एक्स्प्लोर
बीएस येडियुरप्पा यांनी कर्नाटक मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, चौथ्यांदा मुख्यमंत्रीपदी विराजमान
राज्यपालांनी तो स्वीकारल्यानंतर शुक्रवारी संध्याकाळीच त्यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याचा निर्णय घेतला. आता 31 जुलैपर्यंत येडियुरप्पा यांना आपले बहुमत सिद्ध करण्याची संधी देण्यात आली आहे.
![बीएस येडियुरप्पा यांनी कर्नाटक मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, चौथ्यांदा मुख्यमंत्रीपदी विराजमान bjp leader bs yeddyurappa takes oath as Karnataka cm बीएस येडियुरप्पा यांनी कर्नाटक मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, चौथ्यांदा मुख्यमंत्रीपदी विराजमान](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/07/26193459/yediyurappa.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
बंगळुरु : कर्नाटकात सुरू असलेल्या राजकीय नाट्यानंतर अखेर बीएस येडियुरप्पा यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. राज्यपाल वजुभाई वाला यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. येडियुरप्पा चौथ्यांदा कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आहेत. काँग्रेस-जेडीसचं सरकार अल्पमतात आल्यानंतर कुमारस्वामी यांनी राजीनामा दिला होता. शुक्रवारी सकाळीच येडियुरप्पा यांनी राज्यपालांची भेट घेत सत्तास्थापनेचा दावा केला होता. राज्यपालांनी तो स्वीकारल्यानंतर शुक्रवारी संध्याकाळीच त्यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याचा निर्णय घेतला. आता 31 जुलैपर्यंत येडियुरप्पा यांना आपले बहुमत सिद्ध करण्याची संधी देण्यात आली आहे.
गेल्या अनेक अनेक दिवसांपासून कर्नाटकात सुरू असलेल्या राजकीय नाट्यानंतर कर्नाटकात पुन्हा एकदा येडियुरप्पा मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले. मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यापूर्वी त्यांनी तेथील भाजपा कार्यालयात जाऊन अन्य नेत्यांची भेट घेतली. कर्नाटकातील 17 आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर कर्नाटक सरकार अल्पमतात आले होते.
शुक्रवारी सकाळीच येडियुरप्पा यांनी राज्यपालांची भेट घेत सत्तास्थापनेचा दावा केला होता. राज्यपालांनी तो स्वीकारल्यानंतर शुक्रवारी संध्याकाळीच त्यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याचा निर्णय घेतला. आता 31 जुलैपर्यंत येडियुरप्पा यांना आपले बहुमत सिद्ध करण्याची संधी देण्यात आली आहे. मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यापूर्वी येडियुरप्पा यांनी बंगळुरू येथील भाजप कार्यालयात काही नेत्यांची भेट घेतली. तसेच त्यांनी बंगळुरू येथील काडू मल्लेश्वर मंदिरात जाऊन पूजाही केली.
संबंधित बातम्या
- Karnataka Crisis | मुख्यमंत्री कुमारस्वामींनी दोन दिवसांचा अवधी मागितला
- Karnataka Crisis | राज्यपालांच्या आदेशानंतर कुमारस्वामी सुप्रीम कोर्टात, कर्नाटक विधानसभा सोमवारपर्यंत तहकूब
- Karnataka Crisis : दुपारी दीड वाजेपर्यंत बहुमत सिद्ध करण्याच्या राज्यपालांच्या सूचना
- Karnataka Crisis | बंडखोर आमदारांच्या राजीनाम्याचा निर्णय विधानसभा अध्यक्षांनी घ्यावा : सुप्रीम कोर्ट
- कर्नाटक : सरकार टिकवण्यासाठी आमचे राजीनामे स्वीकारले नाहीत : बंडखोर आमदारांची सुप्रीम कोर्टात धाव
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
व्यापार-उद्योग
भारत
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)