एक्स्प्लोर
India Lockdown : आज रात्री 12 पासून संपूर्ण देश पुढील 21 दिवसांसाठी लॉकडाऊन : पंतप्रधान मोदी
जनता कर्फ्यूला सफल करण्यात सर्व भारतीयांचा हात आहे. जेव्हा देशात संकट येते तेव्हा सर्व एकत्र येतात त्यांमुळे सर्व भारतीय या यशाचे शिल्पकार आहे

नवी दिल्ली : ’ करोनामुळे देशासमोर मोठं संकट उभं राहिलं आहे. या महारोगाचा संसर्ग इतक्या झपाट्यानं होत आहे की, त्यांची साखळी तोडण्याशिवाय देशासमोर कोणताही पर्याय नाही. त्यामुळे पुढील 21 दिवस संपूर्ण देश लॉकडाऊन करण्यात येणार आहे, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. जनता कर्फ्यूला सफल करण्यात सर्व भारतीयांचा हात आहे. जेव्हा देशात संकट येते तेव्हा सर्व एकत्र येतात त्यांमुळे सर्व भारतीय या यशाचे शिल्पकार आहे, असे देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. कोरोना हा आगीसारखा हा पसरत चालला आहे. त्यामुळे एकमेव पर्याय आपल्यासमोर आहे, तो म्हणजे सोशल डिस्टनींग आणि घरातच राहणं. देशाच्या भल्यासाठी देशातील जनतेच्या भविष्यासाठी ही घोषणा केली आहे. हा लॉकडाउन जनता कर्फ्यूसारखा नसेल. अत्यंत कडक पद्धतीनं लागू केला जाईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. नरेंद्र मोदी म्हणाले, प्रगत राष्ट्रात विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यात अपयश आले. याला थोपवायचे असेल तर आपल्याला गर्दी टाळणे हा एकमेव पर्याय आहे.काही देशांनी कोरोनावर नियंत्रण मिळवलं आहे त्यांच्याकडून आदर्श घेतला पाहिजे. त्या देशातील नागरिक अनेक आठवडे घराबाहेर पडले नाहीत. या नागरिकांनी सर्व सूचनांचं पालन केलं. त्यामुळे आपल्या समोर फक्त हा एकच मार्ग आहे असं समजलं पाहिजे सोशल डिस्टन्सिंग अनिवार्य कोरोनाचा प्रादुर्भाव थांबवायचा असेल तर याची सायकल तोडणे गरजेचे आहे. काही लोकांमध्ये गैरसमज आहे की, सोशल डिस्टनींग हे फक्त आजारी माणसांसाठी तर सामान्य व्यक्तीपासून ते पंतप्रधानांपर्यंत अनिवार्य आहे.काही लोकांच्या चुकीच्या विचारामुळे आपल्या संपूर्ण कुटुंबासाठी याचा मोठा धोका आहे. जर असाच बेजबाबदारपणा सुरु राहिला तर तर भारताला याची मोठी किंमत चुकवावी लागू शकते. कोरोनासाठी 15 हजार कोटींची तरतूद कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी 15 हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. केंद्र आणि राज्य सरकार वेगाने काम करत आहेत. लोकांना असुविधा होऊ नये यासाठी सतत प्रयत्न करत आहे. जीवनाश्यक वस्तूंचा पुरवठा होईल यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. संकटाची ही वळ गरिबांसाठी कठीण आहे असं नरेंद्र मोदींनी म्हटलं. जागतिक महामारी घोषित केलेल्या कोरोना व्हायरसनं भारतातही हैदोस घातला आहे. कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुन्हा देशाला संबोधित केलं. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ते जनतेशी संवाद साधला. कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांबाबत चर्चा केली आहे. आतापर्यंत देशात कोरोना बाधितांचा आकडा 500 पार गेला आहे. तर दहा जणांचा मृत्यू झाला आहे. संबंधित बातम्या : पोलिसांनी आपल्या हातातील काठीला आता तेल लावून ठेवा : अनिल देशमुख परिस्थितीचा कोणीही संधी म्हणून उपयोग करू नये : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे India lockdown : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितली कोरानाची नवीन परिभाषा
आणखी वाचा























