एक्स्प्लोर

Maharashtra School Reopen : नाशिकमध्ये 10 डिसेंबर, मुंबई-पुण्यात 15 डिसेंबर, तुमच्या जिल्ह्यात शाळा कधी उघडणार?

Maharashtra School Reopening : राज्यातील बहुतांशी ठिकाणी उद्यापासून, एक डिसेंबरपासून शाळा सुरू होणार आहेत. मुंबई, पुणे, औरंगाबाद, नाशिक या महापालिका क्षेत्रात उद्यापासून शाळा सुरू होणार नाहीत.

Maharashtra School Reopening :  राज्यात एक डिसेंबरपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. या निर्णयानंतर ओमिक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र चिंता व्यक्त केली जात होती. शाळा सुरू करण्याबाबतच्या निर्णयावरही  प्रश्न उपस्थित करण्यात येत होते. राज्यातील महत्त्वाच्या महापालिकांनी एक डिसेंबरपासून शाळा सुरू न करण्याचा निर्णय घेतला आहे. तर, ग्रामीण भागात शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे तब्बल दोन वर्षानंतर राज्यात पहिली ते सातवीचे वर्ग उद्यापासून सुरू होणार आहेत. लहान मुलांच्या आवाजाने शाळा पुन्हा एकदा गजबजणार आहेत. 

शासनाच्या नियमांचं पालन करत विद्यार्थ्यांची काळजी घेणार असल्याचं प्रत्येक शाळेचं म्हणणं आहे. शाळांनी आपली सारी तयारी केली असून प्रत्येक शिक्षक आता प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यासाठी उत्सुक आहेत.

मुंबई महापालिकेने 15 डिसेंबरपासून प्राथमिक शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत आज झालेल्या बैठकीत पालिका आयुक्तांनी हा निर्णय घेतला आहे. 

औरंगाबाद शहरातील शाळा सुरू होणार नाहीत. ग्रामीण भागातील शाळा सुरू उद्यापासून सुरू होणार आहेत. औरंगाबादच्या ग्रामीण भागातील शाळा उद्यापासून सुरू करणार असल्याची माहिती औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिली. औरंगाबाद शहरातील शाळांबाबतचा निर्णय 10 डिसेंबरनंतर परिस्थिती पाहून घेण्यात येईल असे मनपा आयुक्त आस्तिककुमार पांडे यांनी सांगितले. 

पुणे महानगरपालिकेने पहिली ते आठवीची शाळा 15 डिसेंबरपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. 15 डिसेंबरनंतर शाळा सुरू करण्यात येणार आहे.    

नाशिक महापालिकेनेदेखील 10 डिसेंबरपर्यंत शाळा सुरू न करण्याचा निर्णय घेतला आहे. 

रत्नागिरीमधील शाळा उद्यापासून सुरू होणार आहेत. तर, महाराष्ट्राच्या टोकावर असलेल्या गडचिरोलीमध्येही उद्यापासून शाळा सुरू करण्यात येणार आहेत. त्यादृष्टीने तयारीही सुरू करण्यात आली आहे. 

वाशिम जिल्ह्यात पहिले ते चौथी पर्यंतच्या सर्व  395 शाळा उघडणार असल्याचं शिक्षण अधिकाऱ्यांनी सांगितले

नांदेड, अमरावतीमध्ये उद्यापासून शाळा सुरू होणार आहेत. 

बुलढाणामध्ये उद्यापासून सर्व प्राथमिक शाळा सुरू होणार आहेत. , नंदुरबार, परभणी आणि गडचिरोलीत साफसफाई आणि सॅनिटायझेशनने जोर पकडला असून उद्यापासून शाळा होणार आहेत. 

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour Sanjay Raut : 'तो' आरोप राऊतांना महाग पडला? दुसरी जेलवारी थोडक्यात टळली?ABP Majha Headlines : 11 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सDubai Sheikh Wife Bikini Special Report : पत्नीला बिकिनीत पाहण्यासाठी केला 400 कोटींचा चुराडाPune Metro Inauguration Special Report :दौरा रद्द झाला, मेट्रोचं लोकार्पण रखडलं; पुणकरांना जाम खटकलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
Embed widget