एक्स्प्लोर
Advertisement
संघविरोधातील 'त्या' ट्वीटच्या सुनावणीसाठी राहुल गांधी मुंबईत
पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असल्याचं ट्विट राहुल गांधी यांनी केलं होतं. याच विरोधात राष्ट्रीय स्वयंसेवक संघांने मानहानीचा दावा दाखल केला आहे.
मुंबई : पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणात राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर केलेल्या ट्वीट प्रकरणी राहुल गांधी आज मुंबईत दाखल झाले आहेत. मुंबईतल्या शिवडी कोर्टात या प्रकरणी त्यांची सुनावणी होणार आहे. राहुल गांधी विमानतळावर दाखल होताच काँग्रेस कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.
पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असल्याचं ट्वीट राहुल गांधी यांनी केलं होतं. याच विरोधात राष्ट्रीय स्वयंसेवक संघांने मानहानीचा दावा दाखल केला आहे. याच प्रकरणाची सुनावणी आज शिवडी महानगर दंडाधिकारी न्यायालयात होणार आहे.
काय आहे प्रकरण?
गौरी लंकेश या उजव्या विचारसरणीच्या कडव्या विरोधक होत्या. गौरी लंकेश यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या परआककमी लंकेश यांच्या हत्येनंतर राहुल गांधींनी संघ आणि भाजपवर निशाणा साधला. ‘भाजपच्या विचारसरणीविरोधात बोलणाऱ्या, संघाची विचारसरणी आवडत नसलेल्या व्यक्तींवर दबाव आणला जातो. अशा व्यक्तींवर हल्ले केले जातात, अशी ट्वीट राहुल गांधी यांनी केली होता.
कोण होत्या गौरी लंकेश ?
ज्येष्ठ पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्या गौरी लंकेश यांची 5 सप्टेंबरला राहत्या घरी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्यापैकी 3 गोळ्या त्यांच्या छातीत लागल्या, आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. बंगळुरुतल्या राजराजेश्वरीनगर परिसरात मंगळवार 5 सप्टेंबर रोजी ही धक्कादायक घटना घडली.
गौरी लंकेश ‘लंकेश पत्रिका’ या कन्नड साप्ताहिकाच्या त्या संपादिका होत्या. कर्नाटकातील सांप्रदायिकता आणि उजव्या विचारसरणीविरोधात त्यांनी आवाज उठवला होता. गौरी लंकेश या दिवंगत साहित्यिक पी लंकेश यांच्या कन्या होत्या.
गौरी यांच्याविरोधात मानहानीच्या दोन केसही दाखल करण्यात आल्या होत्या. धारवाडमधील भाजप खासदार प्रल्हाद जोशी आणि भाजप नेते उमेश दोषी यांनी गौरी लंकेश यांच्याविरुद्ध अब्रुनुकसानीचा आरोप केला होता. 2008 मध्ये छापलेल्या लेखात मानहानी केल्याप्रकरणी दोषी आढळल्याने त्यांना सहा महिन्यांचा कारावास आणि दहा हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता. मात्र त्यांची जामिनावर मुक्तता झाली.
कशी झाली गौरी लंकेश यांची हत्या?
डॉ. नरेंद्र दाभोळकर, कॉम्रेड गोविंद पानसरे आणि प्राध्यापक एम एम कलबुर्गींच्या हत्येनंतर देशात पुन्हा एकदा सामाजिक कार्यकर्त्याची हत्या करण्यात झाली. बंगळूरमधल्या पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्या गौरी लंकेश यांची राहत्या घरी 4 गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्यापैकी 3 गोळ्या त्यांच्या छातीत लागल्या, आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.
बंगळुरूतल्या राजराजेश्वरी नगर परिसरात मंगळवार 5 सप्टेंबर रोजी ही धक्कादायक घटना घडली.
गौरी लंकेश या दिवंगत साहित्यिक पी लंकेश यांच्या कन्या होत्या. कर्नाटकातील सांप्रदायिकता आणि उजव्या विचारसरणीविरोधात त्यांनी आवाज उठवला होता.
55 वर्षीय गौरी लंकेश बंगळुरुतील राजराजेश्वरी नगरमध्ये राहत होत्या. मंगळवारी रात्री 8 च्या सुमारास तीन आरोपींनी त्यांना घराबाहेर बोलावलं. त्यांच्यासोबत झालेल्या वादावादीनंतर आरोपींनी गौरी यांच्यावर गोळ्या झाडून पोबारा केला.
मारेकऱ्यांनी गौरी लंकेश यांच्यावर 50 मीटर अंतरावरुन गोळ्या झाडल्या. त्यापैकी तीन गोळ्या त्यांच्या छातीवर, तर एक त्यांच्या कपाळावर लागली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement