Coronavirus | मोदी पुन्हा रात्री आठची वेळ साधणार, देशाला संबोधित करणार
कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारांकडूनही अनेक प्रयत्न सुरु आहेत. अशावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधणार आहेत. रात्री आठ वाजता पंतप्रधान मोदी राष्ट्राला उद्देशून काही संदेश देण्याची, तसेच एखादी मोठी घोषणा करण्याची शक्यताही नाकारता येत नाही.
नवी दिल्ली : कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री 8 वाजता देशाला संबोधणार आहेत. कोरोना व्हायरसशी लढण्यासाठ करण्यात येत असलेल्या उपाययोजनांबाबत चर्चा करणार आहेत. तसेच मोदी एखादी मोठी घोषणा करण्याची शक्यताही नाकारता येत नाही. त्यामुळे पंतप्रधान मोदी काय बोलणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. आतापर्यंत देशात 151 कोरोनाग्रस्त आहेत. तर तीन जणांचा मृत्यू झाला आहे.
पीएमओने ट्वीट करून दिली माहिती
पंतप्रधान कार्यालय पीएमओने यांसदर्भात ट्वीट करून माहिती दिली आहे. 'पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 मार्च 2020 रोजी रात्री आठ वाजता देशाला संबोधित करणार आहेत. ज्यामध्ये ते कोरोना व्हायरस संबंधित मुद्दे आणि कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी असलेल्या उपाययोजनांबाबत चर्चा करणार आहेत.'
आणखी एक ट्वीट करत पीएमओने सांगितलं आहे की, 'पंतप्रधानांनी कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावावर करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत समिक्षा करण्यासाठी एका उच्च स्तरीय बैठक बोलावली होती. तेसचे ट्वीटमध्ये सांगितलं आहे की, 'कोरोनाशी लढा देण्यासाठी भारताला आणखी मजबुत करण्याच्या पद्धतींवर चर्चा करणार.'
देशामध्ये कोरोना व्हायरसच्या रूग्णांच्या संख्येत वाढ
सध्या देशांत कोरोना बाधितांची संख्या वाढून 151 झाली आहे. त्यापैकी 25 विदेशी नागरिकांचा समावेश आहे. देशातील सर्वाधिक कोरोनाग्रस्तांची संख्या महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्रात 45 कोरोना बाधित आहेत. तर महाराष्ट्रानंतर सर्वाधिक रूग्ण केरळमध्ये आहेत.
पाहा व्हिडीओ : Indian Students Stuck | फिलिपिन्समध्ये शिक्षणासाठी गेलेले विद्यार्थी सिंगापूरमध्ये अडकून पडले
आतापर्यंत जगभरात आठ हजार लोकांचा मृत्यू
कोरोना व्हायरसमुळे जगभरात दोन लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. चीनमध्ये सर्वात आधी डिंसेबरमध्ये कोरोना बाधित रूग्ण आढळून आला होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बुधवारी आंतराष्ट्रीय वेळेनुसार दुपारी एकपर्यंत कोरोना व्हायरसमुळे जगभरात जवळपास 200,680 लोकांना संसर्ग झाला आहे. तर 8000 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे.
संबंधित बातम्या :
येत्या दहा पंधरा दिवसांत आठ ठिकाणी टेस्टिंग लॅब सुरु करणार : आरोग्यमंत्री राजेश टोपे