एक्स्प्लोर
भारतीय लष्करामध्ये कोरोनाचा शिरकाव, कर्नल रँकच्या डॉक्टरसह तिघे कोरोना पॉझिटिव्ह
कोरोनाचा प्रकोप आता भारतीय लष्करापर्यंत जाऊन पोहोचला आहे. भारतीय सैन्यदलातील कोलकाता येथील कमांड हॉस्पिटलमधील कर्नल रँकचे डॉक्टर आणि डेहराडूनमधील जेसीओ यांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत

नवी दिल्ली: कोरोनाचा प्रकोप आता भारतीय लष्करापर्यंत जाऊन पोहोचला आहे. भारतीय सैन्यदलातील कोलकाता स्थित कमांड हॉस्पिटलमधील कर्नल रँकचे डॉक्टर आणि डेहराडूनमधील जेसीओ यांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. विशेष म्हणजे या दोन्ही अधिकाऱ्यांनी नुकतीच दिल्ली दौरा केला होता. त्यामुळे ते ज्या सैनिकांच्या संपर्कात आले होते त्या सैनिकांना कवारणताईन करण्यात आले आहे. माहितीनुसार, कोविड-19 टेस्ट पॉझिटिव्ह निघालेल्या कर्नल रँकचे डॉक्टर मिलिटरी हॉस्पिटलमध्ये तैनात होते. त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे लक्षात येताच उपचारासाठी भरती केलं आहे. दुसरीकडे डेहराडूनमधील जेसीओ (सुभेदार रँकचे अधिकारी ) यांना देखील उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले आहे. या दोन्ही अधिकाऱ्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती भारतीय सैन्यदलाने दिली आहे. दोन्ही अधिकाऱ्यांनी आपापल्या कामांसाठी दिल्लीचा दौरा केला होता. त्यामुळं त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्व सिव्हिल आणि मिलिटरी अधिकाऱ्यांना शोधून कॉरेंटाईन केलं गेलं आहे. Coronavirus | क्वारंटाईन व्यक्तींवर लक्ष ठेवण्यासाठी 'मुंबई आयआयटी'कडून क्वारंटाईन अॅपची निर्मिती भारतीय सैन्यात कोविड-19 पॉझिटिव्ह तीन घटना समोर आल्या आहेत. यापूर्वी लदाखमधील एका सैनिकाला कोरोनाची लागण झाली होती. त्याच्यावर लेहमधील एका हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. या सैनिकाच्या वडिलांनी नुकतीच इराणची यात्रा केली होती. त्यामुळं त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यावेळी सदर सैनिक सुट्टीसाठी घरी असल्याने त्याला देखील याची लागण झाली असल्याची माहिती आहे. बीएसएफच्या कमांडोला कोरोनाची लागण बीएसएफच्या एका कमांडोला देखील कोरोनाची लागण झाली आहे. हा कमांडो मध्यप्रदेश मधील टेकणपूर अकादमीत तैनात आहे. काही दिवसांपूर्वी या कमांडोची पत्नी इंग्लंडवरून आली आहे. या कमांडोवर टेकणपूरमधील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. दरम्यान, मुंबई एअरपोर्टवर तैनात सीआईएसएफच्या जवानाला देखील कोरोनाची लागण झाली आहे. काही लक्षणं आढळून आल्यानंतर या जवानाला आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलं होतं. रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर या जवानाला हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं आहे. संबंधित बातम्या : CoronaUpdate | ही आणीबाणीची स्थिती, कोरोनाविरोधातील लढाईत सर्वजण एकवटल्याचं समाधान : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबईतील सैफी रुग्णालयातील कोरोनाबाधित सर्जनचे रुग्णांवर उपचार; पालिकेकडून हॉस्पिटल सील Coronavirus | कोरोना संकट | राज्यभरात 22,118 खोल्यांमध्ये 55,707 खाटांची सोय : अशोक चव्हाण
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
निवडणूक
महाराष्ट्र























