एक्स्प्लोर

ABP Cvoter Exit Poll : उत्तराखंडमध्ये भाजप-काँग्रेस चुरशीची लढत, पाहा काय सांगतोय एक्झिट पोल

Uttarakhand Exit Poll: उत्तराखंडमधील 70 विधानसभा जागांसाठी 14 फेब्रुवारी रोजी मतदान पार पडले, आता 10 मार्च रोजी निकाल असणार असून त्यापूर्वी एबीपी न्यूजने सी वोटरच्या साह्याने केलेल्या सर्व्हेतून एक्झिट पोलची आकडेवारी समोर आली आहे.

Uttarakhand Exit Poll: देशातील पाच महत्त्वाच्या राज्यांमध्ये निवडणूका पार पडल्या असून आता निकालासाठी काही दिवस शिल्लक आहेत. 10 मार्च रोजी निकाल जाहीर होणार आहेत. त्यापूर्वी एक्झिट पोलनुसार कोणत्या राज्यात कोणाचा पारडं जड हे समोर आलं आहे. उत्तराखंडचा विचार करता भाजप आणि काँग्रेस या दोन तगड्या पक्षांमध्ये चुरशीची लढत दिसून येत आहे. ज्यात जागांच्या टक्केवारीत भाजप किंचीत पुढे असून जागांच्या बाबतीत मात्र काँग्रेसने बाजी मारली आहे.  

उत्तराखंडमधील 70 विधानसभा जागांसाठी 14 फेब्रुवारी रोजी मतदान पार पडले. यंदा 65.37 टक्के मतदान पार पडलं. ज्यानंतर आता एक्झिट पोलचे आकडे समोर आले आहेत. यात भाजप आणि काँग्रेसमध्ये अटीतटीची लढत पाहायला मिळली आहे. ज्यात भाजप 40.8 टक्के मतांनी सरस ठरल्याचं दिसत असून काँग्रेस 39.3 टक्के मतांनी दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर आपला 8.7 टक्के आणि 11 टक्के जागा इतरांच्या पदरात पडल्या आहेत.

ABP Cvoter Exit Poll : उत्तराखंडमध्ये भाजप-काँग्रेस चुरशीची लढत, पाहा काय सांगतोय एक्झिट पोल  

एकूण जागांचा विचार करता भाजपकडे 26 ते 32, तर काँग्रेसकडे 32 ते 38 जागा आहेत. आम आदमी पार्टीचा विचार करता त्यांना 0 ते 2 आणि इतरांना 3 ते 7 जागा मिळाल्याचं एक्झिट पोलमध्ये दिसत आहे. बहुमतासाठी 36 जागांची गरज असल्याने काँग्रेस कुठेतरी काठावर पास होत असल्याचं या एक्झिट पोलमध्ये दिसून येत आहे.

ABP Cvoter Exit Poll : उत्तराखंडमध्ये भाजप-काँग्रेस चुरशीची लढत, पाहा काय सांगतोय एक्झिट पोल

2017 मध्ये भाजपला होतं बहुमत

उत्तराखंडमध्ये 2017 विधानसभा निवडणूकीच्या वेळी भाजपला बहुमत मिळालं होतं. भाजपने तब्बल 56 जागा जिंकत बहुमत मिळवलं होतं. काँग्रेसला मात्र 11 जागाच मिळवण्यात यश आलं होतं. तर तीन जागा अपक्ष उमेदवारांना मिळाल्या होत्या. उत्तराखंडमध्ये 2017 साली 65.56 टक्के मतदान झालं होतं तर यंदा मात्र 65.37 टक्के मतदानाची टक्केवारी आहे.

एक्झिट पोल मेथॉडोलॉजी काय?

सध्याच्या सर्वेक्षणाचे निष्कर्ष आणि अंदाज C-Voter एक्झिट पोल/पोस्ट पोल मतदानाच्या दिवशी आणि मतदानाच्या दिवसानंतर राज्यभरातील 18 वर्षावरील व्यक्तींच्या मुलाखतींवर आधारित आहेत. सर्व मतदारांनी दिलेले तपशील, माहिती, अंदाज त्या दिवसावर आधारीत आहेत. राज्याच्या लोकसंख्येच्या प्रमाणात डेटा जमा करण्याचा प्रयत्न करण्यात आला. काही वेळेस ही संख्या 100 च्या प्रमाणात नाही. आमचा अंतिम डेटा हा राज्याच्या लोकसंख्येच्या प्रमाणातील सामाजिक-आर्थिक स्तराच्या  +/- 1%  प्रमाणात आहे. आम्ही संभाव्य निकालाच्या अगदी सर्वात जवळचा अंदाज वर्तवू शकतो असा आमचा विश्वास आहे.

या सर्वेंसाठी सर्व विधानसभा मतदारसंघातील नमुने घेण्यात आले आहेत. MoE मॅक्रो स्तरावर +/- 3% आणि सूक्ष्म स्तरावर +/- 5%  इतके आहे. विश्लेषणासाठी आम्ही आमच्या अल्गोरिदमचा वापर केला आहे. प्रांतीय आणि विभागीतय मतांचे विश्लेषण करण्यासाठी Split-Voter  घटकाचा वापर केला आहे. याच घटकाचा वापर मतदानाची टक्केवारी, जागा किती मिळू शकतात, याचा अंदाज वर्तवण्यासाठी केला आहे. मिळणार असलेल्या मतांच्या टक्केवारीचा अंदाज आणि मिळणाऱ्या अंदाजित जागा यासाठी अंकगणिताचा शास्त्रीय वापर करण्यात आला आहे. संभाव्य मिळणाऱ्या जागांचा अंदाज वर्तवणे हा सर्वेक्षण विज्ञानाचा भाग नाहीत.

सी वोटर एक्झिट पोलसाठीचा डेटा हा मतदान केल्यानंतर मतदारांकडून घेतला जातो. निवडणूक संपेपर्यंत ही प्रक्रिया सुरू असते. एकाच राज्यासाठी ही मुलाखती घेतल्या जातात. यासाठी सर्व विधानसभा मतदारसंघात यादृच्छिकपणे मतदान केंद्र निवडले जातात. अंदाज योग्य पद्धतीने वर्तवण्यासाठी आम्ही अल्गोरिदम प्रक्रियेचा वापर केला आहे.

सर्वेक्षणासाठी आम्ही यादृच्छिकपणे डेटा जमा केला आहे. जणगणनेनुसार असलेल्या स्थानिक लोकसंख्या, त्यातील वैविध्य आदींचा विचार करण्यात आला आहे. आम्ही  WAPOR कोडचा (World Association of Public Opinion Research) वापर केला आहे. असोसिएशन ऑफ पब्लिक ओपिनियन रिसर्च आणि प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाची मार्गदर्शक तत्वे ही आम्ही SOP म्हणून मान्य केली आहेत.

हे ही वाचा-

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

BMC Election : मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2025 | बुधवार
मावळत्या वर्षाला 2025 निरोप; पर्यंटकांची समुद्रकिनारी गर्दी, सूर्यास्ताचा क्षण कॅमेऱ्यात कैद, पाहा फोटो
मावळत्या वर्षाला 2025 निरोप; पर्यंटकांची समुद्रकिनारी गर्दी, सूर्यास्ताचा क्षण कॅमेऱ्यात कैद, पाहा फोटो
Dhananjay Munde : करुणा शर्मांचा पत्नी म्हणून उल्लेख टाळल्याचं प्रकरण; धनंजय मुंडेंविरोधातील याचिका फेटाळली
करुणा शर्मांचा पत्नी म्हणून उल्लेख टाळल्याचं प्रकरण; धनंजय मुंडेंविरोधातील याचिका फेटाळली

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar BJP : संभाजीनगरात भाजपमध्ये नाराजीचा उद्रेक, अतुल सावेंसमोर नाराज संतप्त
Mahapalika Election : पुण्यात पेरलं, नागपुरात उगवलं; नागपुरात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी तुटल्याची रंजक कथा Special Report
Chhatrapati Sambhajinagar BJP Sena Alliance : कालपर्यंत युती, अखेरीस माती Special Report
Gharaneshahi Politics : घराणेशाही जोमात उमेदवार घरात, नेत्यांच्या घरात उमेदवारी, कार्यकर्त्यांची नाराजी Special Report
Mahayuti Politics : 'अपूर्ण' युतीची पूर्ण कहाणी, कुठे भाजप-शिवसेना एकत्र? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BMC Election : मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2025 | बुधवार
मावळत्या वर्षाला 2025 निरोप; पर्यंटकांची समुद्रकिनारी गर्दी, सूर्यास्ताचा क्षण कॅमेऱ्यात कैद, पाहा फोटो
मावळत्या वर्षाला 2025 निरोप; पर्यंटकांची समुद्रकिनारी गर्दी, सूर्यास्ताचा क्षण कॅमेऱ्यात कैद, पाहा फोटो
Dhananjay Munde : करुणा शर्मांचा पत्नी म्हणून उल्लेख टाळल्याचं प्रकरण; धनंजय मुंडेंविरोधातील याचिका फेटाळली
करुणा शर्मांचा पत्नी म्हणून उल्लेख टाळल्याचं प्रकरण; धनंजय मुंडेंविरोधातील याचिका फेटाळली
Nanded Election : निष्ठावंताना डावलून भाजपची मटका चालकाच्या पत्नीला उमेदवारी; माजी नगरसेवकाचा आरोप
निष्ठावंताना डावलून भाजपची मटका चालकाच्या पत्नीला उमेदवारी; माजी नगरसेवकाचा आरोप
मोठी बातमी : भाजप- एकनाथ शिंदेंना मोठे धक्के, पिंपरीत तब्बल 5 उमेदवारांचे एबी फॉर्म बाद
मोठी बातमी : भाजप- एकनाथ शिंदेंना मोठे धक्के, पिंपरीत तब्बल 5 उमेदवारांचे एबी फॉर्म बाद
मुंबईत वंचितमुळे काँग्रेसची गोची, 16 ठिकाणी उमेदवारच नाहीत, भाजपला पूरक भूमिका घेतली का? सिद्धार्थ मोकळे म्हणाले...
मुंबईत वंचितमुळे काँग्रेसची गोची, 16 ठिकाणी उमेदवारच नाहीत, भाजपला पूरक भूमिका घेतली का? सिद्धार्थ मोकळे म्हणाले...
Pune Election : पुण्यात आंदेकर वि. कोमकर गँगवॉर आता राजकारणातही; मुलाच्या खुनाचा बदला घेण्यासाठी आईने अर्ज भरला
पुण्यात आंदेकर वि. कोमकर गँगवॉर आता राजकारणातही; मुलाच्या खुनाचा बदला घेण्यासाठी आईने अर्ज भरला
Embed widget