं आणि घरातच थांबावं, असं सांगण्यात आले आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Air Pollution : दिल्लीतील हवेची गुणवत्ता खालावली, प्रदूषणाच्या पातळीत वाढ; 5 कडक निर्बंध लागू