(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Manipur Exit Poll 2022 : मणिपूरमध्ये भाजप सत्ता स्थापन करणार? पाहा काय सांगतोय एबीपी माझाचा एक्झिट पोल
manipur Exit Poll 2022 : ABP Cvoter यांनी केलेल्या एक्झिट पोलमध्ये मणिपूरमध्ये कोणत्याच पक्षाला बहुमत मिळणार नाही, असा अंदाज सर्व्हेमध्ये व्यक्त करण्यात आला आहे.
manipur Exit Poll 2022 : मणिपूरमध्ये मणिपूरमध्ये कोणत्याच पक्षाला बहुमत मिळणार नाही असा अंदाज ABP Cvoter एक्झिट पोलमध्ये (Exit Poll 2022) बांधण्यात येत आहे. मणिपूरमध्ये भाजपला सर्वात जास्त जागा मिळतील. त्याखालोखाल काँग्रेसला जागा मिळतील अशी शक्यता एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आली आहे. मणिपूर विधानसभेचा निकाल 10 मार्च रोजी जाहीर होणार आहे. परंतु, त्याआधी एबीपी माझाच्या एक्झिट पोलमध्ये हा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
एबीपी माझाच्या एक्झिट पोलनुसार, 2022 च्या मणिपूर विधानसभा निवडणुकीत कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळणार नाही. 60 जागांसाठी मणिपूरमध्ये दोन टप्प्यात मतदान झाले. सत्ता स्थापन करण्यासाठी 31 जागांची आवश्यकता आहे. एबीपी माझाच्या एक्झिट पोलनुसार मणिपूरमध्ये भाजप युतीला 23 ते 27 जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. काँग्रेस पक्षाला 12 ते 16 जागा मिळू शकतात, तर एनपीएफला केवळ 3 ते 7 जागांवर समाधान मानावे लागेल. एनपीपीला 10 ते 14 जागा मिळतील. तर 2 ते 6 जागा इतरांच्या खात्यात जाऊ शकतात. अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.
भाजप-काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी
पहिल्या टप्प्यातील मतदानापूर्वी भाजप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली होती. मणिपूरच्या कुचिंगमध्ये 2 मार्चच्या रात्री उशिरा काँग्रेस आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ झाला होता.
दोन टप्प्यात मतदान
मणिपूरमध्ये 28 फेब्रुवारी रोजी पहिल्या टप्प्यातील मतदान झाले होते. यामध्ये अनेक मतदान केंद्रांवर बूथ कॅप्चरिंग आणि ईव्हीएममध्ये छेडछाड केल्याचे आरोप झाले होते. या प्रकाराची तक्रार निवडणूक आयोगाकडे करण्यात आली होती. निवडणूक आयोगाने अनेक मतदान केंद्रांवर पुन्हा निवडणुका घेण्याचे आदेश दिले.5 मार्च रोजी दुसऱ्या टप्प्यातील मतदानावेळी झाले.
पहिल्या टप्प्यात 78 टक्के मतदान
मणिपूर विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात 38 जागांसाठी ७८.०३ टक्के मतदान झाले होते.तर दुसऱ्या टप्प्यात 22 जागांसाठी 76.62 टक्के मतदान झाले होते.
एक्झिट पोलमधून तंतोतंत आकडेवारी समोर येत नसली, तरी मतदारांचे प्रश्न तात्पुरत्या स्वरुपात शमतात. कारण एक्झिट पोलमधून वर्तवले जाणारे अंदाज हे बहुतांश वेळा अंतिम निकालाच्या जवळपास जाणारे असतात.
एक्झिट पोल मेथॉडोलॉजी काय?
सध्याच्या सर्वेक्षणाचे निष्कर्ष आणि अंदाज C-Voter एक्झिट पोल/पोस्ट पोल मतदानाच्या दिवशी आणि मतदानाच्या दिवसानंतर राज्यभरातील 18 वर्षावरील व्यक्तींच्या मुलाखतींवर आधारित आहेत. सर्व मतदारांनी दिलेले तपशील, माहिती, अंदाज त्या दिवसावर आधारीत आहेत. राज्याच्या लोकसंख्येच्या प्रमाणात डेटा जमा करण्याचा प्रयत्न करण्यात आला. काही वेळेस ही संख्या 100 च्या प्रमाणात नाही. आमचा अंतिम डेटा हा राज्याच्या लोकसंख्येच्या प्रमाणातील सामाजिक-आर्थिक स्तराच्या +/- 1% प्रमाणात आहे. आम्ही संभाव्य निकालाच्या अगदी सर्वात जवळचा अंदाज वर्तवू शकतो असा आमचा विश्वास आहे.
या सर्वेंसाठी सर्व विधानसभा मतदारसंघातील नमुने घेण्यात आले आहेत. MoE मॅक्रो स्तरावर +/- 3% आणि सूक्ष्म स्तरावर +/- 5% इतके आहे. विश्लेषणासाठी आम्ही आमच्या अल्गोरिदमचा वापर केला आहे. प्रांतीय आणि विभागीतय मतांचे विश्लेषण करण्यासाठी Split-Voter घटकाचा वापर केला आहे. याच घटकाचा वापर मतदानाची टक्केवारी, जागा किती मिळू शकतात, याचा अंदाज वर्तवण्यासाठी केला आहे. मिळणार असलेल्या मतांच्या टक्केवारीचा अंदाज आणि मिळणाऱ्या अंदाजित जागा यासाठी अंकगणिताचा शास्त्रीय वापर करण्यात आला आहे. संभाव्य मिळणाऱ्या जागांचा अंदाज वर्तवणे हा सर्वेक्षण विज्ञानाचा भाग नाहीत.
सी वोटर एक्झिट पोलसाठीचा डेटा हा मतदान केल्यानंतर मतदारांकडून घेतला जातो. निवडणूक संपेपर्यंत ही प्रक्रिया सुरू असते. एकाच राज्यासाठी ही मुलाखती घेतल्या जातात. यासाठी सर्व विधानसभा मतदारसंघात यादृच्छिकपणे मतदान केंद्र निवडले जातात. अंदाज योग्य पद्धतीने वर्तवण्यासाठी आम्ही अल्गोरिदम प्रक्रियेचा वापर केला आहे.
सर्वेक्षणासाठी आम्ही यादृच्छिकपणे डेटा जमा केला आहे. जणगणनेनुसार असलेल्या स्थानिक लोकसंख्या, त्यातील वैविध्य आदींचा विचार करण्यात आला आहे. आम्ही WAPOR कोडचा (World Association of Public Opinion Research) वापर केला आहे. असोसिएशन ऑफ पब्लिक ओपिनियन रिसर्च आणि प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाची मार्गदर्शक तत्वे ही आम्ही SOP म्हणून मान्य केली आहेत.
संबंधित बातम्या :