(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Covid-19 | देशात कोरोनामुळे 7 हजारांहून अधिक रुग्णांचा मृत्यू; तर अडीच लाखांहून अधिक कोरोना बाधित
देशात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव दिसून येत आहे. अशातच देशात आतापर्यंत 2 लाख 56 हजार 611 लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे. यापैकी 7135 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर एक लाख 24 हजार रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
नवी दिल्ली : देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. देशातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. सोमवारी सकाळी आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात आतापर्यंत 2 लाख 56 हजार 611 लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे. यापैकी 7135 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर एक लाख 24 हजार रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशात मागील 24 तासांमध्ये कोरोना व्हायरसचे सर्वाधिक 9983 रुग्ण आढळून आले आहेत, तर 206 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ही भारतातील कोरोना बाधित रुग्णांची सर्वाधिक वाढ आहे.
कोरोना बाधितांच्या वाढित जगात तिसऱ्या क्रमांकावर भारत
भारतामध्ये कोरोना बाधित रुग्णांच्या वाढिचा वेग जगभरातील इतर देशांच्या तुलनेत तिसऱ्या क्रमांकावर आहे. रविवारी ब्राझीलमध्ये 18375 आणि अमेरिकेमध्ये 18905 नवे कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर रुसमध्ये 8984 नवे रुग्ण समोर आले आहेत. याचाच अर्थ जगभरातील रुग्ण वाढिंच्या संख्येत भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे. भारतात आज 9983 नवे कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर, अमेरिका, ब्राझील, रुस, स्पेन, ब्रिटननंतर कोरोना महामारीमुळे सर्वाधिक प्रभावित देशांमध्ये भारत सहाव्या क्रमांकावर पोहोचला आहे.
पाहा व्हिडीओ : देशातली कोरोनाबाधितांची संख्या अडीच लाख पार; सलग 8 दिवस 200हून अधिक बळी
आठ राज्यांमध्ये 93 टक्के कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू
देशात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. कोरोना व्हायरसमुळे झालेल्या एकूण मृत्यूंपैकी 93 टक्के मृत्यू आठ राज्यांमध्ये झाले आहेत. ही राज्य महाराष्ट्र, गुजरात, दिल्ली, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, तामिळनाडू आणि राजस्थानमध्ये आहेत. भारतातील एकूण कोरोना बाधितांपैकी फक्त महाराष्ट्रात 43 टक्के मृत्यू झाले आहेत. तर गुजरातमध्ये 18 टक्के आणि दिल्लीमध्ये 11 टक्के मृत्यू झाले आहेत.
राज्यांमधील मृत्यू दर
या राज्यांतील मृत्यूदरांबाबत बोलायचे झाले तर, महाराष्ट्रात 3.57टक्के, गुजरातमध्ये 2.75 टक्के, मध्यप्रदेशात 4.32 टक्के, पश्चिम बंगालमध्ये 4.94 टक्के, उत्तर प्रदेशमध्ये 2.64 टक्के, राज्यस्थानमध्ये 2.23 टक्के तर तामिळनाडूमध्ये 0.83 टक्के एवढा आहे. भारतात कोरोनाच्या संसर्गामुळे मृत्यू दर 2.80 टक्के एवढा आहे.
संबंधित बातम्या :
Unlock 1 | नॉन कंटेन्मेंट झोनमध्ये आजपासून धार्मिक स्थळं, मॉल, हॉटेल, रेस्टॉरंट सुरु होणार
Mission Begin Again | आजपासून मुंबईत फेझ 3 नुसार लॉकडाऊनमध्ये शिथिलता
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम ट्विटरवर का ट्रेण्ड होतोय?
'लांसेट'ने हायड्रॉक्सिक्लोरोक्वीनबाबत अभ्यास मागे घेतला, 200 वर्षात पहिल्यांदाच असं घडलं!