एक्स्प्लोर
Advertisement
एक्स गर्लफ्रेण्ड अचानक भाजप आमदाराच्या घरी पोहोचली, तुफान राडा!
कर्नाटक विधानसभा निवडणुकीदरम्यान, आमदार रामदास यांच्या कथित एक्स गर्लफ्रेण्डने त्यांच्याचविरोधात निवडणूक लढवण्याची घोषणा केल्याने ते चर्चेत आले होते.
बंगळुरु : कर्नाटकमध्ये भाजपचा एक आमदार त्याच्या राजकीय कामांमुळे नाही तर कथित एक्स गर्लफ्रेण्डमुळे वादात आहे. कथित गर्लफ्रेण्ड गुरुवारी अचानक आमदाराच्या घरी पोहोचली आणि तुफान गोंधळ घातला, यामुळे हे प्रकरण वाढलं.
म्हैसूरमधील कृष्णाराजा मतदारसंघातील भाजप आमदार एसए रामदास यांच्या कार्यालयात ही महिला घुसली. रामदास यांच्या निवासस्थानीच त्याचं कार्यालय आहे. या महिलेने आपली ओळख प्रेमाकुमारी अशी सांगितली. आमदार एसए रामदास यांना भेटण्यासाठी महिला अडून राहिली. "रामदास माझे असून मला त्यांना भेटायचं आहे," असं ती वारंवार बोलत होती.
परंतु आमदार कार्यालयात नसल्याचं कर्मचाऱ्यांनी सांगितल्यानंतर ती नाराज झाली. यानंतर तिने जोरदार गोंधळ घातला. यावेळी कर्मचाऱ्यांनी गैरवर्तन केल्याचा आरोपही तिने केला.
"जिवंत असेपर्यंत मी रामदास यांना सोडणार नाही. माझं रामदास यांच्यावर प्रेम आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत मी त्यांच्याविरोधातील उमेदवारी अर्जही मागे घेतला होता. मी सातत्याने त्यांना भेटण्याचा प्रयत्न करत आहे, पण ते माझा कॉलही उचलत नाहीत," असं या महिलेने सांगितलं.
दुसरीकडे आमदारांच्या निकटवर्तीयाच्या माहितीनुसार, "ही महिला आमदार रामदास यांना ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करत आहे. एसए रामदास यांनी आपल्याशी लग्न केल्याचा दावा महिलेने केला आहे, पण तिच्याकडे कोणतेही पुरावे नाहीत. ती पैसे उकळण्याच्या प्रयत्नात आहे."
कर्नाटक विधानसभा निवडणुकीदरम्यान, आमदार रामदास यांच्या कथित एक्स गर्लफ्रेण्डने त्यांच्याचविरोधात निवडणूक लढवण्याची घोषणा केल्याने ते चर्चेत आले होते. मात्र महिलेने निवडणूक लढवली नाही. पण रामदास यांनी निवडणूक न लढवण्यासाठी आपल्याला दोन कोटी रुपये दिल्याचा आरोप महिलेने केला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भविष्य
क्रिकेट
सोलापूर
Advertisement