एक्स्प्लोर

UP Exit Poll 2022: सर्वात मोठा निकाल उत्तरप्रदेशचा! अचूक एक्झिट पोल कधी अन् कुठे?

Uttar Pradesh Election Result ABP C-Voter Exit Poll 2022:  सर्वात जास्त लक्ष लागलं आहे ते उत्तरप्रदेश विधानसभा निकालाचे. आज रात्री साधारण आठ वाजता निकालाचे कल आपण एबीपी माझावर पाहू शकणार आहोत. 

ABP C-Voter Exit Poll 2022:  पाच राज्यांच्या निवडणुकांचा निकाल आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. 10 मार्च रोजी मतमोजणीनंतर उत्तर प्रदेश, पंजाब, मणिपूर, उत्तराखंड आणि गोवा (Uttar Pradesh, Punjab, Manipur, Uttrakhand, Goa) या पाच राज्यांमध्ये कोणाचं सरकार स्थापन होणार हे स्पष्ट होईल, मात्र अंतिम निकाल येण्याआधीच अनेकांनी आपले अंदाजपंचे निकाल मांडायला सुरुवात केली आहे. यात सर्वात जास्त लक्ष लागलं आहे ते उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीच्या निकालाचे.  भाजप युपीमध्ये पुन्हा आपली सत्ता स्थापन करणार का? भाजपला एकहाती बहुमत मिळणार का? असे एक ना अनेक प्रश्न सामान्य मतदारांच्या मनात आहेत. 

आज एक्झिट पोलच्या (Exit Poll 2022) माध्यमातून कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील याचा अचूक अंदाज वर्तवण्याचा प्रयत्न केला जातो. एक्झिट पोलमधून तंतोतंत आकडेवारी समोर येत नसली, तरी मतदारांचे प्रश्न तात्पुरत्या स्वरुपात शमतात. कारण एक्झिट पोलमधून वर्तवले जाणारे अंदाज हे बहुतांश वेळा अंतिम निकालाच्या जवळपास जाणारे असतात. आज रात्री साधारण आठ वाजता उत्तरप्रदेशच्या निकालाचे कल आपण एबीपी माझावर पाहू शकणार आहोत. 

एक्झिट पोल जाहीर करायची वेळ काय?

एक्झिट पोल हा सर्व टप्प्यांतील निवडणूक प्रक्रिया पार पडल्यानंतर जाहीर करण्यास परवानगी आहे. त्यानुसार आज, 07 मार्च रोजी संध्याकाळी एक्झिट पोल जाहीर केला जाईल. एबीपी माझा आणि सी व्होटरचा सर्व्हे आपण एबीपी माझाच्या सर्व प्लॅटफॉर्मवर पाहू शकाल. 

लाईव्ह टीव्ही- https://marathi.abplive.com/live-tv 

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv           

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुक– https://www.facebook.com/abpmajha            

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv            

टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv 

कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha 

या ठिकाणी आपण एक्झिट पोलचे अंदाज पाहू शकाल.

एक्झिट पोलचं सर्वेक्षण कसं घेतलं जातं? 

मतदानानंतर तात्काळ मतदारांचा कौल विचारुन गोळा केलेली आकडेवारी एक्झिट पोलसाठी वापरली जातो. संबंधित मतदान केंद्रावर किती मतदार आहेत याची माहिती आधीच घेतली गेलेली असते. त्याच्या आधारेच मतदान केंद्रांची निवड करण्यात आलेली असते. मतदान करुन येणारा ठराविक क्रमाकांचा (दहावा, विसावा, पंचविसावा) मतदार सॅम्पल म्हणून निवडला जातो. मतदान करुन आल्यानंतर कोणाला मत दिलं, असा थेट प्रश्न मतदाराला विचारला जातो. मतदारांनी दिलेल्या उत्तराच्या आधारे सर्वेक्षण प्रक्रिया पूर्ण केली जाते आणि संबंधित मतदारसंघातील निकालाचा अंदाज वर्तवला जातो.  

एक्झिट पोल करणारी संस्था कोणत्या गोष्टी ध्यानात घेते? 

-कोणत्या टप्प्यामध्ये किती टक्के मतदान 
-नवमतदारांची संख्या
- मतदारांनी दिलेली माहिती, 
- एक्झिट पोल मांडणाऱ्या संस्थांनी मांडलेला निष्कर्ष
- राजकीय विश्लेषकांनी वर्तवलेले अंदाज या सगळ्यातून एक्झिट पोलचे अंदाज बांधले जातात. 

एक्झिट पोल आणि ओपिनियन पोल वेगवेगळे का? 

ओपिनियन पोल मतदानापूर्वी सादर केला जातो, तर एक्झिट पोल हा सर्व टप्प्यांतील मतदान पार पडल्यानंतर. ओपिनियन पोल म्हणजे जनमत चाचणी. मतदान होण्यापूर्वी विविध मतदारसंघांमध्ये जाऊन मतदारांचा कल जाणून घेतला जातो. ओपनियन पोल मतदानाच्या आधी घेतल्याने त्याचे निष्कर्ष बदलण्याची शक्यता असते. देशातील पहिला एक्झिट पोल कधी झाला? राजधानी दिल्लीतील सेंटर फॉर स्टडी ऑफ डेव्हलपिंग सोसायटीज (सीएसडीएस)ने केलेला एक्झिट पोल हा देशातील पहिला एक्झिट पोल मानला जातो. दूरदर्शनने 1996 साली देशातला पहिला एक्झिट पोल घेतला होता.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

PM Narendra Modi: पंतप्रधान मोदींचं महायुतीच्या आमदारांना मार्गदर्शन, राज ठाकरेंचा खास उल्लेख; डब्बा पार्टीचा सल्ला
पंतप्रधान मोदींचं महायुतीच्या आमदारांना मार्गदर्शन, राज ठाकरेंचा खास उल्लेख; डब्बा पार्टीचा सल्ला
मोठी बातमी ! कोर्टात SIT चे 7 खळबळजनक दावे; खंडणीला अडथळा ठरल्याने संतोष देशमुखांचा खून, वाल्मिक कराड गोत्यात?
मोठी बातमी ! कोर्टात SIT चे 7 खळबळजनक दावे; खंडणीला अडथळा ठरल्याने संतोष देशमुखांचा खून, वाल्मिक कराड गोत्यात?
Walmik Karad : गोपीनाथ मुंडेंनी 1999 मध्ये आणला मकोका, परळीच्या वाल्मिक कराडलाच बसला ' दे धक्का'
गोपीनाथ मुंडेंनी 1999 मध्ये आणला मकोका, परळीच्या वाल्मिक कराडलाच बसला ' दे धक्का'
वाल्मिक कराडला 7 दिवसांची कोठडी, बीड कोर्टाबाहेर राडा; निदर्शने, घोषणाबाजी, गृहमंत्री जिल्ह्यात या
वाल्मिक कराडला 7 दिवसांची कोठडी, बीड कोर्टाबाहेर राडा; निदर्शने, घोषणाबाजी, गृहमंत्री जिल्ह्यात या
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Walmik Karad Court Case : महाराष्ट्राच्या गृहमंत्र्याला विनंती आहे! दवेंद्र फडणवीस बीड जिल्ह्यात याWalmik Karad Court : वाल्मिक कराडला कोर्टातून बाहेर आणताच काय घडलं? संपूर्ण व्हिडीओ...Walmik Karad Case : खोटे गुन्हे मागे झालेच पाहिजेत! वाल्मिकसाठी वकिलाची घोषणाबाजीWalmik Karad Case Court Hearing Update:वाल्मिक कराडला 22 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी,कोर्टाचा निर्णय

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PM Narendra Modi: पंतप्रधान मोदींचं महायुतीच्या आमदारांना मार्गदर्शन, राज ठाकरेंचा खास उल्लेख; डब्बा पार्टीचा सल्ला
पंतप्रधान मोदींचं महायुतीच्या आमदारांना मार्गदर्शन, राज ठाकरेंचा खास उल्लेख; डब्बा पार्टीचा सल्ला
मोठी बातमी ! कोर्टात SIT चे 7 खळबळजनक दावे; खंडणीला अडथळा ठरल्याने संतोष देशमुखांचा खून, वाल्मिक कराड गोत्यात?
मोठी बातमी ! कोर्टात SIT चे 7 खळबळजनक दावे; खंडणीला अडथळा ठरल्याने संतोष देशमुखांचा खून, वाल्मिक कराड गोत्यात?
Walmik Karad : गोपीनाथ मुंडेंनी 1999 मध्ये आणला मकोका, परळीच्या वाल्मिक कराडलाच बसला ' दे धक्का'
गोपीनाथ मुंडेंनी 1999 मध्ये आणला मकोका, परळीच्या वाल्मिक कराडलाच बसला ' दे धक्का'
वाल्मिक कराडला 7 दिवसांची कोठडी, बीड कोर्टाबाहेर राडा; निदर्शने, घोषणाबाजी, गृहमंत्री जिल्ह्यात या
वाल्मिक कराडला 7 दिवसांची कोठडी, बीड कोर्टाबाहेर राडा; निदर्शने, घोषणाबाजी, गृहमंत्री जिल्ह्यात या
इकडं भारतात असलेल्या माजी पीएम शेख हसीनांवर गुन्ह्यांचा पाऊस, पासपोर्टही रद्द अन् तिकडं खालिदा जियांची शिक्षा माफ झाली!
इकडं भारतात असलेल्या माजी पीएम शेख हसीनांवर गुन्ह्यांचा पाऊस, पासपोर्टही रद्द अन् तिकडं खालिदा जियांची शिक्षा माफ झाली
लय भारी! मुंबईतून धावली देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन; कुल प्रवास, वाऱ्याचा वेग, चाचणी यशस्वी
लय भारी! मुंबईतून धावली देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन; कुल प्रवास, वाऱ्याचा वेग, चाचणी यशस्वी
Ajit Pawar : अजितदादांचे बीडमध्ये एकाच दिवसात दोन निर्णय; धनंजय मुंडे अडचणीत, संतोष देशमुखांच्या तालुक्यात कोणता निर्णय घेतला?
अजितदादांचे बीडमध्ये एकाच दिवसात दोन निर्णय; धनंजय मुंडे अडचणीत, संतोष देशमुखांच्या तालुक्यात कोणता निर्णय घेतला?
Santosh Deshmukh : संतोष देशमुखांच्या अपहरणाची वेळ आणि तीन मारेकऱ्यांची फोनाफोनीची वेळ मिळतीजुळती; एसआयटीने वेळ तारीख सादर केली
संतोष देशमुखांच्या अपहरणाची वेळ आणि तीन मारेकऱ्यांची फोनाफोनीची वेळ मिळतीजुळती; एसआयटीने वेळ, तारीख सादर केली
Embed widget