Delhi Election Result 2020 | दिल्लीत 'आप'ला एकाहाती कौल, 62 जागांवर आघाडी
दिल्लीतील निकालाचे कल पाहिले तर आपला जनेतेनं स्पष्ट बहुमत दिलं आहे. आप 63 जागांवर आघाडीवर आहे. तर भाजप अवघ्या 7 जागांवर अडकली आहे.
Delhi Election Result : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासाठी आजचा दिवस दुहेरी आनंद घेऊन आला आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीत आपने दुसऱ्यांना मुसंडी मारत आपलं दिल्लीवरील वर्चस्व सिद्ध केलं आहे. आज अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांचा वाढदिवसही आहे. निवडणुकीतील विजयानंतर अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीकरांचे आभार मानले. दिल्लीकरांनी मोठ्या अपेक्षेने, विश्वासाने आम्हाला कौल दिला आहे. आपण सर्व मिळून यापुढे काम करुया, असं अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं.
दिल्लीतील निकालाचे कल पाहिले तर आपला जनेतेनं स्पष्ट बहुमत दिलं आहे. आप 62 जागांवर आघाडीवर आहे. तर भाजप अवघ्या 8 जागांवर अडकली आहे. तर दिल्लीवर 25 वर्ष सत्ता गाजवलेल्या काँग्रेसला निवडणुकीत एकही जागा जिंकता आलेली नाही. दिल्लीत भाजपला बसलेल्या जबरदस्त धक्क्याने भाजप कार्यालयाबाहेर शुकशुकाट आहे तर आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोष सुरु आहे.
अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं की, दिल्लीतील विजय माझा विजय नाही. दिल्लीतील प्रत्येक कुटुंबाचा हा विजय आहे. ज्यांनी मला मुलगा मानलं आणि एवढं समथन दिलं. हा या कुटुंबाचा विजय आहे, ज्या घरांना 24 तास वीज मिळाली. हा त्या कुटुंबाचा विजय आहे, ज्यांना दिल्लीतील रुग्णालयात चांगले उपचार घेता आले. दिल्लीतील जनतेनं नव्या राजनितीला जन्म दिला आहे. दिल्लीतीली लोकांना संदेश दिला की जे शाळा बांधतील आम्ही त्यांनाचा मतदान करु, जे परिसर स्वच्छ ठेवतील, जे 24 तास वीज देतील, रस्ते बांधतील. आजचा विजय केवळ दिल्लीचा विजय नाही तर संपूर्ण भारताचा विजय आहे. आज मंगळवार आहे, हनुमानाचा दिवस आहे. हनुमानाचे खूप खूब धन्यवाद. पुढील पाच वर्ष दिल्लीकरांसाठी सुखाचे जावो. माझ्या कुटुंबियांनीही खूप मेहनत घेतली.
Delhi Election Results | भाजपच्या पराभवाची मालिका थांबणार नाही : शरद पवार
दिल्लीकरांना विकास हवा आहे असंच आजच्या निकालाने अधोरेखित केलं आहे. अरविंद केजरीवाल यांनी निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर लढवली आणि दिल्लीकरांनी सलग तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदी बसवण्यासाठी त्यांना कौल दिला. आम आदमी पार्टीच्या झाडूने भाजप आणि काँग्रेसचा अक्षरशः सफाया केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, भाजपचे केंद्रीय मंत्री अशा दिग्गज नेत्यांची फौज भाजपने प्रचारासाठी रिंगणात उतरवली होती. मात्र तरीही भाजपला दुहेरी आकडाही गाठता आलेला नाही. तर काँग्रेसच्या पाटीवरचा भोपळाही फोडता आलेला नाही.
दिल्लीकरांनी आतापर्यंतचं सर्वात मोठं गिफ्ट दिलं : सुनीता केजरीवाल
दिल्ली विधानसभा निवडणुकीतील विजयावर बोलताना अरविंद केजरीवाल यांच्या पत्नीने म्हटलं की, आतापर्यंतचं मिळालेलं हे सर्वात मोठं गिफ्ट आहे. दिल्लीतील आपचा विजय सत्याचा विजय झाला आहे. दिल्लीकर समजूतदार आहेत. मला विजयाचा विश्वास होता. मूळ प्रश्नांवर राजकारण करायला हवं. राजकीय पक्षांनी यातून शिकलं पाहिजे.