एक्स्प्लोर
Advertisement
व्हायरल सत्य : 2000 रुपयांची नोट बंद करण्याचा प्लॅन?
सोशल मीडियावर सध्या एक मेसेज बराच व्हायरल होत आहे. त्यात असा दावा केला जात आहे की, देशात नोटांचा तुटवडा आहे कारण की, सरकार दोन हजार रुपयांची नोट बंद करण्याचा प्लॅन करत आहे.
मुंबई : सोशल मीडियावर सध्या एक मेसेज बराच व्हायरल होत आहे. त्यात असा दावा केला जात आहे की, देशात नोटांचा तुटवडा आहे कारण की, सरकार दोन हजार रुपयांची नोट बंद करण्याचा प्लॅन करत आहे.
देशातील अनेक राज्यांमध्ये नोटांचा तुटवडा असल्याचं दिसून येत आहे. या तुटवड्यामागे 2000 रुपयांच्या नोटबंदीचा प्लॅन असल्याचा दावा सोशल मीडियावर करण्यात येत आहे. या व्हायरल मेसेजमध्ये असाही दावा करण्यात येत आहे की, सरकार बाजारातून 2000 रुपयांची नोट हटवण्याची शक्यता आहे. किंबहुना 2000 रुपयांची नोट हळूहळू हटवण्यातही आली आहे. त्यामुळे देशात सध्या चलन तुटवड्याचं संकट घोंघावत आहे.
'सध्या व्यवस्थेत 6.7 लाख कोटींपेक्षा जास्त रकमेच्या दोन हजार रुपयांच्या नोटा उपलब्ध आहेत. ही रक्कम आवश्यकतेपेक्षा जास्त आहे, म्हणून गेल्या दोन महिन्यांपासून दोन हजाराच्या नव्या नोटांचा पुरवठा थांबवण्यात आला आहे.' अशी माहिती आर्थिक विषयांचे सचिव सुभाष चंद्र गर्ग यांनी दिली. दोन हजाराच्या नोटांची साठवणूक होत असल्याची शक्यता गर्ग यांनी नाकारली नाही. फक्त दोन हजारच नाही, तर चलनात आलेल्या इतर नोटाही बँकिंग व्यवस्थेत कमी प्रमाणात येत आहेत, असं गर्ग म्हणाले.
गर्ग यांच्या मते, दोन हजार रुपयांची नोट बंद करण्याचा सरकारचा कोणताही प्लॅन नाही. पण दोन हजार रुपयांच्या नोटांचा नव्याने पुरवठा बंद करण्यात आला आहे. कारण बाजारात पुरेशा दोन हजारांच्या नोटा आहेत. त्यामुळे आमच्या पडताळणीत चलन तुटवड्यामागे दोन हजारांच्या नोटबंदीचा दावा खोटा असल्याचं स्पष्ट होतं.
संबंधित बातम्या :
चलनात दोन हजाराच्या नोटांचा नव्याने पुरवठा बंद
दहा राज्यात नोटांचा तुटवडा, ATM मध्ये खडखडाट!
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
भारत
व्यापार-उद्योग
निवडणूक
Advertisement