Corona Vaccination : देशभरात सप्टेंबर-ऑक्टोबरपर्यंत लहान मुलांसाठीची लस उपलब्ध होण्याची शक्यता
मुलांसाठीच्या लसीची चाचणीही अंतिम टप्प्यात आली आहे. सप्टेंबर-ऑक्टोबरपर्यंत मुलांची लसदेखील बाजारात उपलब्ध होऊ शकेल अशी अपेक्षा आहे, असं केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मंडावीया यांनी म्हटलं.
Corona Children Vaccine : देशभरात सप्टेंबर-ऑक्टोबरपर्यंत लहान मुलांची येऊ शकते. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मंडावीया यांनी भाजपच्या संसदीय पक्षाच्या बैठकीत ही माहिती दिली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी भाजपच्या खासदारांना सांगितले की देशभरात लहान मुलांच्या लसीची उत्सुकतेने वाट पाहिली जात आहे, ती लस पुढील 2 महिन्यांत बाजारात येऊ शकते. कारण या लसीची चाचणी अनेक टप्प्यात बरीच पुढे गेली आहे.
भाजपच्या संसदीय पक्षाच्या बैठकीत केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मंडावीया यांनी भाजप खासदारांना सरकारकडून चालवल्या जाणार्या लसीकरण कार्यक्रमाची माहिती दिली. तसेच सांगितले की सध्या कोरोना लसीबाबत देशात काम जोरात सुरू आहे. मुलांसाठीच्या लसीची चाचणीही अंतिम टप्प्यात आली आहे. सप्टेंबर-ऑक्टोबरपर्यंत मुलांची लसदेखील बाजारात उपलब्ध होऊ शकेल अशी अपेक्षा आहे, असं त्यांनी म्हटलं.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, यावेळी केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मंडावीया यांनी लसीच्या वेगवेगळ्या कंपन्या आणि त्यांच्याकडून देशात तयार केलेल्या लसीची माहिती भाजप खासदारांसमोर ठेवली. केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी या बैठकीत सांगितले की लवकरच देशात 6 कंपन्यांची लस उपलब्ध होऊ शकेल. त्यामुळे वेगवेगळ्या कंपन्यांच्या लसी घेण्याचा पर्यायही त्यांच्या सोयीनुसार लोकांसमोर असेल.
यासह केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी भाजपच्या संसदीय पक्षाच्या बैठकीत नाकातून देण्यात येणाऱ्या लसीविषयीही माहिती दिली. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार केंद्रीय आरोग्यमंत्री म्हणाले की 15 ऑगस्टनंतर भारत बायोटेकची नेजल वॅक्सिनही बाजारात येऊ शकते.