एक्स्प्लोर

Ban On PFI: मोठी बातमी! केंद्र सरकारकडून पीएफआयवर पाच वर्षांची बंदी

Ban On PFI: केंद्र सरकारने पीएफआय या संघटनेवर अखेर पाच वर्षांची बंदी घातली आहे. तपास यंत्रणांनी केलेल्या शिफारसीनंतर ही बंदी घालण्यात आली आहे.

Ban On PFI: दहशतवादी कारवायांमध्ये गुंतल्याचा ठपका असलेली पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) या संघटनेवर केंद्र सरकारने पाच वर्षांची बंदी घातली आहे (PFI Ban) . केंद्र सरकारने याबाबतचा अध्यादेश जारी केला आहे. तपास यंत्रणांच्या शिफारसीवर गृहमंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे. मागील काही दिवसांत केंद्रीय तपास यंत्रणांनी पीएफआयवर जोरदार कारवाई सुरू केली होती. राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA), ईडी (ED) यांच्यासह विविध राज्यातील तपास यंत्रणांनी पीएफआयच्या कार्यालयांवर 22 सप्टेंबर आणि 27 सप्टेंबर रोजी छापे मारले आहेत. केंद्र सरकारने पीएफआय शिवाय इतर संघटनांवरही बंदी घातली आहे. 

एनआयए व इतर तपास यंत्रणांनी संयुक्तपणे 22 सप्टेंबर रोजी देशभरात केलेल्या  कारवाईच्या पहिल्या फेरीत PFI शी संबंधित 106 लोकांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर या लोकांच्या चौकशीतून काही गोष्टींचा आणि त्यासंबंधित व्यक्तींची नावे समोर आली. त्यानंतर एनआयए आणि इतर तपास यंत्रणांनी पुन्हा एकदा देशभरात छापे टाकले. यावेळी तपास यंत्रणांनी PFI शी संबंधित 247 लोकांना ताब्यात घेण्यात आले. यातील काहींना अटकही करण्यात आली. तपास यंत्रणांना पीएफआयविरोधात पुरेसे पुरावे मिळाले. यानंतर तपास यंत्रणांनी गृह मंत्रालयाकडे कारवाईची मागणी केली होती. तपास यंत्रणांच्या शिफारशीवरून गृह मंत्रालयाने पीएफआयवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.

पीएफआय ही देशविरोधी कारवायांमध्ये गुंतली असल्याचे ठोस पुरावे यंत्रणांना मिळाले असल्याचे म्हटले जात आहे. तपास यंत्रणांनी काही दिवसांपूर्वी  अटक केलेल्या पदाधिकाऱ्यांच्या चौकशीत अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ला, त्यांच्या सभेत घातपात घडवण्यासह राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपच्या नेत्यांची हत्या करण्याचा कट पीएफआयने आखला होता. पुढील 25 वर्षात भारताला इस्लामिक राष्ट्र बनवण्याचे त्यांचे लक्ष्य होते असे, तपास यंत्रणांच्या अधिकाऱ्यांनी सांगितले होते. 

पीएफआय ही संघटना कट्टरतावादी विचारांची संघटना समजली होती. केरळ, कर्नाटकमध्ये या संघटनेचे मोठे कार्यक्षेत्र आहे. देशातील 24 राज्यांमध्ये या संघटनेची शाखा आहे. मु्स्लिमबहुल भागात जनाधार मिळवण्याचा प्रयत्न या संघटनेकडून सुरू होता. महाराष्ट्रातही मुंबई, ठाणे,  पुणे, नाशिक, औरंगाबाद, सोलापूर आदी जिल्ह्यांमध्ये त्यांचे काम सुरू होते. पुणे हे पीएफआयचे मुख्य केंद्र असल्याचे म्हटले जाते. 

या संघटनांवरही बंदी

पीएफआय व्यतिरिक्त, रिहॅब इंडिया फाउंडेशन (RIF), कॅम्पस फ्रंट ऑफ इंडिया (CFI), ऑल इंडिया इमाम कौन्सिल (AIIC), नॅशनल कॉन्फेडरेशन ऑफ ह्यूमन राइट्स ऑर्गनायझेशन (NCHRO), नॅशनल वुमन फ्रंट, ज्युनियर फ्रंट, एम्पॉवर इंडिया फाउंडेशन आणि रिहॅब फाउंडेशन, केरळसारख्या सहयोगी संघटनांवरही बंदी घालण्याचा निर्णय गृहमंत्रालयानं घेतला आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या:

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur ZP Election Result: अजितदादांच्या अकाली निधनानंतर कोल्हापूरकरांची राष्ट्रवादीला साथ; सतेज पाटलांची पुन्हा एकदा महायुतीविरोधात एकहाती कडवी झुंज
अजितदादांच्या अकाली निधनानंतर कोल्हापूरकरांची राष्ट्रवादीला साथ; सतेज पाटलांची पुन्हा एकदा महायुतीविरोधात एकहाती कडवी झुंज
ZP निवडणुकीत धाकटी ठरली वरचढ; थोरल्या जाऊबाईंचा अवघ्या 2 मतांनी पराभव; माजी आमदाराला 'दे धक्का'
ZP निवडणुकीत धाकटी ठरली वरचढ; थोरल्या जाऊबाईंचा अवघ्या 2 मतांनी पराभव; माजी आमदाराला 'दे धक्का'
Satara ZP Election Result 2026 : माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांना धक्का, पत्नी प्राची पाटील पराभूत, शिवसेनेच्या 22 वर्षांच्या उमेदवार मृणाल पाटील विजयी
साताऱ्याच्या पाटण तालुक्यातून धक्कादायक निकाल, नरेंद्र पाटील यांच्या पत्नी प्राची पाटील पराभूत, शिवसेनेच्या मृणाल पाटील विजयी
Sangli : मुख्यमंत्र्यांचं नाव घेत आव्हान दिलं, आता सर्व जागा जिंकत भाजपचा धुव्वा उडवला, खानापुरात शिंदेंच्या आमदाराची कमाल
मुख्यमंत्र्यांचं नाव घेत आव्हान दिलं, आता सर्व जागा जिंकत भाजपचा धुव्वा उडवला, खानापुरात शिंदेंच्या आमदाराची कमाल

व्हिडीओ

Aditi Tatkare : निवडणुकीतील यश पाहण्यासाठी दादा हवे होते, निवडणुकीच्या यशानंतर अदिती तटकरे भावूक
Sharad Pawar Health Update : शरद पवार होतोय श्वसनाचा त्रास, रुबी रुग्णालयात केलं दाखल
Ram Satpute On ZP Election : मोहिते पाटील आणि जानकरांना घरात बसवलं- राम सातपुते
Avinash Jadhav : एक दिवस असा येईल की भाजपला एक जागा आणायलाही कसर करावी लागेल
Bharat Gogawale ZP Celebration : जिल्हा परिषदेत लेकाचा विजय, भरत गोगावलेंचं विजयी सेलिब्रेशन

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur ZP Election Result: अजितदादांच्या अकाली निधनानंतर कोल्हापूरकरांची राष्ट्रवादीला साथ; सतेज पाटलांची पुन्हा एकदा महायुतीविरोधात एकहाती कडवी झुंज
अजितदादांच्या अकाली निधनानंतर कोल्हापूरकरांची राष्ट्रवादीला साथ; सतेज पाटलांची पुन्हा एकदा महायुतीविरोधात एकहाती कडवी झुंज
ZP निवडणुकीत धाकटी ठरली वरचढ; थोरल्या जाऊबाईंचा अवघ्या 2 मतांनी पराभव; माजी आमदाराला 'दे धक्का'
ZP निवडणुकीत धाकटी ठरली वरचढ; थोरल्या जाऊबाईंचा अवघ्या 2 मतांनी पराभव; माजी आमदाराला 'दे धक्का'
Satara ZP Election Result 2026 : माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांना धक्का, पत्नी प्राची पाटील पराभूत, शिवसेनेच्या 22 वर्षांच्या उमेदवार मृणाल पाटील विजयी
साताऱ्याच्या पाटण तालुक्यातून धक्कादायक निकाल, नरेंद्र पाटील यांच्या पत्नी प्राची पाटील पराभूत, शिवसेनेच्या मृणाल पाटील विजयी
Sangli : मुख्यमंत्र्यांचं नाव घेत आव्हान दिलं, आता सर्व जागा जिंकत भाजपचा धुव्वा उडवला, खानापुरात शिंदेंच्या आमदाराची कमाल
मुख्यमंत्र्यांचं नाव घेत आव्हान दिलं, आता सर्व जागा जिंकत भाजपचा धुव्वा उडवला, खानापुरात शिंदेंच्या आमदाराची कमाल
नेतेमंडळींनाही दणका, कुणाची कन्या, कुणाच्या वहिनी पराभूत; आमदार, खासदार अन् मंत्र्यांच्या नातेवाईकांचं काय झालं?
नेतेमंडळींनाही दणका, कुणाची कन्या, कुणाच्या वहिनी पराभूत; आमदार, खासदार अन् मंत्र्यांच्या नातेवाईकांचं काय झालं?
Raigad ZP Election Result 2026: रायगड जिल्हा परिषदेत महायुतीचं वर्चस्व, कोणाला किती जागा मिळाल्या?
Raigad ZP Election Result 2026: रायगड जिल्हा परिषदेत महायुतीचं वर्चस्व, कोणाला किती जागा मिळाल्या?
Pravin Tidme: आधी म्हणाले, महानगरप्रमुख अन् नगरसेवकपदाचा राजीनामा देणार; आता शिंदे सेनेच्या प्रवीण तिदमेंनी निर्णय बदलला; माध्यमांसमोर सगळंच सांगितलं!
आधी म्हणाले, महानगरप्रमुख अन् नगरसेवकपदाचा राजीनामा देणार; आता शिंदे सेनेच्या प्रवीण तिदमेंनी निर्णय बदलला; माध्यमांसमोर सगळंच सांगितलं!
Ajit Pawar ZP Election Result: मावळमध्ये सुनील शेळकेंचा डंका, सगळ्या जागा राष्ट्रवादीने जिंकल्या, अजितदादांची आठवण येताच डोळे पाणावले
मावळमध्ये सुनील शेळकेंचा डंका, सगळ्या जागा राष्ट्रवादीने जिंकल्या, अजितदादांची आठवण येताच डोळे पाणावले
Embed widget