एक्स्प्लोर

'लांसेट'ने हायड्रॉक्सिक्लोरोक्वीनबाबत अभ्यास मागे घेतला, 200 वर्षात पहिल्यांदाच असं घडलं!

लांसेट या प्रतिष्ठीत सायन्स मॅगझिनने हायड्रॉक्सिक्लोरोक्वीनबाबतचा अभ्यास मागे घेतला आहे. आपला अभ्यास चुकीचा असल्याचे लांसेटने मानले आहे.लांसेटच्या 197 वर्षीच्या इतिहासात पहिल्यांदाच असे घडले आहे. त्यामुळे लांसेटच्या प्रतिष्ठेला मोठा धक्का बसला आहे.

मुंबई : लांसेट या प्रतिष्ठीत सायन्स मॅगझिनने हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन बाबतचा यापूर्वी जाहीर केलेला अभ्यास मागे घेतला आहे. आपला अभ्यास चुकीचा असल्याचे लांसेटने मानले आहे. लांसेटच्या 197 वर्षीच्या इतिहासात पहिल्यांदाच असे घडले आहे. त्यामुळे लांसेटच्या प्रतिष्ठेला मोठा धक्का बसला आहे. लांसेटने काल याबाबत एक निवेदनात जारी केले आहे. या निवेदनात संशोधनातले तपशील देण्यात आले आहेत. संबंधित संशोधन 22 मे रोजी प्रकाशित झाले होते. त्यात 6 खंडांतील रुग्णालयात दाखल असणाऱ्या कोरोनाच्या 96 हजार रुग्णांच्या डेटाचे विश्लेषण केले गेले होते. एचसीक्यू किंवा क्लोरोक्वीनच्या वापरामुळे मृत्यूचे प्रमाण वाढल्याचे, काही रुग्णांच्या हृदयाच्या ठोक्यांमध्ये बदल झाल्याचे आढळून आल्याचे नमूद करण्यात आले होते. परंतु या संशोधनातले अनेक तपशील जुळत नसल्याने 100 हून अधिक वैज्ञानिकांनी लांसेटकडे आक्षेप नोंदवले होते. त्यावर लांसेटनी दुसरा अभ्यासगट नियुक्त केला होता. या गटाच्या अहवालानंतर लांसेटनी आपला अभ्यास परत घेतला आहे. 'कोविड-19च्या उपचारात मॅक्रोलाईडसह किंवा शिवाय एचसीक्यू अथवा क्लोरोक्वीन घेणे : एक बहुराष्ट्रीय आकलन' असा शोधनिबंध सादर करण्यात आला होता. या संशोधनातल्या संशोधकांपैकी तीन संशोधक भारतीय होते. या कथित संशोधनासाठी 6 खंडातल्या 6 हजार 71 रूग्णालयांचा अभ्यास केला गेल्याचा दावा होता. अभ्यासात 81 हजार पेशंटचा अभ्यास केला ज्यांना एचसीक्यू दिले नव्हते. 15 हजार रूग्णांना एचसीक्यू औषध दिले होते. त्यांच्या निष्कर्षातून कोविडच्या उपचारात एचसीक्यू हे औषध मदत करत नाही. उलट रूग्णांचा हृदयाचे ठोके अनियमित होऊन मत्यू होतो, असं समोर आलं होतं. हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनमुळे कोणताही धोका नाही, WHO च्या बंदीनंतर ICMR चं स्पष्टीकरण अशा विश्लेषणानंतर वैज्ञानिकांनी या औषधांमुळे कोरोनाग्रस्तांना वाचवण्याचे प्रमाण घटण्याची भीती व्यक्त केली होती. यामुळे जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) वैद्यकीय चाचणीत रुग्णांवर 'एचसीक्यू' चा वापर करण्यास मनाई केली होती. पण, जगभरातील 100 हून अधिक शास्त्रज्ञांनी 'लांसेट'चे संपादक रिचर्ड होर्टन यांना खुले पत्र लिहून या संशोधनावर आक्षेप घेतल्यानंतर 'लांसेट'ने गेल्या मंगळवारी या संशोधनावर चिंता व्यक्त केली होती. संशोधन करणाऱ्या सर्जिस फिअर या कंपनीला अभ्यासाचे तपशील देण्यास सांगण्यात आले होते. परंतु कंपनीने आपल्या संशोधनाचा आधार असलेली आकडेवारी दिली नाही. हायड्रॉक्सिक्लोरोक्वीनची ट्रायल बंद करण्याची शिफारस WHO कडून मागे कोरोना व्हायरसच्या रुग्णांवर उपचारासाठी हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन औषधाचा वापर करु नये, अशा सूचना जागतिक आरोग्य संघटनेनं (डब्लूएचओ) दिल्या होत्या. या औषधाचा वापर मलेरियाच्या रुग्णांवर उपचारासाठी होतो. या दरम्यान इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (आयसीएमआर) हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनच्या वापराने काहीही धोका नसल्याचं सांगितलं होतं. नंतर हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन या मलेरियाच्या औषधाच्या ट्रायल बंद करण्याची शिफारस WHO ने मागे घेतली आहे.
मागील 23 वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Dhananjay Munde: धनंजय मुंडे मंत्रिमंडळात कमबॅक करण्याची शक्यता, कोकाटे आऊट झाल्यास धनूभाऊंची एन्ट्री होणार?
मोठी बातमी : धनंजय मुंडे मंत्रिमंडळात कमबॅक करण्याची शक्यता, कोकाटे आऊट झाल्यास धनूभाऊंची एन्ट्री होणार?
Pune News: पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी 25 उमेदवारांची पहिली यादी जाहीर, कोणत्या प्रभागात कोणाला संधी?
पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी 25 उमेदवारांची पहिली यादी जाहीर, कोणत्या प्रभागात कोणाला संधी?
'चर्चा अंतिम टप्प्यात, संयुक्त सभा होणार, फक्त मुंबईच नाही, तर जेव्हा पहिल्या मेळाव्याची घोषणा होईल तेव्हा..' संजय राऊतांनी सांगितला ठाकरे बंधूंचा मास्टर प्लॅन!
'चर्चा अंतिम टप्प्यात, संयुक्त सभा होणार, फक्त मुंबईच नाही, तर जेव्हा पहिल्या मेळाव्याची घोषणा होईल तेव्हा..' संजय राऊतांनी सांगितला ठाकरे बंधूंचा मास्टर प्लॅन!
Manikrao Kokate Arrest: मोठी बातमी: क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंना झटका, कोणत्याही क्षणी अटक वॉरंट निघण्याची शक्यता
मोठी बातमी: क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंना झटका, कोणत्याही क्षणी अटक वॉरंट निघण्याची शक्यता

व्हिडीओ

Sanjay Raut PC : शिंदेंची शिवसेना ही अमित शाहांची टेस्ट ट्यूब बेबी, संजय राऊत यांचा घणाघात
Shivsena And BJP Seat Sharing : युतीचा बोलबाला, कधी ठरणार फॉर्म्युला? Special Report
NCP Alliance : मित्रांनी ठेवलं दूर, काकांशी एकीचा सूर; कुणाला डोकेदुखी? Special Report
Thackeray Brother Alliance : बिगुल वाजलं तरी ठाकरे बंधूंच्या युतीचं नाही ठरलं? Special Report
Chandrapur Farmer :कर्ज फेडण्यासाठी शेतकऱ्याने विकली किडनी? शेतकऱ्याचा धक्कादायक दावा Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhananjay Munde: धनंजय मुंडे मंत्रिमंडळात कमबॅक करण्याची शक्यता, कोकाटे आऊट झाल्यास धनूभाऊंची एन्ट्री होणार?
मोठी बातमी : धनंजय मुंडे मंत्रिमंडळात कमबॅक करण्याची शक्यता, कोकाटे आऊट झाल्यास धनूभाऊंची एन्ट्री होणार?
Pune News: पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी 25 उमेदवारांची पहिली यादी जाहीर, कोणत्या प्रभागात कोणाला संधी?
पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी 25 उमेदवारांची पहिली यादी जाहीर, कोणत्या प्रभागात कोणाला संधी?
'चर्चा अंतिम टप्प्यात, संयुक्त सभा होणार, फक्त मुंबईच नाही, तर जेव्हा पहिल्या मेळाव्याची घोषणा होईल तेव्हा..' संजय राऊतांनी सांगितला ठाकरे बंधूंचा मास्टर प्लॅन!
'चर्चा अंतिम टप्प्यात, संयुक्त सभा होणार, फक्त मुंबईच नाही, तर जेव्हा पहिल्या मेळाव्याची घोषणा होईल तेव्हा..' संजय राऊतांनी सांगितला ठाकरे बंधूंचा मास्टर प्लॅन!
Manikrao Kokate Arrest: मोठी बातमी: क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंना झटका, कोणत्याही क्षणी अटक वॉरंट निघण्याची शक्यता
मोठी बातमी: क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंना झटका, कोणत्याही क्षणी अटक वॉरंट निघण्याची शक्यता
Raj Thackeray & Uddhav Thackeray: बंडखोरी टाळण्यासाठी राज-उद्धव ठाकरेंची मोठी खेळी, शेवटपर्यंत उमेदवारांची नावं गुलदस्त्यात ठेवणार, फायनल निर्णय झाल्यावर...
बंडखोरी टाळण्यासाठी राज-उद्धव ठाकरेंची मोठी खेळी, शेवटपर्यंत उमेदवारांची नावं गुलदस्त्यात ठेवणार, फायनल निर्णय झाल्यावर...
Pradnya Satav: स्वर्गीय राजीव सातव यांच्या पत्नी आमदार प्रज्ञा यांचा भाजप प्रवेश ठरला! भाजपकडून काँग्रेसला तगडा धक्का
स्वर्गीय राजीव सातव यांच्या पत्नी आमदार प्रज्ञा यांचा भाजप प्रवेश ठरला! भाजपकडून काँग्रेसला तगडा धक्का
Ankita Walawalkar On Dhurandhar Movie: 'Views मिळतील तुम्हाला, पण लाज उरायला हवी...'; धुरंधरच्या 'त्या' ट्रेंडवरुन अंकिता वालावलकरची तळपायाची आग मस्तकात, काय म्हणाली?
'Views मिळतील तुम्हाला, पण लाज उरायला हवी...'; धुरंधरच्या 'त्या' ट्रेंडवरुन अंकिता वालावलकरची तळपायाची आग मस्तकात, काय म्हणाली?
Maharashtra Local Body Election: महापालिकेसह कोल्हापूर, सांगली साताऱ्यासह 'या' 14 जिल्हा परिषद निवडणुकीचा सुद्धा धुरळा उडणार? नगरपालिकांचा निकाल येताच निर्णयाची शक्यता
महापालिकेसह कोल्हापूर, सांगली साताऱ्यासह 'या' 14 जिल्हा परिषद निवडणुकीचा सुद्धा धुरळा उडणार? नगरपालिकांचा निकाल येताच निर्णयाची शक्यता
Embed widget