एक्स्प्लोर

Unlock 1 | नॉन कंटेन्मेंट झोनमध्ये आजपासून धार्मिक स्थळं, मॉल, हॉटेल, रेस्टॉरंट सुरु होणार

कोरोना संकटात धार्मिक स्थळं आणि मॉल सुरु करण्यापूर्वी खबदारी म्हणून हरतऱ्हेची पावलं उचलण्यात आली आहेत. धार्मिक स्थळाचा परिसर सॅनिटाईज केला जाल आहे. तर मॉलमध्ये आता शॉपिंग करणाऱ्यांसाठी नवे नियम असतील.

मुंबई : लॉकडाऊनमुळे सुमारे दोन महिने बंद असलेले देशातील शॉपिंग मॉल, धार्मिक स्थळं, हॉटेल आणि रेस्टॉरंट पुन्हा एकदा सुरु होणार आहेत. केवळ नॉन कंटेन्मेंट झोनमधीलच मॉल, धार्मिक स्थळं आणि हॉटेल सुरु केले जातील. नव्या नियमांनुसार प्रवेशासाठी टोकन यंत्रणेसारख्या व्यवस्था असेल. तर मंदिरांमध्ये प्रसाद दिला जाणार नाही. देशात 1 जूनपासून अनलॉक 1.0 सुरु झाला आहे, तर कन्मेंन्मेंट झोनमध्ये 30 जूनपर्यंत लॉकडाऊन लागू आहे.

अनलॉक 1.0 च्या या टप्प्यात धार्मिक स्थळं आणि सार्वजनिक प्रार्थना स्थळं, हॉटेल, रेस्टॉरंट आणि शॉपिंग मॉल सुरु करता येणार आहे. परंतु प्रत्येक राज्याने कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावानुसार नियम जारी केले आहेत.

नुकतंच महाराष्ट्र सरकारने लॉकडाऊन 5 ची नियमावली जाहीर केली. या नियमावलीत कंटेन्मेंट झोन वगळता अन्य झोनमध्ये बरीचशी सूट देण्यात आली आहे. त्यासोबतच महाराष्ट्रात नवी सुरुवात करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुनश्च हरिओम म्हणत 'मिशन बिगिन अगेन' हे नवं धोरण राबवण्याचा निर्णय घेतला.

कोणत्या राज्यात काय सुरु होणार, काय बंद राहणार?

महाराष्ट्र : महाराष्ट्रात मिशन बिगिन अगेनच्या फेर 3 ला आजपासून सुरुवात होणार आहे. 10 टक्के कर्मचारी क्षमतेने खासगी कार्यालयं सुरु होणार आहेत. तर इतर कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करण्यास सांगितलं. राज्य सरकारने परवानगी दिलेल्या इतर नागरिकांसाठी मुंबईत बेस्ट सुविधा सुरु होणार आहे. मुंबई महापालिकेच्या अखत्यारितील मंडई आजपासून सुरु होणार आहेत. परंतु राज्यात धार्मिक स्थळं, मॉल, हॉटेल आणि रेस्टॉरंट उघडण्यास अद्याप परवानगी नाही.

Mission Begin Again | आजपासून मुंबईत फेझ 3 नुसार लॉकडाऊनमध्ये शिथिलता

दिल्ली : धार्मिक स्थळं, मॉल, रेस्टॉरंट सुरु होणार आहेत. तर हॉटेल आण बँक्वेट हॉल बंदच राहतील. याचं कारण म्हणजे कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढला तर हॉटेल आणि बँक्वेट हॉल रुग्णालयाशी अॅटच करावे लागू शकतात किंवा आयसोलेशन बेड्ससाठी यांची गरज लागू शकते

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशात आज धार्मिक स्थळं, मॉल, हॉटेल आणि रेस्टॉरंट उघडली जाणार आहेत. यासंदर्भात सरकारने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. धार्मिक स्थळी एकाच वेळी पाचपेक्षा जास्त भाविक गोळा होऊ शकणार नाही. मास्क लावून सॅनिटायजर लावून आणि थर्मल स्क्रीनिंग करुनच मंदिरात प्रवेश दिला जाणार आहे. मूर्तींना हात लावण्याची परवानगी नसेल, तसंच प्रसादाचं वितरण होणार नाही. शॉपिंग मॉल, हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये थर्मल स्क्रीनिंग आणि अल्कोहोलयुक्त सॅनिटायजर अनिवार्य असेल. वृद्ध, गर्भवतींना बंदी तसंच आजारी कर्मचाऱ्यांना कामावर बोलवता येणार नाही. फूड कोर्ट किंवा रेस्टॉरंटमध्ये 50 टक्के क्षमतेने ग्राहकांनी आसनव्यवस्था असावी. बिलासाठी कॅशलेस ट्रान्झॅक्शनची व्यवस्था करावी. डिस्पोजेबल मेन्यू असावा आणि उत्तम प्रतीचे नॅपकिन पेपर ठेवणं अनिवार्य आहे.

बिहार : केंद्र सरकारने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांच्या धर्तीवर बिहारमध्ये धार्मिक स्थळं, मॉल, हॉटेल, रेस्टॉरंट आजपासून सुरु होणार आहेत.

झारखंड : पुढील आदेश येईपर्यंत झारखंड राज्यातील धार्मिक स्थळं, मॉल, हॉटेल, रेस्टॉरंट सुरु करता येणार नाहीत.

मध्य प्रदेश : राज्यातील धार्मिक स्थळं, मॉल, हॉटेल, रेस्टॉरंट आजपासून सुरु होणार आहेत. परंतु राजधानी भोपाळमध्ये धार्मिक स्थळं बंदच राहतील. भोपाळचे जिल्हाधिकारी तरुण पिथोडे यांनी सांगितलं की, आढावा बैठक झाल्यानंतर पुढील आठवड्यात धार्मिक स्थळं सुरु केली जाऊ शकतात.

छत्तीसगड : राज्यातील सार्वजनिक उद्यानं, धार्मिक स्थळं खुली होणार आहेत. क्लबमध्ये केवळ आऊटडोर अॅक्टिव्हिटीच होऊ शकतात. स्पोर्टिंग कॉम्प्लेक्स आणि स्टेडियममध्ये आऊटडोर खेळच होतील. शॉपिंग मॉल सुरु होणार नाहीत. रेस्टॉरंटमध्ये केवळ टेकअवेची सुविधा असेल. हॉटेल सामान्यांसाठी सुरु होतील.

राजस्थान : राजस्थानमध्ये आजपासून हॉटेल, रेस्टॉरंट, मॉल आणि क्लब सुरु होणार आहेत. परंतु राज्य सरकारने अद्याप धार्मिक स्थळं उघडण्याबाबत कोणताही आदेश जारी केलेला नाही. हॉटेल आणि रेस्टॉरंट सुरु करण्याबाबत केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांचं पालन करावं लागेल.

कर्नाटक : राज्यात धार्मिक स्थळं, मॉल, हॉटेल, रेस्टॉरंट आजपासून सुरु होणार आहेत. मात्र चर्च 13 जून पासून सुरु होतील. यासाठी तयारीचं कारण सांगितलं जात आहे. सरकारने जारी केलेल्या एसओपीचं पालन करावं लागणार आहे.

पंजाब : हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये डायनिंग नसेल. केवळ टेकअवेच्या माध्यमातून खाद्यपदार्थ मिळतील. हॉटेलमध्ये गेस्ट रुम सर्व्हिसमधून जेवण दिलं जाणार आहे. धार्मिक स्थळं सकाळी 5 वाजल्यापासून संध्याकाळी 8 वाजेपर्यंत सुरु राहतील. एकाच वेळी 20 पेक्षा जास्त भाविक जमा होऊ शकणार नाहीत. cova अॅपशिवाय पंजाबच्या मॉलमध्ये एण्ट्री नसेल. मॉलमध्ये टोकन सिस्टम लागू असेल.

हरियाणा : हरियाणा सरकारने गुरुग्राम आणि फरीदाबाद हे जिल्हे वगळता आजपासून संपूर्ण राज्यात नियमित आणि प्रतिबंधित पद्धतीने धार्मिक स्थळं, सार्वजनिक प्रार्थना स्थळं तसंच शॉपिंग मॉल पुन्हा एकदा सुरु करण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. या दोन जिल्ह्यांमध्ये मागील दहा दिवसात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या पाहता सध्या तिथे मॉल, हॉटेल, धार्मिक स्थळं सुरु होणार नाहीत. इतर जिल्ह्यांमध्ये सकाळी 9 ते रात्री 8 वाजेपर्यंत धार्मिक स्थळं, रेस्टॉरंट, हॉटेल, मॉल सुरु असतील. तर रात्री 9 ते पहाटे 5 वाजेपर्यंत कर्फ्यू असेल.

गुजरात : धार्मिक स्थळं, मॉल, हॉटेल, रेस्टॉरंट आजपासून सुरु होणार आहेत. मात्र मंदिरं सुरु करण्याबाबत मंदिर ट्रस्ट आपापल्या सोयीने तारीख निश्चित करु शकतात. बनासकांठामधील अम्बा जी मंदिर 12 जूनपासून सुरु असून सोमनाथ मंदिर आजपासून भाविकांसाठी खुलं होईल. सोमनाथ मंदिरात प्रवेशासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे. बीएपीएस ट्रस्टचे मंदिर 15 जूनपासून खुले होणार आहेत.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Bhaskar Jadhav On Nana Patole : Chhatrapati Sambhaji Nagar : गुगल मॅपने केला गोंधळ, UPSC चे विद्यार्थी परीक्षेपासून वंचितABP Majha Headlines : 2 PM : 16 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सTop 50 : टॉप 50 बातम्यांचं अर्धशतक राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा :16 June 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
खचून जाऊ नका, निखारा पेटता ठेवा! खासदारकी, आमदारकीपेक्षा शेतकरी चळवळीचा मुकूट डोक्यावर शोभून दिसतो : राजू शेट्टी 
खचून जाऊ नका, निखारा पेटता ठेवा! खासदारकी, आमदारकीपेक्षा शेतकरी चळवळीचा मुकूट डोक्यावर शोभून दिसतो : राजू शेट्टी 
Rahul Gandhi : एलॉन मस्क विरुद्ध माजी केंद्रीय मंत्री ईव्हीएमवरून भिडले; राहुल गांधींनी वायकरांचा 'निकाल' दाखवला!
एलॉन मस्क विरुद्ध माजी केंद्रीय मंत्री ईव्हीएमवरून भिडले; राहुल गांधींनी वायकरांचा 'निकाल' दाखवला!
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
Embed widget